रेल्वेकडून प्लॅटफॉर्म तिकीटदरात तिप्पट वाढ

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव काळात प्रदीर्घ काळासाठी बंद असलेली प्लॅटफॉर्म तिकीटाची सेवा रेल्वेने पुन्हा एकदा सुरु केली आहे. दिल्ली आणि मुंबईमध्ये ही सेवा पुन्हा एकदा सुरु करण्यात आली असून तिकीटाच्या दरांमध्ये वाढ करण्यात आली आहे. दिल्लीत याआधी प्लॅटफॉर्म तिकीटासाठी १० रुपये द्यावे लागायचे, तिकडे आता ३० रुपये द्यावे लागतील. मुंबईत ही भाववाढ अजून जास्त असून आता […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 05:09 AM • 05 Mar 2021

follow google news

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव काळात प्रदीर्घ काळासाठी बंद असलेली प्लॅटफॉर्म तिकीटाची सेवा रेल्वेने पुन्हा एकदा सुरु केली आहे. दिल्ली आणि मुंबईमध्ये ही सेवा पुन्हा एकदा सुरु करण्यात आली असून तिकीटाच्या दरांमध्ये वाढ करण्यात आली आहे. दिल्लीत याआधी प्लॅटफॉर्म तिकीटासाठी १० रुपये द्यावे लागायचे, तिकडे आता ३० रुपये द्यावे लागतील. मुंबईत ही भाववाढ अजून जास्त असून आता प्लॅटफॉर्म तिकीटासाठी मुंबईकर प्रवाशांना ५० रुपये मोजावे लागणार आहेत.

हे वाचलं का?

सत्ता आली तर ६० रुपये दराने पेट्रोल देऊ, भाजप नेत्याचं आश्वासन

मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनन्स, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनन्स अशा स्थानकांवरही ही भाववाढ लागू झाली आहे. लॉकडाउनच्या काळात रेल्वेसेवा बंद ठेवण्यात आली. कालांतराने सरकारने अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या लोकांसाठीच लोकलसेवा सुरु केली. अनेक लांब पल्ल्यांच्या गाड्याही सुरु झाल्या आहेत. अनेकदा बाहेरगावी जाणाऱ्या आपल्या नातेवाईकांना सोडण्यासाठी लोकं स्टेशनवर गर्दी करत असतात. अशावेळी त्यांना प्लॅटफॉर्म तिकीट घेणं बंधनकारक असतं. मात्र या दरांमध्ये आता वाढ झाल्यानंतर रेल्वे स्टेशनवर होणारी अनावश्यक गर्दी टाळली जाण्याची शक्यता आहे.

प्लॅटफॉर्म तिकीटांसोबत रेल्वेने लोकलच्या तिकीटांमध्येही वाढ केली आहे. मुंबईत फेब्रुवारी महिन्यात रेल्वेने ठराविक कालावधीत सर्वसामान्य नागरिकांना रेल्वे प्रवासाची मूभा दिली. यापूर्वी फक्त अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या व्यक्तींनाच लोकल प्रवासाची परवानगी होती.

राज्यातील वीज ग्राहकांना दिलासा, वीजदरांत दोन टक्क्यांची कपात

    follow whatsapp