प्रसिद्ध गायिकेवर तिघांनी केला सामूहिक बलात्कार, आरोपी अटकेत

मुंबई तक

08 May 2022 (अपडेटेड: 01 Mar 2023, 09:06 AM)

एका प्रसिद्ध गायिकेवर तिघांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. यासंबंधी पीडित गायिकेने तक्रार केल्यानंतर पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. या तीन आरोपींनी या प्रसिद्ध गायिकेला एका कार्यक्रमात गाणं म्हणण्यासाठी बोलावलं होतं त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला असा आरोप या गायिकेने केला आहे. कौटुंबिक वाद सोडवण्यासाठी दिलं मांत्रिकाच्या ताब्यात, महिलेवर ७९ दिवस बलात्कार बिहारच्या पाटणा या […]

Mumbaitak
follow google news

एका प्रसिद्ध गायिकेवर तिघांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. यासंबंधी पीडित गायिकेने तक्रार केल्यानंतर पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. या तीन आरोपींनी या प्रसिद्ध गायिकेला एका कार्यक्रमात गाणं म्हणण्यासाठी बोलावलं होतं त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला असा आरोप या गायिकेने केला आहे.

हे वाचलं का?

कौटुंबिक वाद सोडवण्यासाठी दिलं मांत्रिकाच्या ताब्यात, महिलेवर ७९ दिवस बलात्कार

बिहारच्या पाटणा या ठिकाणी ही धक्कादायक घटना घडली आहे. या गायिकेला गाणं म्हणण्यासाठी निमंत्रण देण्यात आलं होतं. त्यानंतर या तिघांनी काही कारण काढून या महिलेला एका खोलीत नेलं. तिथे तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. यानंतर ही महिला या तिघांच्या तावडीतून सुटली आणि दुसऱ्या खोलीत जाऊन तिने पोलिसांना फोन केला. पोलीस या ठिकाणी पोहचले आणि तिघांनाही अटक केली. या आरोपींकडून पोलिसांनी एक देशी कट्टा आणि तीन काडतुसंही जप्त केले आहेत.

ही २८ वर्षीय गायिका जहानाबाद येथे राहणारी आहे. ही गायिका मीठापूरमध्ये राहून सांस्कृतिक कार्यक्रमात गाणं म्हणत असते. पाटणाचे एसएसपी मानवजीत सिंह ढिल्लन यांनी सांगितलं की पीडित मुलीने आम्हाला कळवल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत या तीन आरोपींना अटक केली. पीडितेला पोलिसांनी कोर्टात नेणार आहेत. त्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे.

बीडमध्ये अस्वस्थ करणारी घटना! पुण्यातील महिलेवर नात्यातील तरुणांकडून सामूहिक बलात्कार

अटक करण्यात आलेल्या तीन आरोपींनी मात्र त्यांच्यावर झालेले आरोप फेटाळले आहेत. ही गायिका आमच्यावर खोटा आरोप करते आहे असं या आरोपींनी सांगितलं. यातल्या एकाने सांगितलं की ही गायिका माझी मैत्रीण आहे मी तिला बऱ्याच काळापासून ओळखतो. तिने माझ्याकडून काही वेळा पैसेही घेतले आहेत. आता ती पैसे परत करण्यासाठी टाळाटाळ करत होती. आम्ही तिच्यावर पैसे देण्यासाठी दबाव टाकला तेव्हा तिने आम्हाला या खोट्या आरोपामध्ये फसवलं आहे असं सांगितलं. या प्रकरणी आता पुढील चौकशी सुरू आहे.

    follow whatsapp