खासदार सुप्रिया सुळे यांनीही घेतली कोरोना प्रतिबंधक लस

मुंबई तक

• 12:39 PM • 01 Mar 2021

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही आज कोरोनाला प्रतिबंध करणारी लस जे. जे. रूग्णालयात घेतली. त्यांनी ट्विट करून यासंदर्भातली माहिती दिली आहे. रुग्णालयाच्या कर्मचारी श्रद्धा मोरे यांनी लस दिली अशीही माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. १ मार्च म्हणजेच आजपासून तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला सुरूवात केली आहे. आपणही नोंदणी करून लस अवश्य घ्यावी असंही आवाहन सुप्रिया सुळे […]

Mumbaitak
follow google news

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही आज कोरोनाला प्रतिबंध करणारी लस जे. जे. रूग्णालयात घेतली. त्यांनी ट्विट करून यासंदर्भातली माहिती दिली आहे. रुग्णालयाच्या कर्मचारी श्रद्धा मोरे यांनी लस दिली अशीही माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. १ मार्च म्हणजेच आजपासून तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला सुरूवात केली आहे. आपणही नोंदणी करून लस अवश्य घ्यावी असंही आवाहन सुप्रिया सुळे यांनी केलं आहे.

हे वाचलं का?

आजच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही जे. जे. रुग्णालयात कोरोना प्रतिबंधक लस घेतली. त्यानंतर सुप्रिया सुळे यांनीही लस घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी कोरोना प्रतिबंधक लस घेतली. लसीकरणाचा तिसरा टप्पा आता सुरू झाला आहे. ज्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना लस देण्यात येते आहे. तसंच महत्त्वाच्या नेत्यांनाही लस देण्यास सुरूवात झाली आहे. ४५ वर्षे ते ६० वर्षे या वयोगटातल्या असाध्य आजार जसे की उच्च रक्तदाब, मधुमेह असणाऱ्यांनाही लस देण्यात येते आहे.

    follow whatsapp