सरकारने शब्द न पाळल्याने उपोषण सुरू करण्याशिवाय पर्यायच उरला नाही-संभाजीराजे

मराठा आरक्षण मिळण्यास किती वेळ लागेल सांगता येत नाही. मात्र आम्ही सात मागण्या केल्या होत्या. त्यापैकी एकही मागणी या सरकारने पूर्ण केलेली नाही. पंधरा दिवसात मागण्या मंजूर करतो असं सरकारने सांगितलं होतं. मात्र आजतागायत काहीही तोडगा काढला नाही. त्यानंतर आम्ही रायगड आणि नांदेडलाही आंदोलन केलं. त्या आंदोलनाची दखलही सरकारने घेतली नाही, इतकं दुर्लक्ष केल्यामुळे उपोषण […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 07:33 AM • 26 Feb 2022

follow google news

मराठा आरक्षण मिळण्यास किती वेळ लागेल सांगता येत नाही. मात्र आम्ही सात मागण्या केल्या होत्या. त्यापैकी एकही मागणी या सरकारने पूर्ण केलेली नाही. पंधरा दिवसात मागण्या मंजूर करतो असं सरकारने सांगितलं होतं. मात्र आजतागायत काहीही तोडगा काढला नाही. त्यानंतर आम्ही रायगड आणि नांदेडलाही आंदोलन केलं. त्या आंदोलनाची दखलही सरकारने घेतली नाही, इतकं दुर्लक्ष केल्यामुळे उपोषण सुरू करण्याशिवाय काही पर्यायच उरला नाही असं संभाजीराजे यांनी म्हटलं आहे.

हे वाचलं का?

खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी आजपासून उपोषणाला सुरूवात केली आहे. मुंबईतल्या आझाद मैदानावर उपोषण सुरू करण्यात आलं आहे. त्याआधी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्याचवेळी त्यांनी आपल्याकडे उपोषणाशिवाय काही पर्यायच उरला नाही असं म्हटलं आहे.

आणखी काय म्हणाले संभाजीराजे?

2013ला मी महाराष्ट्र पिंजत असताना मराठा समाजाच्या संघटना एकत्र आल्या. त्यांनी मला नेतृत्व करायला सांगितलं. त्यानंतर 2013 रोजी आम्ही लाखोच्या संख्येने मोर्चा काढला. त्यानंतर राणे समिती आली आणि आरक्षण मिळालं. ते टिकलं नाही. 2017 रोजी आझाद मैदानात मोर्चा निघाला. त्यावेळी स्टेजवर जाण्याची कुणाचं धाडस नव्हतं. हिंदू-मुस्लिम, दलित-मराठा, ओबीसी-मराठा वाद होण्याची शक्यता होती. इंटेलिजन्स विभाग आणि समन्वयकांनी मला स्टेजवर जायला सांगितलं. तुम्ही स्टेजवर गेला नाही तर गालबोट लागेल असं सांगितलं. त्यामुळे मी स्टेजवर गेलो आणि दोन मिनिटात मनोगत मांडलं. लोकांनी माझं म्हणणं ऐकलं आणि लोकं परत गेली, असं संभाजी छत्रपती यांनी स्पष्ट केलं.

काय आहेत प्रमुख मागण्या?

सारथी संस्थेचा मुद्दा महत्त्वाचा आहे, सारथीसाठी सरकार काय तरतूद करत आहे ते आम्हाला सांगावं.

अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाच्या बाबतीत सरकारच रक्कम देत नाही, संचालक मंडळ नाही. कर्ज परतावे काढत नसल्यानं बँका यापुढं कर्ज मंजूर करणार नाहीत.

वसतीगृहांच्या मुद्द्याकडेही दुर्लक्ष आहे. केवळ आश्वासनं दिली आहेत. अनेक वसतीगृहांचे प्रस्ताव आहेत पण ते प्रलंबित आहेत.

कोपर्डीच्या खटल्याचा निकाल लागून अनेक वर्ष झाली, त्यावर पुढील कारवाई कधी होणार?

आत्महत्या करणाऱ्यांच्या कुटुंबीयांना नोकरीची मागणी प्रलंबितच आहे

मराठा आरक्षण नाही तर किमान या मागण्या मान्य करा, असं आम्ही सरकारला सांगितलं होतं. सरकारच्या सपशेल दुर्लक्षामुळे आम्हाला उपोषण आंदोलन सुरू करावं लागलं असंच संभाजीराजेंनी स्पष्ट केलं.

    follow whatsapp