गेल्या वर्षभरात केंद्र सरकारची कामगिरी कशी होती? वर्षभरात काय काय प्रमुख घटना घडल्या? लोकांचा कल कुणाकडे आहे? या आणि अशा प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी इंडिया टुडे आणि सी व्होटर्सने एक सर्व्हे घेतला. या सर्व्हे दरम्यान लोकांची मतं नेमकी काय आहेत ती जाणून घेतली. यामध्ये एक महत्त्वाचा प्रश्न विचारला गेला होता. ईडी, इन्कम टॅक्स डिपार्टमेंट, सीबीआय अशा यंत्रणांचा गैरवापर भाजपकडून केला जातो आहे का? याबाबत लोकांनी काय मत नोंदवलं जाणून घेऊ.
ADVERTISEMENT
केंद्रीय तपास यंत्रणांचा सरकारकडून गैरवापर हा विरोधकांचा सातत्याने आरोप
केंद्रीय तपास यंत्रणा म्हणजेच ईडी, सीबीआय तसंच अनेकदा आयटी म्हणजेच आयकर विभाग अशा यंत्रणांचा वापर भाजपकडून केला जातो आहे. केंद्र सरकार म्हणजेच मोदी सरकार हा गैरवापर करत आहे असा आरोप महाराष्ट्रातून, पश्चिम बंगालमधून केला गेला. ममता बॅनर्जी हा आरोप करतात. महाराष्ट्रात काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनीही हा आरोप केला. नेमका हाच प्रश्न इंडिया टुडे आणि सी व्होटर्सने लोकांना विचारला.
इंडिया टुडे आणि सी व्होटर्सचा सर्व्हे काय सांगतो?
भाजप केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करते आहे का? हा प्रश्न विचारण्यात आला
याबाबत ३८ टक्के लोकांनी होय असं उत्तर दिलं आहे.
तर २१ टक्के लोकांनी माहित नाही हे उत्तर दिलं आहे
४०.९ टक्के लोकांनी सगळीच सरकारं करतात असं म्हटलं आहे
केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर सरकारकडून होतो आहे असं सर्व्हे करण्यात आलेल्या एकूण लोकांपैकी ३८ टक्के लोकांना वाटतं आहे. तर २१ टक्के लोकांनी माहित नाही असं उत्तर दिलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सगळ्यात मोठा आरोप होतो तो हाच आहे की केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करतात. मात्र सुमारे ४० टक्के लोक असं म्हणत आहेत की सगळीच सरकारं म्हणजे केंद्रात सत्तेत येणार सरकार हे करतात.
विरोधी पक्षांची सरकारं पाडण्याची भाजपची खेळी पटते का? हा प्रश्नही इंडिया टुडे आणि सी व्होटर्सने विचारला होता. त्यावर २४ टक्के लोकांनी हो असं उत्तर दिलं आहे. ३१ टक्के लोकांनी नाही असं उत्तर दिलं आहे. २४ टक्के लोकांनी भाजपचा हात नाही असं म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
