Ganesh Utsav : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सहकुटुंब लालबागच्या राजाच्या चरणी लीन

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज सहकुटुंब लालबागचा राजा गणपतीचं दर्शन घेतलं आहे. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि दोन्ही मुलं आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे हे दोघंही होते. मुंबईचा राजा या गणपतीचं दर्शन घेऊन नंतर उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब लालबागचा राजा गणपतीचं दर्शन घेतलं. उद्धव ठाकरे त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे तसंच मुलं आदित्य […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 05:20 PM • 31 Aug 2022

follow google news

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज सहकुटुंब लालबागचा राजा गणपतीचं दर्शन घेतलं आहे. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि दोन्ही मुलं आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे हे दोघंही होते. मुंबईचा राजा या गणपतीचं दर्शन घेऊन नंतर उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब लालबागचा राजा गणपतीचं दर्शन घेतलं.

हे वाचलं का?

उद्धव ठाकरे त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे तसंच मुलं आदित्य आणि तेजस या सगळ्यांनी गर्दीतून वाट काढत लालबागचा राजा गणेश मंडळाचा मंडप गाठला. या मंडपात येऊन त्यांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं आणि मनोभावे प्रार्थना केली. यंदा कोरोनाचं संकट टळल्यानंतर दोन वर्षांनी उत्साहात गणेश उत्सव साजरा केला जातो आहे. अशात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब येऊन लालबाग राजा गणपतीचं दर्शन घेतलं.

लालबागला आल्यानंतर या सगळ्यांनीच देवाची प्रार्थना केली. २१ जूनला राज्यात राजकीय भूकंप झाला. शिवसेना दुभंगली आहे. एकनाथ शिंदे आपल्यासह ४० आमदारांचा गट घेऊन बाहेर पडले. त्यानंतर शिवसेनेत दोन गट पडले आहेत. तसंच एकनाथ शिंदे हे भाजपच्या पाठिंब्याने मुख्यमंत्री झाले आहेत. शिवसेना दुभंगली आहे. शिवसेनेत दोन गट पडले आहेत. शिवसेना पुन्हा एकसंध करण्याचं आव्हान उद्धव ठाकरेंसमोर आहे. अशात आता गणेश उत्सव साजरा होत असताना उद्धव ठाकरे यांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं आहे.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेवर दावा सांगितला आहे. कारण आपल्याकडेच योग्य संख्याबळ आहे असं त्यांचं म्हणणं आहे. ४० आमदार शिंदे गटात आहेत. तर त्यांना आणखी ११ अपक्ष आमदारांचाही पाठिंबा मिळाला आहे. त्यामुळे शिंदे गट बळकट झाला आहे. तसंच शिवसेनेतले १२ खासदारही शिंदे गटाच्या बाजूने आले आहेत. अशा सगळ्यात उद्धव ठाकरे पुढे काय करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आज मात्र उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब येऊन मुंबईचा राजा आणि लालबागचा राजा या दोन्ही गणपतींचं दर्शन घेतलं.

    follow whatsapp