राज्यात निर्बंध अधिक कडक करणार, नियोजन सुरू आहे – राजेश टोपे

मुंबई तक

• 08:02 AM • 31 Mar 2021

मुंबई तक: राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. अशातच काही ठिकाणी लोक मोठ्या प्रमाणावर गर्दी करताहेत. अशा परिस्थितीत गर्दी होण्याच्या ठिकाणी निर्बंद अधिक कडक करण्याबाबत नियोजन सुरू आहेत आणि त्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. आरोग्य मंत्र्यांनी माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. यावेळी टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार […]

MumbaiTak
Google CTA

मुंबई तक: राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. अशातच काही ठिकाणी लोक मोठ्या प्रमाणावर गर्दी करताहेत. अशा परिस्थितीत गर्दी होण्याच्या ठिकाणी निर्बंद अधिक कडक करण्याबाबत नियोजन सुरू आहेत आणि त्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

हे वाचलं का?

आरोग्य मंत्र्यांनी माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. यावेळी टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार लॉकडाऊनबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. त्याबाबत चर्चा मात्र सुरू असते. तसंच लोकं गर्दी करणं टाळत नसल्यामुळे निर्बंध अधिक करण्याबाबतची पावलं राज्य सरकार उचलणारच आहे अशी माहिती आरोग्यमंत्र्यांनी यावेळी दिली. तसंच गर्दी टाळावी हाच त्यामागचा उद्देश असल्याचं त्यांनी सांगितलं. त्याबरोबरच गर्दी होण्याच्या ठिकाणी निर्बंध कडक कऱण्याबाबत नियोजन सुरू असल्याची माहिती त्यांन यावेळी दिली.

लॉकडाउन बाबात कोणताही निर्णय झालेला नाही. चर्चा सुरू असते. निर्बंध अधिक कडक करण्याबाबतची पावलं राज्य सरकार उचलणारच आहे. गर्दी टाळावी हाच त्या मागचा दृष्टीकोन आहे. गर्दी होण्याच्या ठिकाणी निर्बंध कडक करण्याबाबत नियोजन करत आहोत. ते करण्यासाठी आता प्रयत्न करणार आहोत.

सोशल डिस्टन्सिंगचं काटेकोर पालन होण्याची आवश्यकता असल्याचं सांगितलं. जे लोक मास्क वापरतात आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करतात त्यांना कोरोना होत नाही. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन 15 मार्च आणि पुन्हा त्यानंतर निर्बंध अधिक कडक करण्याबाबत नोटिफिकेशन काढण्यात आले आहेत. पण रुग्णसंख्या अशीच असेल आणि लोकांकडून गर्दी करणं टाळ नसतील तर पुन्हा निर्बंध अधिक कडक करावे लागतील असा ईशारा त्यांनी यावेळी दिला.

नियम पाळा लॉकडाऊन टाळा

इम्तियाज जलिल यांनी नुकत्यात घेतलेल्या एका कार्यक्रमाबाबत त्यांना प्रश्न विचारला असता त्यांनी अशा त-हेने गर्दी होणारे कार्यक्रम घेणं हे सध्याच्या परिस्थितीत परवडणारं नसल्याचं त्यांनी सांगितलं. तेव्हा नियम पाळा लॉकडाऊन टाळा असा ईशाराही आरोग्यमंत्र्यांनी यावेळी दिला.

राज्यात बेड्स उपलबद्ध

राज्यात कोरोना रुग्णांसाठी बेड्स उपलबद्ध नाही अशी परिस्थिती कुठल्याही जिल्ह्यात नाही असं स्पष्टीकरण राजेश टोपे यांनी दिलं. काही विशिष्ट दवाखान्यात मोठी मागणी असते. क्रिटिकल पेशंटसाठीचे बेड्स आहेत. अडचणी निर्माण होताहेत. पण काही विशिष्ट रुग्णालयांपुरती ही बाब मर्यादित आहे असंही त्यांनी पुढे सांगितलं. यावेळी बोलताना त्यांनी मुंबईचं उदाहरण दिलं. मुंबईमध्ये आयसीयू बेड्स ४०० च्या दरम्यान, ऑक्सिजन बेड २१६०, व्हेंटिलेटर बेड्स २१३ च्या आसपास उपलबद्ध आहेत अशी माहिती टोपे यांनी यावेळी दिली. त्याचबरोबच बेड्स वाढविण्याच्या सुचना सर्व प्रशासनाला देण्यात आल्याचे ते म्हणाले.