प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक Avinash Bhosle ना सीबीआयने केली अटक

दिव्येश सिंह

26 May 2022 (अपडेटेड: 01 Mar 2023, 09:05 AM)

पुण्यातले प्रसिद्ध व्यावसायिक अविनाश भोसले यांना सीबीआयने अटक केली आहे. DFHL प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. मागच्या महिन्यात म्हणजेच एप्रिल महिन्यात अविनाश भोसले यांच्या घरावर आणि कार्यालयावर सीबीआयने छापेमारी केली होती. डीएफएचएल घोटाळा प्रकरणी सीबीआयने पुणे-मुंबई या ठिकाणी छापे मारले होते अखेर आज अविनाश भोसले यांना अटक करण्यात आली आहे. Avinash Bhosle यांना ED […]

Mumbaitak
follow google news

पुण्यातले प्रसिद्ध व्यावसायिक अविनाश भोसले यांना सीबीआयने अटक केली आहे. DFHL प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. मागच्या महिन्यात म्हणजेच एप्रिल महिन्यात अविनाश भोसले यांच्या घरावर आणि कार्यालयावर सीबीआयने छापेमारी केली होती. डीएफएचएल घोटाळा प्रकरणी सीबीआयने पुणे-मुंबई या ठिकाणी छापे मारले होते अखेर आज अविनाश भोसले यांना अटक करण्यात आली आहे.

हे वाचलं का?

Avinash Bhosle यांना ED चा दणका, पुण्यातील 4 कोटींची मालमत्ता जप्त

एप्रिल महिन्यात अविनाश भोसले यांच्या घरी आणि अविनाश भोसले इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडशी संबंधित असलेल्या ठिकाणी ही छापेमारी करण्यात आली होती. मुंबई आणि पुण्यातल्या एकूण ८ ठिकाणी ही छापेमारी करण्यात आली होती.

ईडीनं गेल्यावर्षी अविनाश भोसले यांची कोट्यवधींची संपत्ती जप्त केली होती. अविनाश भोसले यांच्या व्यावसायिक भागीदारांवर देखील छापे टाकण्यात आले होते. डीएचएफल येस बँक लोन प्रकरणी अविनाश भोसले यांच्यावर सीबीआयनं ही कारवाई केली आहे. सीबीआयनं अटकेची कारवाई करण्यापूर्वी ३० एप्रिल रोजी छापे टाकण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. गेल्या वर्षी ते ईडीच्या रडारवर होते. त्यांचा मुलगाही या प्रकरणी ईडीच्या रडारवर होता. आता सीबीआयने त्यांना अटक केली आहे.

अविनाश भोसले हे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आहेत. पुण्यासह राज्यातल्या विविध भागांमध्ये त्यांची रिअल इस्टेटमधले यशस्वी व्यावसायिक अशी ओळख आहे. तसंच राजकीय नेत्यांसोबतही त्यांचे चांगले संबंध आहे. त्यामुळेही अविनाश भोसले चर्चेत असतात. काँग्रेसचे नेते आणि राज्यमंत्री विश्वजीत कदम यांचे ते सासरे आहेत. पुण्यातल्या बाणेर या भागात अविनाश भोसले यांचा व्हाईट हाऊस हा बंगला आहे. या हाऊसच्या टेरेसवर त्यांच्या मालकीचं हेलिकॉप्टरही आहे. रिक्षा व्यवसाय करण्यापासून रिअल इस्टेट किंग हा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे.

अहमदनगर जिल्ह्यात असलेल्या संगमनेरमधून अविनाश भोसले नोकरीच्या शोधात पुणे गाठलं होतं. त्यावेळी त्यांनी रिक्षा चालवण्यासही सुरूवात केली. रास्ता पेठ या भागात ते भाडे तत्त्वावरच्या घरात राहायचे. त्यानंतर त्यांनी भाडे तत्त्वावर देण्याचाही व्यवसाय सुरू केला. पुढे भोसले यांची ओळख बांधकाम क्षेत्रातील व्यक्तींशी झाली. राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील काहींच्या माध्यमातून त्यांना रस्त्याची कंत्राटंही मिळू लागली. त्यानंतर अविनाश भोसले हे एक मोठं प्रस्थ होऊ लागलं. आता आज त्यांना सीबीआयने अटक केली आहे. यापुढे काय कारवाई केली जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

    follow whatsapp