शहाजीबापू पाटलांची अजित पवारांवर मिमिक्री करत टीका तर शरद पवारांची स्तुती

मुंबई तक

• 11:36 AM • 02 Aug 2022

पुणे: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आज पुणे दौऱ्यावर आहेत. पुरंदर येथील शेतकरी मेळाव्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा पार पडली. यामध्ये माजी मंत्री उदय सामंत, माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील, विजय शिवतारे, शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील तसेच अनेक नेते उपस्थीत होते. यावेळी शहाजीबापूंची फटकेबाजी पाहायला मिळाली. यावेळी शहाजी पाटलांनी शरद पवार (Sharad […]

Mumbaitak
follow google news

पुणे: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आज पुणे दौऱ्यावर आहेत. पुरंदर येथील शेतकरी मेळाव्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा पार पडली. यामध्ये माजी मंत्री उदय सामंत, माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील, विजय शिवतारे, शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील तसेच अनेक नेते उपस्थीत होते. यावेळी शहाजीबापूंची फटकेबाजी पाहायला मिळाली. यावेळी शहाजी पाटलांनी शरद पवार (Sharad Pawar) यांची स्तुती केली आहे तर अजित पवार यांच्या टीका केली आहे.

हे वाचलं का?

शरद पवार, अजित पवारांबद्दल काय म्हणाले शहाजीबापू पाटील?

शहाजीबापू पाटील यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर सासवड सभेमध्ये जोरदार फटकेबाजी पाहायला मिळाली आहे. शरद पवारांबाबत बोलताना पाटील म्हणाले ”जगात कॅन्सर एवढा मोठा आजार नाही तरी असं असताना शरद पवार अजून काम करत आहेत. तर दुसरीकडे अजित पवार आम्हालाच शिव्या देत आहेत. यावेळी शहाजीबापूंनी अजित पवारांची (Ajit Pawar) मिमिक्री केली आहे.

पुढे बोलताना शहाजीबापू म्हणाले ”एकीकडे अजित पवार सर्व राज्य पिंजून काढत होते तर आमचा नेता कुठेच दिसत नव्हता”. यावेळी बापूंनी नाव न घेता उद्धव ठाकरेंवरती टीका केली आहे.

भाषण संपवताना बापूंची डायलॉगबाजी

एकनाथ शिंदे आपल्या ५० आमदरांसोबत गुवाहटीमध्ये असताना शहाजीबापू पाटलांचा एक डायलॉग व्हायरल झाला आहे. काय झाली, काय डोंगर, काय हॉटेल… हा डायलॉगने संपूर्ण महाराष्ट्र व्हायरल झाला आणि शहाजीबापू घराघरात पोहोचले. आजच्या सभेचा शेवट देखील शहाजीबापूंनी याच डायलॉगने केला आहे. यावेळी ते म्हणाले काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल सगळं कसं ओक्केमध्ये, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री ओक्के.

विजय शिवतारेंचे संजय राऊतांवर गंभीर आरोप

”संजय राऊतांच्या नालायकपणामुळे मी निवडणुकीत पराभूत झालो. मी जिथे अठरा हजारांनी प्लस असायचो तिथे काही नेत्यांनी राष्ट्रवादी सोबत संगनमत करुन तिथे मला पाडलं. परंतु एकनाथ भाईंच्या रुपात आम्हला देव भेटला.” असं पुरंदरचे माजी आमदार विजय शिवतारे म्हणाले आहेत.

    follow whatsapp