राज्यात ड्रग्जचा खेळ देवेंद्र फडणवीसांच्या इशाऱ्यावरून; नवाब मलिकांचा गंभीर आरोप

मुंबई तक

• 04:40 AM • 01 Nov 2021

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. समीर वानखेडे यांना राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाने क्लीन चीट दिल्यावरूनही मलिक यांनी प्रश्न उपस्थित केले. पत्रकार परिषेदत बोलताना मलिक म्हणाले,’देशातील मागासवर्गातील लोकांना न्याय देणं ज्यांचं काम आहे. ते स्वतः दाऊद वानखेडे यांच्यासोबत पत्रकार […]

Mumbaitak
follow google news

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. समीर वानखेडे यांना राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाने क्लीन चीट दिल्यावरूनही मलिक यांनी प्रश्न उपस्थित केले.

हे वाचलं का?

पत्रकार परिषेदत बोलताना मलिक म्हणाले,’देशातील मागासवर्गातील लोकांना न्याय देणं ज्यांचं काम आहे. ते स्वतः दाऊद वानखेडे यांच्यासोबत पत्रकार परिषद घेतात. ज्यांनी फसवणूक करून जात प्रमाणपत्र मिळवलं, त्यांचं समर्थन करत आहेत, हे दुर्दैव आहे’, अशी टीका मलिक यांनी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्यावर केली.

नवाब मलिक यांचा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप, म्हणाले…

‘अरुण हरदल हे भाजपचे नेते असतील, पण त्यांना हे समजून घ्यावं लागेल की, मागासवर्ग आयोगाची जबाबदारी, उत्तरदायित्व काय आहे? त्याची कार्यपद्धती समजून घ्यावी लागेल. त्यांचं आचरण कसं असावं. सर्व मर्यादांचा ते भंग करीत आहे, असं आम्हाला वाटतं. खोटं जात प्रमाणपत्र असल्याचा पडताळणी करण्याचा अधिकार मागासवर्ग आयोगाला नाही. देशात के. रामस्वामी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती होते, तेव्हा त्यांनी आदेश दिला होता की देशात प्रत्येक जिल्ह्यात पडताळणी करण्यासाठी समित्या नेमण्यात यावी’, असं सांगत मलिकांनी हरदल यांच्या हस्तक्षेपाबद्दल नाराजी व्यक्त केली.

‘हरदल यांची वर्तणूक संशयास्पद आहे. समीर वानखेडेंनी धर्मांतर न केल्याचं सांगणं. त्यांच्या घरी जाणं. तिथे शूटिंग करणं. मला वाटतं यातून बरेच प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यांना इतकी घाई का आहे? ते असं वागत आहे. संवैधानिक पदावर बसलेला व्यक्ती असं वागू शकतो का? आम्ही याची राष्ट्रपती आणि केंद्रीय सामाजिक न्याय मंत्र्यांकडे तक्रार करणार आहोत’, असं मलिक म्हणाले.

धर्मांतर केलं नाही मी हिंदूच, नवाब मलिकांच्या आरोपांना ज्ञानेश्वर वानखेडेंचं पुरावे दाखवत उत्तर

‘देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीसांनी नदी स्वच्छता मोहिमेविषयी गाणं केलं होतं. त्या गाण्याचा फायनान्स हेड जयदीप राणा आहे. देवेंद्र फडणवीस आणि जयदीप राणाचे जवळचे संबंध आहेत. फडणवीसांचा एक व्यक्ती नीरज गुंडे याच शहरात राहतो. ज्याला भाजप सरकारच्या काळात मुख्यमंत्री निवास, कार्यालयात, सर्व अधिकाऱ्यांच्या कार्यालयात जाण्याची परवानगी होती. पोलिसांच्या बदल्याही तो ठरवायचा. देवेंद्र फडणवीस जेव्हाही नवी मुंबई, पुण्याकडे जायचे, सायंकाळी ते त्यांच्या घरी हजेरी लावायला जायचे. तिथूनच फडणवीसांचा सर्व मायाजाल चालायचा. सरकार बदलल्यानंतर राज्यात ज्या कुठल्या केंद्रीय संस्था आहेत त्यामध्ये हाच फडणवीसांचा वाझे सर्व कार्यालयात फिरताना दिसत आहे’, असा खळबळजनक आरोप मलिकांनी केला.

‘चंद्रकांत पाटील मला कधी खिशात टाकतात त्याची वाट पाहतोय, मग…’ -नवाब मलिक

‘समीर दाऊद वानखेडे हे गेल्या 14 वर्षांपासून या शहरात वेगवेगळ्या विभागांमध्ये काम करत आहेत. त्यांच्या बदलीमागेही राज्याचे माजी मुख्यमत्री देवेंद्र फडणवीस आहेत. त्यांना यासाठीच आणलं गेलं होतं की, त्यांनी पब्लिसिटी करुन निर्दोष लोकांना फसवावं. ड्रग्जचा खेळ मुंबई, गोव्यात सुरु राहावा. मोठं मोठे ड्रग्ज पॅडलर्स मग तो काशिफ खान असो, त्याला सोडलं जातं. ऋषभ सचदेवा, आमिर फर्निचरवाला आणि प्रतिक गाभाला सोडलं जातं. राज्यात सर्व ड्रग्जचा खेळ हा देवेंद्र फडणवीसांच्या इशाऱ्यावर सुरु आहे’, असा दावा मलिकांनी पत्रकार परिषदेत केला.

    follow whatsapp