Bypoll : प्रकाश आंबेडकरांचा उद्धव ठाकरेंना मेसेज, ‘मविआ’चं काय होणार?

मुंबई तक

05 Feb 2023 (अपडेटेड: 02 Mar 2023, 09:06 AM)

Prakash Ambedkar-Uddhav Thackeray : कसबा पेठ (Kasba Peth) आणि चिंचवड (Chinchwad) विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीच्या (Assembly bypolls) निमित्ताने राजकारण रंगू लागलं आहे. दोन्ही जागांसाठी भाजपने (BJP) उमेदवार जाहीर केले असून, दुसरीकडे महाविकास आघाडीत (Maha Vikas Aaghadi) उमेदवारीबद्दल चर्चा सुरू आहे. यातच आता शिवसेनेचा (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मित्रपक्ष असलेल्या वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aaghadi) अध्यक्ष प्रकाश […]

Mumbaitak
follow google news

Prakash Ambedkar-Uddhav Thackeray : कसबा पेठ (Kasba Peth) आणि चिंचवड (Chinchwad) विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीच्या (Assembly bypolls) निमित्ताने राजकारण रंगू लागलं आहे. दोन्ही जागांसाठी भाजपने (BJP) उमेदवार जाहीर केले असून, दुसरीकडे महाविकास आघाडीत (Maha Vikas Aaghadi) उमेदवारीबद्दल चर्चा सुरू आहे. यातच आता शिवसेनेचा (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मित्रपक्ष असलेल्या वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aaghadi) अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) ठाकरेंना मेसेज पाठवलाय. याच मेसेजमुळे महाविकास आघाडीत बिनसण्याची शक्यता निर्माण झालीये.

हे वाचलं का?

कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून भाजपकडून प्रयत्न सुरू आहेत. दुसरीकडे महाविकास आघाडी निवडणूक लढवण्यावर ठाम आहे. महाविकास आघाडीकडून चिंचवडची जागा राष्ट्रवादी काँग्रेस, तर कसबा पेठची जागा काँग्रेसकडून लढवली जाणार आहे. असं असलं तरी चिंचवडची जागा शिवसेनेला (उद्धव बाळासाहेब ठाकरे) द्यावी, अशी मागणी संजय राऊतांकडून केली गेली. पण, काँग्रेस आणि राष्ट्रवादी उमेदवार देणार असल्यानं ठाकरेंच्या शिवसेनेला संधी मिळण्याची शक्यता कमीच आहे.

अशात शिवसेनेचा (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नवा पक्ष असलेल्या ‘वंचित’चे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी उद्धव ठाकरेंना निवडणूक लढवण्याचा मेसेज दिलाय. हा मेसेज देताना प्रकाश आंबेडकरांनी गेल्या निवडणुकीची आकडेवारीही सांगितली.

राज ठाकरेंच्या मध्यस्थीनंतरही भाजपचं टेन्शन वाढलं! ‘मविआ’चा निर्णय झाला

प्रकाश आंबेडकर काय म्हणाले ते वाचा…

“आम्ही शिवसेनेकडे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मेसेज पाठवला की, आम्ही दोन्ही पोटनिवडणुका लढवत नाहीये. 2014 ते (शिवसेना) लढले होते, त्यावेळी ते तिसऱ्या क्रमांकावर होते. 2014 मध्ये शिवसेना ज्यावेळी लढली, त्यावेळी त्यांना 65 हजार मतं पडली होती. शिवसेना आणि भाजपची युती असल्यामुळे उमेदवारी मिळाली नाही म्हणून आमच्या पाठिंब्याबरोबर राहुल कलाटे लढले. त्यांना 1 लाख 12 हजार मतं तिथे मिळाली. त्यामुळे शिवसेनेला आम्ही विनंती केलीये की, दोन्ही जागा तुम्ही लढा.”

Dhiraj Lingade : “नाना पटोले म्हणाले, अधिकाऱ्यांना खोक्यांची ऑफर”

प्रकाश आंबेडकर असंही म्हणाले की, “कसब्यातील जी जागा आहे, तीही काँग्रेस मागील चार निवडणुकांत हरत आलेली आहे. तिथे शिवसेनेचा एक प्रेझेन्स आहे. पोटनिवडणूक आम्हाला लढवायची नाही, त्यामुळे आम्ही शिवसेनेला विनंती केली की दोन्ही जागा लढा. त्यामुळे शिवसेना काय भूमिका घेते बघू. आम्ही आमच्या पक्षाच्या वतीने त्यांना कळवलं आहे. त्यांना निर्णय घ्यायचा आहे की काय करायचं?”, असं म्हणत आंबेडकरांनी वंचितच्या वतीने शिवसेनेच्या उमेदवाराला आधीच पाठिंबा जाहीर केलाय.

उद्धव ठाकरे काय भूमिका घेणार?

वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीचा घटक पक्ष नाही, हे प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केलंय. दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनंही वंचित मविआचा भाग नसल्याचं स्पष्ट केलंय. असं असलं तरी ठाकरे मात्र सातत्यानं वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीचा भाग असल्याचं म्हणत आहे. त्यामुळे वंचितसोबतची राजकीय आघाडी आणि मविआतील इतर मित्रपक्षाची मर्जी सांभाळण्याचा पेच ठाकरेंसमोर निर्माण झालाय.

चिंचवड, कसबा पेठ : भाजपची लढाई सोपी होणार? राज ठाकरेंचं ‘मविआ’ला पत्र

चिंचवड पोटनिवडणूक शिवसेनेनं (उद्धव बाळासाहेब ठाकरे) लढवावी, अशी भूमिका पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी मांडलेली आहे. दुसरीकडे येथून राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार देणार आहे. त्यात प्रकाश आंबेडकरांनी ठाकरेंना निवडणूक लढवण्याचा निरोप दिल्यानं ठाकरे काय निर्णय घेतात, याकडे सगळ्यांचं लक्ष असेल. आणखी महत्त्वाची बाब म्हणजे ठाकरेंनी उमेदवार द्यायचा निर्णय घेतला तर महाविकास आघाडीचं काय होणार? असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.

    follow whatsapp