Padma Shri Ashok Saraf : अशोक सराफ यांना 'पद्मश्री', पत्नी निवेदिता सराफ म्हणाल्या हा पुरस्कार...

राज्यातील आणखी दिग्गजांचाही पद्म पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे. होमिओपॅथी चिकित्सक डॉ. विलास डांगरे, मारुती चित्तमपल्ली यांच्यासह चैत्राम पवार यांनाही पद्मश्री पुरस्कार जाहीर झालाय. 

Mumbai Tak

मुंबई तक

26 Jan 2025 (अपडेटेड: 26 Jan 2025, 01:44 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर

point

अशोक सराफ यांच्या पत्नी निवेदिता सराफ यांनी व्यक्त केला आनंद

Padma Awards 2024 : महाराष्ट्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेलाय. काल पद्मश्री पुरस्कार जाहीर झाले असून, त्यामध्ये महाराष्ट्राचे लाडके कलाकार, ज्येष्ठ अभिनेते महाराष्ट्रभूषण अशोक सराफ यांनाही पद्मश्री जाहीर करण्यात आला आहे. प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येला या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. या यादीमध्ये महाराष्ट्रातील अनेक दिग्गजांचा सहभाग आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाच्या जोरदार अधिराज्य गाजवलेल्या अशोक सराफ यांचा सन्मान महाराष्ट्रासाठी महत्वाचा ठरला आहे. काही महिन्यांपूर्वीच अशोक सराफ यांना महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर केला होता. (Marathi actor Ashok Saraf awarded Padma Shri)

हे वाचलं का?

हे ही वाचा >> Sandeep Kshirsagar : "धनंजय मुंडे मंत्री, म्हणून वाल्मिकला VIP ट्रीटमेंट आणि संरक्षण मिळतंय", क्षीरसागर थेट बोलले

अशोक सराफ यांना पद्मश्री जाहीर झाल्यानंतर चाहत्यांमध्ये मोठा आनंद निर्माण झाला आहे. अशोक सराफ यांचे चित्रपट पाहत पाहत एक पिढी मोठी झाली असून, तरूण पिढीलाही त्यांच्या कामाचं मोठं कौतुक आहे. हा पुरस्कार मिळाल्यानंतर अशोक सराफ यांच्या पत्नी निवेदिता सराफ यांचाही आनंद गगनात मावेनासा झाला. माोध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या, पुरस्कार मिळाल्याचा मला मोठा आनंद झाला. आम्ही आभारी आहोत. हा सन्मान फक्त अशोर सराफ यांचा नाहीये, तर राज्यातील प्रत्येक प्रेक्षकाचा सन्मान आहे. लोकांनी नेहमी अशोक यांच्यावर प्रेम केलं आहे. त्यांच्या अभिनयवर आणि मेहनतीवर प्रेम केलं आहे. ती सगळी मेहनत आज सार्थकी लागली. त्यामुळे हा पुरस्कार आम्हाला राज्यातील लोकांना समर्पित करायचा आहे." 

हे ही वाचा >> Tahawwur Rana : 26/11 हल्ल्यातील दोषी तहव्वुर राणाला भारतात आणणार, संजय राऊत म्हणाले दाऊद...

 

दरम्यान, राज्यातील आणखी दिग्गजांचाही पद्म पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे. होमिओपॅथी चिकित्सक डॉ. विलास डांगरे, मारुती चित्तमपल्ली यांच्यासह चैत्राम पवार यांनाही पद्मश्री पुरस्कार जाहीर झालाय. राष्ट्रपती दौपदी मुर्मू यांनी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला आपल्या भाषणात हे पुरस्कार जाहीर केले. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या दिग्गज व्यक्तींचा या पुरस्काराच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. तसच स्वातंत्र्यसैनिक, शेतकरी, पॅरालिम्पियनमध्ये अप्रतिम कामगिरी करणाऱ्या व्यक्तींनाही या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.

    follow whatsapp