महाराष्ट्रात मराठी भाषा शिकली पाहिजे, गुजराती समाजाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारीचं संबोधन

मुंबई तक

• 12:51 PM • 04 Aug 2022

महाराष्ट्रात मराठी भाषा शिकली पाहिजे आणि इथली संस्कृती आत्मसात केली पाहिजे असं प्रतिपादन गुजाराथी समाजाला संबोधित करत असताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी हे वक्तव्य केलं आहे. गुजराती आणि राजस्थानी समाज जर मुंबईतून निघून गेला तर या शहराची आर्थिक राजधानी ही ओळख पुसली जाईल असं वादग्रस्त वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मागच्या आठवड्यात केलं होतं. त्यानंतर […]

Mumbaitak
follow google news

महाराष्ट्रात मराठी भाषा शिकली पाहिजे आणि इथली संस्कृती आत्मसात केली पाहिजे असं प्रतिपादन गुजाराथी समाजाला संबोधित करत असताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी हे वक्तव्य केलं आहे.

हे वाचलं का?

गुजराती आणि राजस्थानी समाज जर मुंबईतून निघून गेला तर या शहराची आर्थिक राजधानी ही ओळख पुसली जाईल असं वादग्रस्त वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मागच्या आठवड्यात केलं होतं. त्यानंतर ज्या संतप्त प्रतिक्रिया समोर आल्या. त्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी माफीही मागितली. या सगळ्यानंतर आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी महाराष्ट्रात राहताना मराठी भाषा शिकली पाहिजे, असं म्हटलं आहे.

काय म्हणाले आहेत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी?

भारत हा सुंदर पुष्पगुच्छाप्रमाणे विविधतेने नटलेला देश आहे. प्रत्येक राज्याची वेशभूषा, भाषा इत्यादी बाबतीत स्वतंत्र ओळख असली तरीही सर्व भारतीयांना जोडणारे राष्ट्रीय चारित्र्य समान आहे. देशातील राष्ट्रीयतेचा भाव वृद्धिंगत करण्यासाठी प्रत्येकाने आपली सांस्कृतिक ओळख जपताना स्थानिक संस्कृतीशी एकीकरण झाले पाहिजे. तसेच महाराष्ट्रात असताना मराठी भाषा शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं.

गुजराती सांस्कृतिक फोरम या मुंबईतील सामाजिक सांस्कृतिक संस्थेच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ११ प्रसिद्ध गुजराथी व्यक्तींना राज्यपालांच्या हस्ते राजभवन येथे सन्मानित करण्यात आले, त्यावेळी हे वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी हे वक्तव्य केलं आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते यावेळी प्रसिद्ध अभिनेते दिलीप जोशी, जन्मभूमी समूहाचे मुख्य संपादक कुंदन व्यास, नेत्र चिकित्सक डॉ. कुलीन कोठारी, प्रसिद्ध नाट्यलेखक प्रवीण सोळंकी, कवी-लेखक अंकित त्रिवेदी, उद्योजक विनेश मेहता, कमला मेहता अंधशाळेच्या अध्यक्षा हंसाबेन मेहता, नेहरू तारांगणचे माजी संचालक डॉ. जे जे रावल, प्रशासकीय अधिकारी खुश्वी गांधी, उद्योगपती अशोक मेहता व समाजसेवक विपुल मेहता यांना यावेळी सन्मानित करण्यात आलं.

“मी महाराष्ट्रात आल्यावर आपण स्वतः ५-६ महिन्यात चांगली मराठी शिकलो. राज्यातील प्रत्येक विद्यापीठांमधील दीक्षांत समारोहाचे सुत्रसंचालन तसेच चेंबर ऑफ कॉमर्स आदी व्यापार विषयक संस्थांमध्ये देखील सूत्रसंचालन मराठी भाषेतून किंवा शक्य नसल्यास हिंदीतून करावे असं आग्रहाने सांगत असतो, असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी यावेळी सांगितलं.

ऐतिहासिक ठिकाणी सन्मान झाल्याचा आनंद : दिलीप जोशी

तारक मेहता का उलटा चष्मा‘ या मालिकेतून जेठालालचे पात्र साकारणारे अभिनेते दिलीप जोशी यांनी ऐतिहासिक अश्या राजभवन येथे राज्यपालांच्या हस्ते सन्मान होत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. आपला जन्म मुंबईत झाला आणि आपण महाराष्ट्रात जन्मलो याचा अभिमान वाटतो, असे त्यांनी सांगितले. आज आपण ५७ वर्षांचे आहोत परंतु इतक्या वर्षांनी प्रथमच राजभवनात यावयास मिळाले, याबद्दल दिलीप जोशी यांनी आनंद व्यक्त केला. यावेळी माजी राज्य मंत्री राजपुरोहित, गुजराती सांस्कृतिक फोरमचे संस्थापक गोपाल पारेख, अध्यक्ष विजय पारेख, सचिव जयेश पारेख,सहसचिव धर्मेश मेहता आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

    follow whatsapp