Jayant Patil: “एकवेळ सूर्य पश्चिमेला उगवेल पण बारामतीकर कधीच शरद पवारांना सोडणार नाहीत”

एकवेळ सूर्य पश्चिमेला उगवेल पण बारामतीकर कधीच शरद पवारांना (Sharad Pawar) सोडणार नाहीत असं वक्तव्य राष्ट्रवादीचे (NCP) प्रवक्ते जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केलं आहे. भाजपकडून (BJP) लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) मिशन बारामती (Mission Baratmati) आणि मिशन महाराष्ट्र असं आखलं गेलं आहे. भाजपचं (BJP) नेहमीचं प्रचारतंत्र आहे. मात्र त्यात ते कधीही यशस्वी झाले नाहीत आणि […]

mumbaitak

mumbaitak

मुंबई तक

• 09:48 AM • 07 Sep 2022

follow google news

एकवेळ सूर्य पश्चिमेला उगवेल पण बारामतीकर कधीच शरद पवारांना (Sharad Pawar) सोडणार नाहीत असं वक्तव्य राष्ट्रवादीचे (NCP) प्रवक्ते जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केलं आहे. भाजपकडून (BJP) लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) मिशन बारामती (Mission Baratmati) आणि मिशन महाराष्ट्र असं आखलं गेलं आहे. भाजपचं (BJP) नेहमीचं प्रचारतंत्र आहे. मात्र त्यात ते कधीही यशस्वी झाले नाहीत आणि होणार नाहीत असंही जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं.

हे वाचलं का?

भाजपचं मिशन बारामती काय आहे?

शरद पवारांचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या बारामती मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी भाजपनं रणनीती आखली आहे. भाजपनं बारामती पिंजून काढण्यास सुरूवात केली. या मतदारसंघाचा दौरा लवकरच अर्थमंत्री निर्मला सीतारामन या बारामती दौऱ्यावर येणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने त्यांना ही जबाबदारी देण्यात आली आहे.

‘देशाच्या अर्थमंत्री बारामतीत आल्यास मी त्यांचं स्वागत करेन;’ सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?

गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांबाबत काय म्हटलं होतं?

गणपतीची स्थापना होऊन सातवा दिवस आहे. आपण गणपतीचं विसर्जन करणार आहोत. गणपती पुढच्या वर्षी परत येत असतो. २०२४ पवारांचं विसर्जन करण्यासाठी राज्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे त्याची सुरुवात करायला बारामतीत आले.’

भाजप शिवसेनेला राज्यातील जनतेनं कौल दिला होता. पण एखाद्याचं लुबाडून घ्यायचं. एखाद्याचं हिसकावून घ्यायचं, यात बारामतीकरांना फार आनंद असतो. इथल्या लोकसभेच्या खासदार सुप्रिया सुळे या राज्यात विश्वासघातानं सरकार आलं त्यानंतर पहिल्या अधिवेशनात सुप्रिया सुळे या वरमाई सारख्या धावपळ करत होत्या. जनतेनं सरकार निवडून दिल्यासारखं स्वागत करत होत्या’, अशी टीका पडळकर यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर केली.

बारामती लोकसभा मतदारसंघावर भाजपने लक्ष केंद्रीत केलं आहे. कोणत्याही परिस्थितीत लोकसभेची निवडणूक जिंकायचीच त्यामुळे आम्ही तयारी करत आहोत. 2014 आणि 2019 ची निवडणूक आम्ही हरलो. 2024 चा उमेदवार ठरवायचा आहे. 2014 ते 2024 या काळात प्रचंड बदल झाला आहे. जर आम्ही अमेठी जिंकू शकतो तर बारामतीही जिंकू शकतो. सुप्रिया सुळे यांनी वायनाड सारखा मतदार संघ शोधावा असा खोचक सल्ला त्यांना राम शिंदे यांनी दिला होता. या सगळ्या घडामोडी मागच्या काही दिवसांमध्ये घडत आहेत. मात्र जयंत पाटील यांनी या सगळ्याबाबत सूचक प्रतिक्रिया दिली आहे.

    follow whatsapp