Sidhu Moose Wala वर गोळ्या झाडणाऱ्या पुण्यातल्या संतोष जाधवची आई म्हणते……

मुंबई तक

06 Jun 2022 (अपडेटेड: 01 Mar 2023, 09:05 AM)

स्मिता शिंदे, प्रतिनिधी, सांगली पंजाबी गायक सिद्धू मुसेवालावर गोळ्या झाडणाऱ्या आणि त्याची हत्या करणाऱ्या शार्प शूटर्सची ओळख पटली आहे. यापैकी दोन शूटर्स पुण्यातले आहेत. संतोष जाधव आणि सौरव महाकाळ अशी या दोघांची नावं आहेत. दोन्ही आरोपी हे पुणे जिल्ह्यातले आहेत त्यातला संतोष जाधव हा आंबेगाव तालुक्यातील मंचरचा आहे. मुझे भाई बनना है…. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव […]

Mumbaitak
follow google news

स्मिता शिंदे, प्रतिनिधी, सांगली

हे वाचलं का?

पंजाबी गायक सिद्धू मुसेवालावर गोळ्या झाडणाऱ्या आणि त्याची हत्या करणाऱ्या शार्प शूटर्सची ओळख पटली आहे. यापैकी दोन शूटर्स पुण्यातले आहेत. संतोष जाधव आणि सौरव महाकाळ अशी या दोघांची नावं आहेत. दोन्ही आरोपी हे पुणे जिल्ह्यातले आहेत त्यातला संतोष जाधव हा आंबेगाव तालुक्यातील मंचरचा आहे.

मुझे भाई बनना है….

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील आदिवासी भागातील पोखरी गावच्या पंढरीनाथ विद्यालयात नववी इयत्तेतून शाळा सोडलेला संतोष जाधव पुढे अशा पद्धतीने क्रिमिनल होईल अस कुणालाही स्वप्नातही वाटलं नव्हतं. मात्र वडिलांचे अकाली निधन झाले आणि पुढे मित्रांच्या संगतीने संतोष जाधव वाईट नादाला लागला.”मुझे भाई बनना है” हा वास्तव चित्रपटातला डायलॉग तो नेहमी म्हणत असे.अस तो त्याच्या काही मित्रांसोबत नेहमी बोलत असे.

संतोषचे कुटुंब सामान्य आहे. घरापासून दोन वर्षांपासून दूर आहे.आईसोबत आणि त्याच्या पत्नीसह तो राहात नाही. .घरात नेहमी भांडण करायचा..दीड वर्षांपूर्वी मंचर परिसरात झालेल्या राण्या बाणखेले खून प्रकरणात तो अडकला आणि तो घरी आणि गावात आलाच नाही..वयाच्या तेराव्या वर्षांपासून त्याला वाईट सवयी लागल्या. आई शीता सुनील जाधव मंचर शहरात एका खासगी हॉस्पिटल मध्ये मदतनीस म्हणून काम करत आहेत. मुंबई तकच्या प्रतिनिधी सोबत बोलताना सांगितले की फक्त मित्रांच्या संगतीने वाया गेलाआणि मुलाचा आणि माझा मागील दोन वर्षात काहीही संबंध नाही…संतोष वर मंचर पोलिसात विविध प्रकारचे 3 गुन्हे दाखल आहेत.

सिद्धू मुसेवालाच्या हत्येमागे लॉरेन्स बिश्नोई गँग,
का करण्यात आली हत्या?

सीसीटीव्ही फूटेज ठरलं महत्त्वाचं

सिद्धू मुसेवालाच्या हत्येप्रकरणातील आरोपींना पुणे पोलिसांनी सीसीटिव्ही पाहून ओळखले. पुणे पोलिसांनी सौरभ महाकाळ आणि संतोष जाधव अशी दोघांची नावं असून, दोघेही लॉरेन्स बिश्नोई टोळीतील आहेत. संतोष जाधव ६ महिन्यांपासून फरार आहे. संतोष जाधववर मकोका कायद्यातंर्गत गुन्हा दाखल झालेला आहे. संतोष मंचरचा असून, ओंकार बाणखेलेच्या खूनानंतर तो फरार झाला होता.

मारेकऱ्यांनी सिद्धू मुसेवालाची अक्षरशः केली चाळण, शरीरातून मिळाल्या तब्बल दोन डझन गोळ्या

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष जाधव याचं वय २२ वर्ष असून, त्याची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची आहे. त्याचे वडील मंचरमध्ये एका हॉटेलमध्ये काम करतात, तर संतोष जाधव याला नशेचं व्यसन आहे. सध्या पोलीस या दोघांचाही शोध घेत आहेत.

पंजाबातील मनप्रीत सिंग मन्नू याला पोलिसांनी उत्तराखंडमधून अटक केली. त्याच्यावर सामान आणि शूटर्संना गाडी दिल्याचा आरोप आहे. त्याची चौकशी करण्यात आल्यानंतर आता ७ जणांचा शोध घेतला जात आहे.

    follow whatsapp