महागाईवरुन लोकसभेत गोंधळ, काँग्रेसच्या ‘या’ चार खासदारांना केले निलंबीत

लोकसभेत (Monsoon Session) गोंधळ घालणाऱ्या काँग्रेस खासदारांवर सभापतींनी मोठी कारवाई केली असून , त्यांनी काँग्रेसच्या 4 खासदारांना संपूर्ण अधिवेशनासाठी निलंबित केले आहे. निलंबित करण्यात आलेल्या काँग्रेस खासदारांमध्ये मण्निकम टागोर , ज्योती मणी, टीएन प्रतापन आणि रम्या हरिदास यांचा समावेश आहे. स्पीकरने नकार देऊनही हे लोक सभागृहात सतत फलक दाखवून निषेध करत होते. काँग्रेसच्या या सर्व […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 12:25 PM • 25 Jul 2022

follow google news

लोकसभेत (Monsoon Session) गोंधळ घालणाऱ्या काँग्रेस खासदारांवर सभापतींनी मोठी कारवाई केली असून , त्यांनी काँग्रेसच्या 4 खासदारांना संपूर्ण अधिवेशनासाठी निलंबित केले आहे. निलंबित करण्यात आलेल्या काँग्रेस खासदारांमध्ये मण्निकम टागोर , ज्योती मणी, टीएन प्रतापन आणि रम्या हरिदास यांचा समावेश आहे. स्पीकरने नकार देऊनही हे लोक सभागृहात सतत फलक दाखवून निषेध करत होते. काँग्रेसच्या या सर्व खासदारांवर नियम 374 अन्वये कारवाई करण्यात आली आहे.

हे वाचलं का?

या नियमात स्वतच्या मर्जीने आणि जाणूनबुजून सभागृहाचे कामकाज थांबवता येते. याशिवाय या नियमात अध्यक्षांच्या अधिकाराकडे दुर्लक्ष करणे, नियमांचा गैरवापर करणे यांचाही यात समावेश आहे. या सर्व खासदारांवर प्रथम निलंबनाचा प्रस्ताव ठेवण्यात आला, त्यानंतर सर्वांचे एकमताने निलंबन करण्यात आले. स्पीकरच्या या कृतीवर विरोधकांची ही नवी परंपरा हिटलरसारखी असल्याचे म्हटले आहे.

लोकशाहीला कलंक लावणारी ही घटना असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. लोकसभेतील काँग्रेसचे उपनेते गौरव गोगोई यांनी चार निलंबित खासदारांच्या उपस्थितीत पत्रकारांना सांगितले की, “सरकार आमच्या खासदारांना निलंबित करून आम्हाला धमकावण्याचा प्रयत्न करत आहे. या सदस्यांचा काय दोष? ते केवळ जनतेशी निगडित बाबी मांडत होते. काँग्रेस यापुढे झुकणार नाही, असेही ते म्हणाले. निलंबित सदस्य टागोर म्हणाले की, गेल्या सहा दिवसांपासून काँग्रेस महागाईवर चर्चेची मागणी करत आहे, मात्र सरकार याकडे दुर्लक्ष करत आहे.

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांनी काँग्रेस खासदारांना दिला होता इशारा

काँग्रेस खासदारांना निलंबित करण्यापूर्वी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी विरोधी पक्षाच्या खासदारांना दुपारी 3 नंतर चर्चेसाठी तयार राहण्यास सांगितले होते परंतु सभागृहात कोणतेही विरोधी फलक सहन केले जाणार नाही असे ते म्हणाले होते. अध्यक्ष म्हणाले, ”तुम्हाला फलक दाखवायचे असतील तर सभागृहाबाहेर दाखवा. मी चर्चेसाठी तयार आहे, पण माझा दयाळूपणा ही माझी कमजोरी नाहीये”. त्यानंतर त्यांनी लोकसभेचे कामकाज उद्यापर्यंत तहकूब केले.

देशातील जनतेला वाटतं संसद चालली पाहिजे- ओम बिर्ला

काँग्रेसचे खासदार आंदोलन करत असताना संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी विरोधी खासदारांच्या वर्तनाचा निषेध केला आणि सभागृहात फलक घेऊन आलेल्या खासदारांवर कारवाई करण्याची विनंती सभापतींना केली जेणेकरून कामकाज सुरळीत चालेल. यावर ओम बिर्ला म्हणाले की, देशातील जनतेला संसद चालवी असे वाटते आहे. पण हे असे चालू शकत नाही. अशा परिस्थितीत मी पुढे जाऊ शकत नाही.

    follow whatsapp