महाराष्ट्रात सलग दुसऱ्या दिवशी विक्रमी लसीकरण करण्यात आलं आहे. संध्याकाळी 7 वाजेपर्यंत राज्यात 6 लाख 2 हजार 163 जणांना लस देण्यात आली. एका दिवसात एवढ्या मोठ्या प्रमाणावर लसीकरण होण्याची ही पहिलीच वेळ आहे. याआधी म्हणजेच मंगळवारी 5 लाख 52 हजार 909 जणांना कोरोनाची लस देण्यात आली.
ADVERTISEMENT
याआधी राज्यात २६ एप्रिल रोजी एकाच दिवशी सर्वाधिक लसीकरणाची नोंद झाली होती. त्यावेळी संपूर्ण राज्यात ५ लाख ३४ हजार लोकांना लस दिली होती. काही महिन्यांपूर्वी लसीच्या तुटवड्यामुळे राज्यात १८ ते ३० वयोगटातील लोकांचं लसीकरण स्थगित करण्यात आलं होतं. या विक्रमी लसीकरणाबद्दल आरोग्य मंत्री राजेश टोपे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही समाधान व्यक्त केले आहे.
दरम्यान, देशात सोमवारी एका दिवसात जगातलं विक्रमी लसीकरण झालं. रात्री अकरा वाजेपर्यंत 85 लाख व्यक्तींचं लसीकरण करण्यात आलं. देशात सोमवारी एका दिवसात 85 लाख लोकांच लसीकरण झालं. जगात एका दिवसात विक्रमी लसीकरण भारतात झालेलं असताना महाराष्ट्रात मात्र इतर मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि राजस्थानच्या तुलनेत, महाराष्ट्रात लसीकरण कमी झाल्याचं आढळलं. परंतू ही कसर भरुन काढत राज्याने आज पुन्हा एकदा उच्चांक गाठला आहे.
ADVERTISEMENT
