तारक मेहता का उल्टा चष्मामधून जेठालाल घेणार एक्झिट? दिलीप जोशी म्हणाले...

गेल्या काही दिवसांपासून जेठालाल ही मालिका सोडणार असल्याच्या चर्चा समोर येत आहेत. नुकतंच दिलीप जोशी यांनी या संपूर्ण प्रकरणावर स्पष्टीकरण दिले आहे.
तारक मेहता का उल्टा चष्मामधून जेठालाल घेणार एक्झिट? दिलीप जोशी म्हणाले...

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक म्हणून ओळखली जाते. यातील जेठालाल ही भूमिका तर प्रेक्षकांच्या मनावर राज्य करते. जेठालाल हे पात्र साकारणारे अभिनेता दिलीप जोशी हे घराघरात प्रसिद्ध आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून जेठालाल ही मालिका सोडणार असल्याच्या चर्चा समोर येत आहेत. नुकतंच दिलीप जोशी यांनी या संपूर्ण प्रकरणावर स्पष्टीकरण दिले आहे.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. ही मालिका फक्त आपल्या देशात नाही तर परदेशातही लोकप्रिय आहे. या मालिकेत दयाबेनची भूमिका साकारणारी दिशा वकानीने २०१७ मध्ये ही मालिका सोडली. मुलीच्या जन्मानंतर ती शोमध्ये दिसली नाही. त्यानंतर आता लवकरच जेठालाल म्हणजे दिलीप जोशीदेखील ही मालिका सोडणार आहेत, अशी चर्चा सुरु झाली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून जेठालाल ही मालिका सोडणार असल्याचे बोललं जात आहे. मात्र नुकतंच दिलीप जोशी यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. दिलीप जोशींनी नुकतंच इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत याबाबतचे स्पष्टीकरण दिले. “सध्या ही मालिका चांगली सुरु आहे. त्यामुळे विनाकारण किंवा इतर कोणत्याही कारणासाठी ही मालिका का सोडून देऊ?” असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला.

“मी या मालिकेचा एक भाग आहे. त्यामुळे जोपर्यंत मी त्या मालिकेचा आनंद घेत आहे तोपर्यंत मी ती मालिका करत राहिन. ज्या दिवशी मला वाटेल की मला आता या मालिकेत आनंद येत नाही, तेव्हा मी याबाबत पुढचा विचार करेन,” असेही दिलीप जोशींनी सांगितले.

“मला इतर अनेक शो आणि मालिकेच्या ऑफर्स येत आहेत. पण मी त्यांच्या स्विकार केलेला नाही. तारक मेहता… ही मालिका चांगली सुरु आहे. त्यामुळे विनाकारण हा शो का सोडायचा. लोक माझ्यावर खूप प्रेम करतात आणि त्यांचे प्रेम विनाकारण नष्ट करायचे नाही,” असेही ते म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in