पत्रा चाळ घोटाळा: वर्षा राऊत आणि संजय राऊत यांना समोरासमोर बसवून ईडी चौकशी

मुंबई तक

• 07:45 AM • 06 Aug 2022

शिवसेना खासदार संजय राऊत यांना पत्राचाळ प्रकरणात अटक करण्यात आली आहे. आता त्यांच्या पत्नीला म्हणजेच वर्षा राऊत यांना ईडीने चौकशीसाठी बोलावलं आहे. ईडी कार्यालयात संजय राऊत आणि वर्षा राऊत यांची समोरासमोर बसवून चौकशी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ईडीला संजय राऊत यांच्या घरातून काही कागदपत्रं ईडीला मिळाली. त्यासंदर्भात काही प्रश्न विचारले जाणार आहेत. वर्षा […]

Mumbaitak
follow google news

शिवसेना खासदार संजय राऊत यांना पत्राचाळ प्रकरणात अटक करण्यात आली आहे. आता त्यांच्या पत्नीला म्हणजेच वर्षा राऊत यांना ईडीने चौकशीसाठी बोलावलं आहे. ईडी कार्यालयात संजय राऊत आणि वर्षा राऊत यांची समोरासमोर बसवून चौकशी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ईडीला संजय राऊत यांच्या घरातून काही कागदपत्रं ईडीला मिळाली. त्यासंदर्भात काही प्रश्न विचारले जाणार आहेत. वर्षा राऊत यांच्या बँक खात्यात एक कोटी आठ लाख रूपये जमा झाले होते. त्याविषयी चौकशी केली जाणार आहे.

हे वाचलं का?

पत्राचाळ प्रकरणात ईडीने आता वर्षा राऊत यांची चौकशी सुरू

पत्राचाळ घोटाळा प्रकरणात ईडीने संजय राऊत यांना अटक केल्यानंतर त्यांच्या पत्नी वर्षा राऊत यांचीही चौकशी केली जात आहे. ईडीने वर्षा राऊत यांना समन्स बजावून आज (6 ऑगस्ट) चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं होतं. त्यानुसार वर्षा राऊत आज सकाळी अकरा वाजता चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर झाल्या आहेत. त्यांच्यासोबत मुलगी, जावई आणि संजय राऊत यांचे बंधू आमदार सुनील राऊत देखील होते. वर्षा राऊत यांच्या ईडी चौकशीत आज त्यांच्या बँक खात्यातील व्यवहार आणि जमीन व्यवहारांची चौकशी होण्याची शक्यता आहे.

संजय राऊत यांच्या भांडुप येथील घरी काय घडलं?

२० जुलै आणि २७ जुलैला समन्स बजावल्यानंतर संजय राऊत हे उपस्थित राहिले नाही. संसदेचं अधिवेशन सुरू असल्यानं उपस्थित राहू शकत नाही, असं संजय राऊतांनी ईडी कार्यालयाला कळवलं होतं. दरम्यान, ३१ जुलै रोजी ईडीच्या अधिकाऱ्यांचं एक पथक संजय राऊत यांच्या भांडुप येथील निवासस्थानी दाखल झालं. सकाळी पथक दाखल झाल्यानंतर राऊत यांना अटक होणार, अशी चर्चा सुरू झाली होती.

त्यादिवशी दुपारी चार वाजेपर्यंत ईडीचे अधिकारी संजय राऊत यांच्या घरीच होते. संसदेचं अधिवेशन सुरू असताना ईडी कार्यालयात घेऊन जाऊ शकत नाही, असं संजय राऊतांकडून ईडी अधिकाऱ्यांना सांगितलं जात होतं. संजय राऊतांच्या वकिलांनीही याचं कारणावरून ईडीच्या अधिकाऱ्यांना विरोध दर्शवला. नऊ ते दहा तास चाललेल्या चौकशीनंतर संजय राऊत यांना ईडीने ताब्यात घेतलं. त्यानंतर त्यांना भांडुप येथील निवासस्थानावरून ईडीच्या कार्यालयात नेण्यात आलं होतं. त्यानंतर रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली.

    follow whatsapp