डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येला नऊ वर्षे पूर्ण, आत्तापर्यंत काय काय घडलं?

मुंबई तक

• 02:12 AM • 20 Aug 2022

२० ऑगस्ट २०१३ या दिवसाची सकाळ उजाडली ती अत्यंत वाईट बातमीने. पुण्यात मॉर्निंग वॉकसाठी गेलेले महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूल समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर बाईकवरून आलेल्यां हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या. त्याच ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला. आज या दुर्दैवी घटनेना नऊ वर्षे पूर्ण झाली आहेत. पाच जणांवर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा आरोप डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाची […]

Mumbaitak
follow google news

२० ऑगस्ट २०१३ या दिवसाची सकाळ उजाडली ती अत्यंत वाईट बातमीने. पुण्यात मॉर्निंग वॉकसाठी गेलेले महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूल समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर बाईकवरून आलेल्यां हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या. त्याच ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला. आज या दुर्दैवी घटनेना नऊ वर्षे पूर्ण झाली आहेत.

हे वाचलं का?

पाच जणांवर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा आरोप

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाची सुनावणी विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्यासमोर सुरू आहे. मागच्या नऊ वर्षात पाच आरोपींवर आरोप निश्चिती झाली आहे. या सगळ्या आरोपींच्या विरोधात UAPA अॅक्ट अंतर्गत खटला चालवला जावा अशी मागणी CBI ने होती. राज्य सरकारने ही मागणी मान्य केली आहे.

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात आरोपी कोण?

विरेंद्र तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर, अॅड. सचिन पुनाळेकर आणि विक्रम भावे हे पाच आरोपी या प्रकरणातले आहेत.

२० ऑगस्ट २०१३ ला नेमकी घटना काय घडली होती?

२० ऑगस्ट २०१३ या दिवशी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिराच्या बाजूला असलेल्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर गोळ्या घालून हत्या करण्यात आली. हत्या झाली त्यावेळी शिंदे पुलावर सफार्इ करणारा एक पुरुष आणि महिला पुलाच्या दुभाजकावर बसले होते. त्यावेळी जवळच्या एका झाडावर माकड आल्याने आवाज झाला. तसेच कावळ्यांचा आवाज देखील येऊ लागल्याने या दोघांनी त्या दिशेला पाहिले. त्याच वेळी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी गोळ्या झाडल्या. त्यानंतर दाभोलकर काही क्षणात खाली कोसळली. त्यानंतर हे हल्लेखोर जवळच असलेल्या पोलीस चौकीच्या बाजूला पळाले आणि दुचाकीवरून पळून गेले.

सीबीआयने नेमका काय दावा केला आहे?

कट्टरतावादी लोकांना आणि धर्माचं स्तोम माजवणाऱ्या लोकांना डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांनी कडाडून विरोध केला. त्यांनी धर्माच्या नावाखाली सुरू असलेली बजबजपुरी यावर कायमच आपल्या लेखणीतून आणि कृतीतून प्रहार केले. यामुळेच डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या करण्या आली, असा दावाही सीबीआयनं केला आहे. याशिवाय डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे, पत्रकार गौरी लंकेश आणि एम. कलबुर्गी यांच्या हत्येचे धागेदोरे एकमेकांशी गुंतलेले असल्यानं या सर्व हत्या एका कटाचा भाग आहेत असंही केंद्रीय तपासयंत्रणेनं स्पष्ट केलं आहे.

कोण होते नरेंद्र दाभोलकर?

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी त्यांचे वडील बंधू देवदत्त यांच्याकडून सामाजिक कार्याची प्रेरणा घेतली. १९७१ मध्ये समाजवादी युवक दलाच्या स्थापनेपासून डॉ. दाभोलकर हे खऱ्या अर्थाने सामाजित जीवनात आले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या स्थापनेच्या आधी त्यांनी बाबा आढाव यांच्यासोबत एक गाव एक पाणवठा ही मोहीम राबवली. तसंच मराठवाडा विद्यापीठ नामांतर चळवळीतही ते सहभागी झाले होते.

१९८७ मध्ये शाम मानव यांच्यासोबत डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कामाला सुरूवात केली. त्यानंतर १९८९ मध्ये त्यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना केली. अंधश्रद्धा निर्मूलनाचा त्यांचा हा प्रवास अविरतपणे सुरू राहिला. समाजातील बुवाबाजी, भोंदूगिरी, धर्माच्या नावाखाली चाललेली बजबजपुरी यावर त्यांनी कोरडे ओढले.

डॉ. दाभोलकर असं म्हणायचे की,” चमत्कारावर विश्वास ठेवणे आणि ते करणाऱ्या बाबा-बुवाला मान्यता देणे,यातील मुख्य तोटा हा की,अशी माणसे प्रयत्न आणि पुरुषार्थ यावरचा स्वतःचा विश्वास गमावतात,आणि इतरांनीही तो गमवावा असे वातावरण तयार करतात..!” आणि म्हणून या बुवाबाजीच्या जोखडात होरपळून निघालेल्या शोषितांना न्याय आणि श्रद्धेचा बाजार मांडणाऱ्या कुप्रवृत्तीला कायद्याचा धाक बसावा,म्हणून जादूटोणा विरोधी कायद्या होण्यासाठीची लढाईही ते नेटाने आणि अविरत लढत होते. १९९५ पासून सुरु झालेल्या या कायद्याचा प्रवास विरोधकांच्या खोडकर प्रचाराच्या आणि नाहक विरोधाच्या गर्तेतून मार्ग काढत अखेर २०१३ ला दाभोलकरांच्या खूनानंतरच संपला.

    follow whatsapp