प्रशांत किशोर यांनी काँग्रेस पक्षात येण्यास दिला नकार, सुरजेवालांच्या ट्विटमुळे संपला सस्पेन्स

मुंबई तक

26 Apr 2022 (अपडेटेड: 01 Mar 2023, 08:50 AM)

Prashant Kishor Declines Congress Offer : राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी काँग्रेस पक्षात येण्यास नकार दिला आहे. पक्षाचे वरिष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांनी ट्विट करून यासंदर्भातली माहिती दिली आहे. तसंच प्रशांत किशोर यांनीही यासंदर्भातलं ट्विट केलं आहे. ज्यात त्यांनी काँग्रेस पक्षाची ऑफर नाकारल्याचं स्पष्ट केलं आहे. प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये फुंकणार प्राण?; पक्ष नेतृत्वासमोर मांडली विजयाची […]

Mumbaitak
follow google news

Prashant Kishor Declines Congress Offer : राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी काँग्रेस पक्षात येण्यास नकार दिला आहे. पक्षाचे वरिष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांनी ट्विट करून यासंदर्भातली माहिती दिली आहे. तसंच प्रशांत किशोर यांनीही यासंदर्भातलं ट्विट केलं आहे. ज्यात त्यांनी काँग्रेस पक्षाची ऑफर नाकारल्याचं स्पष्ट केलं आहे.

हे वाचलं का?

प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये फुंकणार प्राण?; पक्ष नेतृत्वासमोर मांडली विजयाची ‘रणनीती’

काय म्हटलं आहे रणदीप सुरजेवाला यांनी?

“प्रशांत किशोर यांच्यासोबत आमची बैठक झाली. त्यानंतर आम्ही प्रदीर्घ चर्चाही केली. काँग्रेस अध्यक्षांनी लोकसभा निवडणूक २०२४ समोर ठेवून एक समिती गठीत केली आहे. प्रशांत किशोर यांना या समितीचे सदस्य म्हणून आम्ही निमंत्रित केलं होतं तसंच पक्षात सहभागी व्हा असंही सांगितलं होतं. मात्र त्यांनी पक्षात यायला नकार दिला आहे. सुरजेवाला असंही म्हणाले आहेत की त्यांनी केलेल्या प्रयत्नांचं आणि दिलेल्या सल्ल्यांचं महत्त्व आम्हाला ठाऊक आहे.”

प्रशांत किशोर यांनी काय म्हटलं आहे?

“मी EAG च्या रूपात काँग्रेस पक्षात सहभागी होण्याचा प्रस्ताव नाकारला आहे. मला त्यांनी निवडणुकांची जबाबदारी घेण्यासही सांगितलं होतं मात्र मी पक्षात सहभागी होण्याचा प्रस्ताव नाकारला. माझ्या मते, काँग्रेसला विविध रचनात्मक सुधारणांची गरज आहे. माझ्यापेक्षा जास्त सामूहिक इच्छाशक्तीही काँग्रेसमध्ये जास्त बदल घडवू शकते.”

काही दिवसांपूर्वीच प्रशांत किशोर यांनी २०२४ च्या निवडणुका समोर ठेवून काँग्रेसला एक प्रेझेंटेशन दिलं होतं. यासंबंधीच काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी एक समिती तयार केली होती. या समितीने एक अहवाल सोनिया गांधी यांना दिला होता, समितीच्या अहवालावर अंतिम निर्णय सोनिया गांधी यांना घ्यायचा होता.

या समितीत प्रियंका गांधी, केसी. वेणुगोपाल, रणदीप सुरजेवाला, पी चिदंबरम, अंबिका सोनी, जयराम रमेश आणि मुकुल वासनिक होते. प्रशांत किशोर यांनी जे प्रेझेंटेशन दिलं त्याबाबत या समितीने विशेष अहवाल दिला होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रेझेंटेशनमधले बहुतांश मुद्दे स्वीकारण्यात आल्याचंच अहवालात म्हटलं होतं. अशात आता प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये जाणार का? या सगळ्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

२०२४ चा विचार केला तर लोकसभा निवडणुकीत काँग्रेस भाजपला हरवू शकेल अशा बळकट स्थितीत नाही. १०० पेक्षा जास्त जागा जिंकल्या तरच काँग्रेसची केंद्रात सत्ता येऊ शकते. अशा परिस्थितीत प्रशांत किशोर यांनी काँग्रेसला महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमधून आघाडी करा आणि निवडणूक लढवा असा सल्ला दिला होता.

    follow whatsapp