Disha salian Death प्रकरणात CBI चा दोष नाही : नितेश राणेंचे पुन्हा एकदा ‘मविआ’कडे बोट

मुंबई तक

23 Nov 2022 (अपडेटेड: 02 Mar 2023, 09:36 AM)

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या प्रमाणावर आरोप-प्रत्यारोप झालेल्या दिशा सालियन प्रकरणात आज महत्वाची माहिती समोर आली. दिशा सालियनचा मृत्यू अपघातीच झाल्याचं निरीक्षण सीबीआयने तपासाअंती अहवालात नोंदवलेलं आहे. ‘द इकोनॉमिक टाइम्स’ने दिशा सालियन प्रकरणासंदर्भात सीबीआयच्या अहवालाबद्दल वृत्त दिलं आहे. अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूपूर्वी काही दिवस आधीच त्याची पूर्वीची मॅनेजर दिशा सालियनचा 14व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला […]

Mumbaitak
follow google news

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या प्रमाणावर आरोप-प्रत्यारोप झालेल्या दिशा सालियन प्रकरणात आज महत्वाची माहिती समोर आली. दिशा सालियनचा मृत्यू अपघातीच झाल्याचं निरीक्षण सीबीआयने तपासाअंती अहवालात नोंदवलेलं आहे. ‘द इकोनॉमिक टाइम्स’ने दिशा सालियन प्रकरणासंदर्भात सीबीआयच्या अहवालाबद्दल वृत्त दिलं आहे.

हे वाचलं का?

अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूपूर्वी काही दिवस आधीच त्याची पूर्वीची मॅनेजर दिशा सालियनचा 14व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला होता. या प्रकरणात केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि आमदार नितेश राणे यांनी काही गंभीर आरोप केले होते. राणे पिता-पुत्राकडून आदित्य ठाकरे यांचंही या प्रकरणात नाव घेण्यात आलं होतं. पण, सीबीआयच्या अहवालानं या प्रकरणाला पूर्ण कलाटणी मिळाली आहे.

दरम्यान, या अहवालावर प्रतिक्रिया देताना नितेश राणे यांनी आपण सीबीआयला दोष देत नसल्याचं म्हटलं आहे. राणे यांनी ट्विट करत म्हटलं की, “दिशा सालियन प्रकरणात सीबीआयच्या निरीक्षणासाठी मी दोष देत नाही. कारण या घटनेनंतर 72 दिवसांनी तपास सीबीआयकडे गेला होता. पण 8 जूनपासून महाविकास आघाडी सरकारच्या मदतीने ‘क्लीन अप’ इतकं चांगलं केलं गेलं की, सीबीआय आली तेव्हा त्यांच्या हाती फारसं काही लागलं नाही.”

काय आहे अहवाल?

‘द इकोनॉमिक टाइम्स’च्या वृत्तानुसार “8 जूनला तिच्या वाढदिवसानिमित्त दिशाने तिच्याच घरी गेट-टू-गेदर पार्टी आयोजित केली होती. त्या रात्री दिशाने मद्य प्राशन केलेलं होतं. त्यामुळे तिचा तोल गेला आणि घसरून ती खाली पडली.”

यासाठी दिशा सालियन मृत्यू प्रकरणात जे त्या रात्री पार्टीत सहभागी होते त्या प्रत्यक्षदर्शींचे जबाब तपासण्यात आले. फॉरेन्सिक रिपोर्ट आणि ढकलून दिल्यामुळे होणाऱ्या जखमांचा अभ्यास करण्यासाठी करण्यात आलेल्या सीन रिक्रएटच्या निरीक्षणंही यात बघितली गेली आहेत.

दिशा सालियन सुशांत सिंह राजपूतकडे मदतीसाठी गेली होती?

सुशांत सिंह राजपूत आणि दिशा सालियन या दोन्ही घटना पूर्णपणे वेगवेगळ्या आहेत आणि दोन्ही घटनांचा संबंध जोडणं दुर्दैवी आहे. दिशा सालियनवर हल्ला करण्यात आला आणि ती सुशांत सिंह राजपूतकडे मदतीसाठी गेली होती. तिथे मोठा राजकीय कट केला गेला, आरोपात काहीही तथ्य नाही. तपासात तसं काहीही आढळलेलं नाही, असंही अधिकाऱ्यानं म्हटलं आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे-नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंवर केले होते आरोप

दिशा सालियन आणि अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या मृत्यू प्रकरणांवरून महाराष्ट्रात मोठं राजकारण झालं. सुशांत सिंह राजपूत आणि दिशा सालियनची हत्या करण्यात आल्याचा आरोप केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी केला होत.

दिशा सालियन गर्भवती होती, असा आरोपही करण्यात आला होता. दिशा सालियनवर अत्याचार करण्यात आले आणि तिथे एक मंत्री उपस्थित होता, असं म्हणत राणेंनी अप्रत्यक्षपणे आदित्य ठाकरेंच्या दिशेनं अंगुली निर्देश केले होते.

या प्रकरणात दिशाच्या आई आणि वडिलांनी नारायण राणेंविरुद्ध तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात राणेंची मालवणी पोलिसांनी चौकशीही केलेली आहे. तर नितेश राणेंनीही तर आमचं तोंड बंद करण्याच प्रयत्न होत आहे, असं म्हटलं होतं.

    follow whatsapp