Lata Mangeshkar : ‘सम्राज्ञी’तून उलगडणार लतादीदींच्या आयुष्याचा प्रवास, नव्या डॉक्युमेंट्रीची घोषणा

मुंबई तक

• 12:44 PM • 28 Sep 2022

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची आज जयंती आहे. जगभरातले चाहते लता मंगेशकर यांना आदरांजली वाहात आहेत. २८ सप्टेंबर १९२९ मध्ये लता मंगेशकर यांचा जन्म झाला. लतादीदींच्या चाहत्यांना त्यांचा जीवनप्रवास एका डॉक्युमेंट्रीमधून उलगडणार आहे. सम्राज्ञी या लता मंगेशकर यांच्या आयुष्यावरवरच्या डॉक्युमेंट्रीची घोषणा करण्यात आली आहे. लतादीदींचा जीवनपट उलगणार सम्राज्ञी ही डॉक्युमेंट्री लतादीदींच्या जन्मदिनाचं औचित्य साधत अनुष्का मोशन […]

Mumbaitak
follow google news

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची आज जयंती आहे. जगभरातले चाहते लता मंगेशकर यांना आदरांजली वाहात आहेत. २८ सप्टेंबर १९२९ मध्ये लता मंगेशकर यांचा जन्म झाला. लतादीदींच्या चाहत्यांना त्यांचा जीवनप्रवास एका डॉक्युमेंट्रीमधून उलगडणार आहे. सम्राज्ञी या लता मंगेशकर यांच्या आयुष्यावरवरच्या डॉक्युमेंट्रीची घोषणा करण्यात आली आहे.

हे वाचलं का?

लतादीदींचा जीवनपट उलगणार सम्राज्ञी ही डॉक्युमेंट्री

लतादीदींच्या जन्मदिनाचं औचित्य साधत अनुष्का मोशन पिक्चर्स अँड एंटरटेनमेंट्स आणि लतिका क्रिएशन्स यांच्यातर्फे सम्राज्ञी या माहितीपटाची निर्मिती केली जाणार आहे. लतादीदींचा आयुष्यभराचा प्रवास उलगडणारी ही डॉक्युमेंट्री असणार आहे. मराठीतला अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयत्न आहे. एल एम म्युझिकचे सीईओ संगीतकार मयुरेश पै आणि ख्यातनाम निर्माते नरेंद्र फिरोदिया या दोघांनीही ही डॉक्युमेंट्री करण्याचा निर्धार केला आहे. मयुरेश पै हे या डॉक्युमेंट्रीचं दिग्दर्शन करणार आहेत.

आज लतादीदींची जयंती

लता मंगेशकरांचा २८ सप्टेंबर १९२९ रोजी जन्म मध्य प्रदेशातील इंदूर शहरात झाला होता. त्यांचे वडील पंडित दीनानाथ मंगेशकर हे शास्त्रीय गायक तसेच नाट्यकलावंत होते. लता दीदी या आपल्या बांधवांमध्ये सर्वात मोठ्या. आशा, उषा, मीना आणि हृदयनाथ ही त्यांची लहान भावंडं होती. लता दिदींना पहिले संगीताचे धडे आपल्या वडिलांकडूनच मिळाले. लता मंगेशकर यांनी ९८० पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांची गाणी गायली आहेत.

भारतरत्न लता मंगेशकर यांचा जीवनप्रवास उलगडणार सम्राज्ञी या माहितीपटातून

२० हून अधिक प्रादेशिक भारतीय भाषांमध्ये गायन केलं आहे. २००१ मध्ये लता मंगेशकर यांना ‘भारत रत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ६ फेब्रुवारी २०२२ रोजी वयाच्या ९३ व्या वर्षी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात लता दीदींनी अखेरचा श्वास घेतला. लता मंगेशकर यांच्यावर शिवाजी पार्क येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, शाहरुख खान, आमिर खान, रणबीर कपूर आणि सचिन तेंडुलकर यांच्यासह अनेक कलाकारांनी शिवाजी पार्कवर जाऊन लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहिली.

    follow whatsapp