मीरा-भाईंदर महापालिकेच्या अधिकाऱ्यावर मुंबईत अज्ञातांकडून गोळीबार, जिवीतहानी नाही

मुंबईच्या बोरिवली परिसरातील नॅशनल पार्क भागात मीरा-भाईंदर महापालिकेच्या एका अधिकारावर दोन अज्ञातांनी गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दिपक खंबाईत असं या अधिकाऱ्याचं नाव असून ते मीरा-भाईंदर महापालिकेत सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत आहेत. या गोळीबारात खंबाईत यांना कोणतीही दुखापत किंवा जखम झालेली नसून गोळी त्यांच्या कानाजवळून निघून गेल्याचं समजतंय. मिळालेल्या माहितीनुसार, दोन […]

Mumbai Tak

सौरभ वक्तानिया

• 02:19 PM • 29 Sep 2021

follow google news

मुंबईच्या बोरिवली परिसरातील नॅशनल पार्क भागात मीरा-भाईंदर महापालिकेच्या एका अधिकारावर दोन अज्ञातांनी गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दिपक खंबाईत असं या अधिकाऱ्याचं नाव असून ते मीरा-भाईंदर महापालिकेत सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत आहेत.

हे वाचलं का?

या गोळीबारात खंबाईत यांना कोणतीही दुखापत किंवा जखम झालेली नसून गोळी त्यांच्या कानाजवळून निघून गेल्याचं समजतंय. मिळालेल्या माहितीनुसार, दोन अज्ञात आरोपी बाईकवरुन नॅशनल पार्क परिसरात आले. यावेळी खंबाईत आपल्या स्विफ्ट डिजायर गाडीतून प्रवास करत होते. खंबाईत यांची गाडी नॅशनल पार्क परिसराच्या समोर वळण घेत होती, त्याचवेळी अज्ञातांनी त्यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या.

सुदैवाने या हल्ल्यात खंबाईत यांना कोणतीही जखम झालेली नाही. गोळीबार केल्यानंतर हे दोन आरोपी ठाण्याच्या दिशेने पसार झाल्याचं कळतंय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे दोन आरोपी काळ्या रंगाच्या बाईकवर पांढरे रेनकोट घालून आले होते. संध्याकाळी सहा ते साडे सहा वाजल्याच्या दरम्यान ही घटना घडली. ज्या भागात हा गोळीबार झाला तिकडेच काही अंतरावर विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांचं घर आहे.

दरम्यान घटनेविषयी माहिती मिळताच, स्थानिक पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहचले असून तपासाला सुरुवात झाली आहे. कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्यात याविषयी गुन्हा दाखल झाला असून पोलीस या भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत.

BMC रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे ७ महिन्याच्या गर्भवती महिलेचा मृत्यू? – कुटुंबियांचा आरोप

    follow whatsapp