माझ्यामुळे सत्ता गेल्याचं फडणवीसांना दुःख – संजय राऊतांचा निशाणा

विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांत शरद पवार आणि एकनाथ खडसे यांच्या घरी भेट दिल्यामुळे राज्यात राजकीय चर्चांना उधाण आलंय. यादरम्यान सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातला कलगीतुरा काही संपण्याचं नाव घेत नाहीये. संजय राऊतांवर फडणवीसांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना राऊत यांनीही बोचऱ्या शब्दांमध्ये पलटवार केला आहे. “फडणवीसांना माझ्यावर टीका करु द्या, पुढची तीन-साडे तीन वर्ष […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 06:32 AM • 02 Jun 2021

follow google news

विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांत शरद पवार आणि एकनाथ खडसे यांच्या घरी भेट दिल्यामुळे राज्यात राजकीय चर्चांना उधाण आलंय. यादरम्यान सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातला कलगीतुरा काही संपण्याचं नाव घेत नाहीये. संजय राऊतांवर फडणवीसांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना राऊत यांनीही बोचऱ्या शब्दांमध्ये पलटवार केला आहे.

हे वाचलं का?

“फडणवीसांना माझ्यावर टीका करु द्या, पुढची तीन-साडे तीन वर्ष त्यांना हेच करायचं आहे. ते काय बोलले हे मला माहिती नाही, पण सध्या राज्यात कोरोना, महागाई आणि इतर संकट असताना विरोधी पक्षाने सरकारच्या सोबत काम करणं गरजेचं आहे. राजकारण नंतर करता येतं. सध्या असे वाद उकरुन का काढले जातायत? माझ्यामुळे सत्ता गेली याचं फडणवीसांना दुःख आहे, त्यामुळे आपण त्यांना समजून घेतलं पाहिजे”, असं म्हणत राऊतांनी फडणवीसांवर पलटवार केला आहे.

टीका करणं हे विरोधकांचं काम आहे, त्यामुळे फडणवीसांची टीका मी गांभीर्याने घेत नाही असंही राऊत म्हणाले. फडणवीसांच्या पवार आणि खडसेंच्या भेटीनंतर संजय राऊत यांनी राज्यातला विरोधीपक्ष आजा जमिनीवर येतो आहे असं म्हटत टोला लगावला. “राजकारणात कोणीच कोणाचा शत्रू नसतो, वैचारिक मतभेद असू शकतात. फडणवीस पवारांना भेटले, खडसेंना भेटले याचा मला आनंद आहे. आम्ही देखील मित्र आहोत. आम्हीही भेटलो आहेत, भेटत राहू. राजकारणात या गोष्टीच होतच असतात.”

    follow whatsapp