Raj Thackeray : केतकी चितळेची शरद पवारांवर खालच्या पातळीवर टीका; राज ठाकरेंनी झापलं

मुंबई तक

14 May 2022 (अपडेटेड: 01 Mar 2023, 08:56 AM)

अभिनेत्री केतकी चितळेच्या फेसबुक पोस्टवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करताना वापरलेल्या भाषेचा राज ठाकरेंनी एक निवेदन प्रसिद्ध करत समाचार घेतला आहे. राज ठाकरे यांनी एका निवेदनातून या प्रकारवर भूमिका मांडली आहे. ‘कोणीतरी केतकी चितळे नामक व्यक्तीने अतिशय खालच्या पातळीवर जाऊन घाणेरड्या शब्दात […]

Mumbaitak
follow google news

अभिनेत्री केतकी चितळेच्या फेसबुक पोस्टवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करताना वापरलेल्या भाषेचा राज ठाकरेंनी एक निवेदन प्रसिद्ध करत समाचार घेतला आहे.

हे वाचलं का?

राज ठाकरे यांनी एका निवेदनातून या प्रकारवर भूमिका मांडली आहे. ‘कोणीतरी केतकी चितळे नामक व्यक्तीने अतिशय खालच्या पातळीवर जाऊन घाणेरड्या शब्दात काहीतरी श्लोकासारखं लिहून फेसबुकवर पोस्ट प्रकाशित केलेली आमच्या निदर्शनास आणली गेली. खाली काहीतरी भावे वैगरे असं नाव टाकलं आहे. हे जे लिखाण आहे त्याला महाराष्ट्र संस्कृतीत जागा नाही. त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो,’ असं राज यांनी म्हटलं आहे.

अभिनेत्री केतकी चितळे पुन्हा वादात, शरद पवारांबद्दल फेसबुकवर टाकली पोस्ट

‘महाराष्ट्राच्या राजकारणात बरीच वर्ष कार्यरत असलेल्या शरद पवारांविरुद्ध तिनं किंवा त्या भावेनं हे लिहणं साफ गैर आहे. विचारांचा मुकाबला विचारांनी करायचा असतो. एखादा हलका विनोद वैगरे आपण समजू शकतो, त्यातली विनोदबुद्धीही आपण ओळखतो. तशी टीका महाराष्ट्राला नव्या नाहीत…! आमचे त्यांच्याबरोबर मतभेद जरुर आहेत आणि राहतील, परंतु अशा घाणेरड्या पातळीवर येणं साफ चूक आहे. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही हे इथे फार स्पष्टपणे सांगणं गरजेचं आहे. असं लिहणं ही एक प्रवृत्ती नव्हे तर मानसिक विकृती आहे, तिला वेळीच आवार घालायला पाहिजे,’ असं भाष्य राज ठाकरे यांनी केलं आहे.

‘चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट म्हणणं हेच आजपर्यत आपल्या महाराष्ट्रातल्या महापुरुषांनी, संतांनी तसेच असंख्य बुद्धीमान विचारवंतानी आपल्याला शिकवलं! कोणीही ह्या राज्याची परंपरा खालच्या पातळीवर नेऊ नये हीच अपेक्षा!,’ अशी खंतही राज ठाकरेंनी या पोस्टवरून व्यक्त केली आहे.

‘केतकी चितळेला चोप दिल्याशिवाय शांत बसणार नाही’; ‘त्या’ फेसबुक पोस्टवर कोण काय म्हणालं?

‘पोस्ट लिहिणाऱ्या व्यक्ती ह्या खरंच आहेत की नवा वाद उकरुन काढण्यासाठी कोणाची तरी उठाठेव सुरु आहे हे देखील तपासणे गरजेचे आहे! कारण ह्या अशाच चार-दोन विकृत टाळक्यांमुळे समजा-समाजामध्ये तेढ निर्माण होते, समाज दुभंगतो. द्वेषाची पातळी किती खालपर्यंत आली आहे हे आता राज्यकर्त्यांनाही समजलं असेलच. हे सगळं महाराष्ट्रात वेळीच आवरणं गरजेचं आहे कारण महाराष्ट्राची ओळख वेगळी आहे. म्हणूनच राज्य सरकारनं ह्याचा नीट छडा लावून ह्या गोष्टींचा ताबडतोब बंदोबस्त करावा,’ असा सल्ला राज ठाकरेंनी राज्य सरकारला दिला आहे.

    follow whatsapp