आदित्य ठाकरे महाराष्ट्राचे पप्पू?; ‘घोड्यावरून वराती’चे झळकावले बॅनर्स, शिंदे गटाने चढवला हल्ला

मुंबई तक

• 05:17 AM • 25 Aug 2022

‘५० खोके एकदम ओके’ घोषणेनं राज्य विधिमंडळाचं अधिवेशन गाजताना दिसतंय. विधानभवनाच्या पायऱ्यांवर उभं राहून शिवसेनेसह महाविकास आघाडीतील आमदारांकडून शिंदे गटातील आमदारांना लक्ष्य केलं जातंय. त्याला शिंदेकडून प्रत्युत्तर दिलं जात असून, आता थेट आदित्य ठाकरे आणि मातोश्रीवरच हल्ला चढवला आहे. महाराष्ट्राचे पपू (परमपूज्य) म्हणत आदित्य ठाकरेंनाही डिवचल्याने शिवसेना विरुद्ध शिंदे गट संघर्ष विकोपाला जाण्याची चिन्हं आहेत. […]

Mumbaitak
follow google news

‘५० खोके एकदम ओके’ घोषणेनं राज्य विधिमंडळाचं अधिवेशन गाजताना दिसतंय. विधानभवनाच्या पायऱ्यांवर उभं राहून शिवसेनेसह महाविकास आघाडीतील आमदारांकडून शिंदे गटातील आमदारांना लक्ष्य केलं जातंय. त्याला शिंदेकडून प्रत्युत्तर दिलं जात असून, आता थेट आदित्य ठाकरे आणि मातोश्रीवरच हल्ला चढवला आहे. महाराष्ट्राचे पपू (परमपूज्य) म्हणत आदित्य ठाकरेंनाही डिवचल्याने शिवसेना विरुद्ध शिंदे गट संघर्ष विकोपाला जाण्याची चिन्हं आहेत.

हे वाचलं का?

पावसाळी अधिवेशनात शिंदे गट आणि शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधील आमदारांत संघर्ष उफाळून येताना दिसत आहे. बुधवारी (२४ ऑगस्ट) विधानभवनाच्या पायऱ्यांवर जोरदार राड्याची चर्चा सुरू असतानाच आज (२५ ऑगस्ट) पुन्हा एकदा शिंदे गटाने विधानभवनाच्या पायऱ्यांवर उभं राहून आदित्य ठाकरे आणि मातोश्रीवर हल्ला चढवला.

युवा सेना प्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांविरोधात आघाडीचं उघडली आहे. बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात आदित्य ठाकरे शिव संवाद यात्रेच्या माध्यमातून निशाणा साधत आहेत. त्यावरून आता शिंदे गट आदित्य ठाकरेंना घेरण्याचा प्रयत्न करून दिसत आहे.

आदित्य ठाकरे महाराष्ट्राचे पप्पू?; शिंदे गटाची मातोश्रीवर टीका

शिंदे गटाने आज विधानभवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी केली. यावेळी शिंदे गटाच्या आमदारांनी बॅनर झळकावले. ‘महाराष्ट्राचे परम पूज्य (पपू) युवराज’, अशा मथळा असलेल्या बॅनरवर आदित्य ठाकरे आणि मातोश्रीवर टीका करण्यात आलीये.

शिंदे गटाच्या बॅनरवर आदित्य ठाकरेंबद्दल काय म्हटलंय?

महाराष्ट्राचे परम पूज्य (पपू) युवराज

२०१४ ला १५१ चा हट्ट धरून युती बुडवली,

२०१९ ला खुर्चीसाठी हिंदुत्वाची विचारधारा पायदळी तुडवली.

पर्यटन खाते घेऊन घरातच बसून केला कहर,

सत्ता गेल्यावर पर्यटनाची आली लहर.

पुन्हा निवडणूक लढवायची देतात ठसन,

स्वतः आमदार व्हायला महापौर व दोन एमएलसीचे लागते कुशन.

खुर्चीत बसल्यावर शिवसैनिकाला केले तडीपार,

सत्ता गेल्यावर आता फिरतात दारोदार.

तुमच्या या खोट्या रडगाण्यावर भुलणार नाही,

युवराजांची कायमच दिशा चुकली.

असं शिंदे गटाकडून झळकावण्यात आलेल्या बॅनरवर लिहिलेलं आहे. त्याचबरोबर शिंदे गटाकडून मातोश्रीवर पैसे खाल्याचा आरोप करणाऱ्या घोषणाही करण्यात आल्या. ‘सचिन वाझेचे खोके, मातोश्री ओके’ ‘अनिल देशमुखचे खोके, मातोश्री ओके’, ‘नवाब मलिकचे खोके, मातोश्री ओके’, अशा घोषणा शिंदे गटाच्या आमदारांकडून करण्यात आला.

शिंदे गटाला आदित्य ठाकरेंना पप्पू म्हणायचं का?

बॅनरवर आदित्य ठाकरेंना घोड्यावर दाखवण्यात आलंय. त्याचबरोबर परमपूज्य म्हणतानाच कंसात पपू असं म्हटलेलं आहे. बॅनरवर बाळासाहेब ठाकरेंच्या नातवाचा पप्पू असा उल्लेख केलेला आहे, असा प्रश्न शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांना मुंबई Tak च्या प्रतिनिधींकडून विचारण्यात आला.

त्याला उत्तर देताना भरत गोगावले म्हणाले, कुठे उल्लेख केला आहे? तुम्ही ऐकलंत का? त्यावर बॅनरवरील मजकूराकडे गोगावलेंचं लक्ष वेधलं. भारत गोगावले म्हणाले, ‘बॅनरवर ते लिहिलेलं आहे. त्याच्यातून तुम्हाला काय अर्थ लावायचा तो लावा”, असं भरत गोगावले यांनी स्पष्ट केलं.

    follow whatsapp