जुन्नर : आळेफाटा येथे पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्यासाठी आलेल्या टोळीला अटक

जुन्नर येथील आळेफाटा पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्यासाठी तयारीत आलेल्या एका टोळीला पोलिसांनी अटक केली आहे. या टोळीत मोक्का अंतर्गत आरोपी अंकुश खंडू पवार यासह चौघांना ताब्यात घेण्या आलं असून इतर तीन आरोपी फरार झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास आळेफाटा पोलीस स्टेशनचं एक पथक रात्री गस्तीवर असताना त्यांना कल्याण-अहमदनगर मार्गावरील आळे (ता.जुन्नर) गावच्या […]

Mumbai Tak

मुंबई तक

13 May 2022 (अपडेटेड: 01 Mar 2023, 09:06 AM)

follow google news

जुन्नर येथील आळेफाटा पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्यासाठी तयारीत आलेल्या एका टोळीला पोलिसांनी अटक केली आहे. या टोळीत मोक्का अंतर्गत आरोपी अंकुश खंडू पवार यासह चौघांना ताब्यात घेण्या आलं असून इतर तीन आरोपी फरार झाले आहेत.

हे वाचलं का?

मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास आळेफाटा पोलीस स्टेशनचं एक पथक रात्री गस्तीवर असताना त्यांना कल्याण-अहमदनगर मार्गावरील आळे (ता.जुन्नर) गावच्या हद्दीत बोरी फाटा या ठिकाणी ओमनी कार ही संशयित पद्धतीने भरघाव वेगाने जाताना आढळून आली. पोलिसांनी ही कार थांबवण्याचा प्रयत्न केला असता ही गाडी जोरात पुढे निघुन गेली. अखेरीस पोलीसांनी या वाहनाचा पाठलाग करून आरोपींना थांबवलं.

या वाहनात असलेल्या सात आरोपींनी अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतू गस्तीवर असलेल्या पोलीस पथकाने हार न मानता पाठलाग करत यापैकी चार जणांना पकडण्यात यश मिळवलं. नवनाथ राजु पवार (वय २१) रा. ढोकी ता. पारनेर जिल्हा अहमदनगर, अनिकेत बबन पवार (वय२०) बोरी साळवाडी ता.जुन्नर, अंकुश खंडू पवार रा. तांबवाडी वडगाव सावताळ ता.पारनेर जिल्हा अहमदनगर, प्रविण दत्तात्रय आंबेकर (वय२५) वडगाव सावताळ ता. पारनेर जिल्हा अहमदनगर या चार आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

कोल्हापूर : जीवलग मित्राने केला घात, सराफ मित्राच्या दुकानातून चोरलं 56 तोळे सोनं

चौकशीदरम्यान या चारही आरोपींनी पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्यासाठी आलो होतो असं कबूल केलं. आरोपींजवळ असलेला लोखंडी हातोडा, चाकू, कोयता, स्क्रू- ड्रायवर, कटर, नायलॉनची रस्सी, चिकटपट्टी, टॉर्च, मिरची पावडर, मोबाईल असा शस्त्रसाठा पोलिसांनी जप्त केला आहे. कैलास शिंदे, विशाल पवार आणि विकास बर्डे हे तीन आरोपी फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

रत्नागिरी : रेल्वे व्यापाऱ्याची 27 लाखांची रोकड लुटणाऱ्या टोळीला अटक

    follow whatsapp