मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावरुन भाजप खासदारांमध्येच संघर्ष होणार की काय असंच एकूण राजकीय वातावरण पाहायला मिळत आहे. कारण, भाजपच्या उत्तर प्रदेशातील खासदार ब्रिजभूषण सिंग यांनी राज ठाकरे यांच्या दौऱ्याला विरोध केला आहे तर दुसऱ्या खासदाराने राज ठाकरे यांचं स्वागत करू असं जाहीर केलं आहे. त्यामुळे राज यांच्या अयोध्या दौऱ्यामुळे भाजपमध्येच मतभेद झाल्याचं समोर आलं आहे.
ADVERTISEMENT
‘राज ठाकरे यांनी उत्तर प्रदेशातल्या लोकांची माफी मागावी मग अयोध्येत पाय ठेवावा.’ असं भाजपचे खासदार ब्रिजभूषण सिंग वक्तव्य केलं आहे आणि ते त्यावर ठामही आहेत. तर, दुसरीकडे फैजाबादचे भाजपचे खासदार लल्लू सिंग यांनी राज ठाकरे यांच्या दौऱ्याचं स्वागत केलं आहे.
लल्लू सिंग यांनी राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याबद्दलचं आपलं मत ट्विटरवरुन जाहीर केलं आहे. लल्लू सिंग यांनी आपल्या ट्विटमध्ये असं म्हटलं आहे की,
‘हनुमानजींच्या कृपेने अयोध्येत प्रभू श्रीरामाला जो कोणी शरण जाईल. तर त्याचे स्वागतच आहे. राज ठाकरे जी यांना मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची सद्बुद्धी द्यावी, जेणेकरून त्यांचे आणि महाराष्ट्राचे कल्याण होऊ शकेल अशी मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामचरणी प्रार्थना आहे.’
एकीकडे ब्रिजभूषण यांनी राज ठारे यांना विरोध करत आजपासून त्यासाठी चलो अयोध्या महाअभियान रॅली सुरू केली आहे. राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांची माफी मागावी यासाठी ब्रिजभूषण आपल्या मतावर ठाम आहेत. तर दुसरीकडे भाजपचे खासदार लल्लू सिंग यांनी मात्र अयोध्येत प्रभू रामाच्या शरणात जो येईल त्याचं स्वागत आहे. अशा शब्दात राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला पाठिंबा दिला आहे.
इतकंच नाही तर राज ठाकरेंना प्रभू रामाच्या आडून सल्लाही भाजपचे नेते आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याचा सल्ला दिला आहे. ते म्हणतात..
‘प्रभू राम राज ठाकरे यांना सद्बुद्धी देवो आणि राज ठाकरे हे नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली काम करोत ज्याने राज ठाकरे आणि महाराष्ट्राचं कल्याण होईल.’
Brijbhushan Sharan Singh : राज ठाकरेंना आव्हान देणारे ब्रिजभूषण सिंह कोण आहेत?
राज ठाकरेंनी उत्तर प्रदेशातल्या नागरीकांची माफी मागितलीच पाहिजे या मागणीवर ठाम असलेल्या ब्रिजभूषण सिंग यांची समजूत काढणार असल्याचे संकेत भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
आता महाराष्ट्रातले नेते ब्रिजभूषण यांची समजूत काढणार की राज ठाकरे यांच्यावरुन अयोध्येत भाजपच्या नेत्यांमध्ये संघर्ष होणार हे बघणं महत्त्वाचं आहे.
ADVERTISEMENT
