क्रूज ड्रग्स पार्टी: Shah Rukh चा मुलगा Aryan ची चौकशी सुरूच, पाहा काय दिला जबाब

दिव्येश सिंह

• 08:06 AM • 03 Oct 2021

मुंबई: मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या एका अलिशान क्रूझवर छापा टाकून NCB च्या टीमने तेथील रेव्ह पार्टीचा पर्दाफाश केला. धक्कादायक बाब म्हणजे याच क्रूझवर बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन (Shahrukh Khan’s son Aryan) हा देखील एनसीबीच्या टीमला आढळून आला. मागील अनेक तासापासून एनसीबीच्या टीमकडून त्याची चौकशी सुरु आहे. तर याप्रकरणी 8 जणांना ताब्यात घेण्यात आलं […]

Mumbaitak
follow google news

मुंबई: मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या एका अलिशान क्रूझवर छापा टाकून NCB च्या टीमने तेथील रेव्ह पार्टीचा पर्दाफाश केला. धक्कादायक बाब म्हणजे याच क्रूझवर बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन (Shahrukh Khan’s son Aryan) हा देखील एनसीबीच्या टीमला आढळून आला. मागील अनेक तासापासून एनसीबीच्या टीमकडून त्याची चौकशी सुरु आहे. तर याप्रकरणी 8 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

हे वाचलं का?

एनसीबी मुंबईचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी आर्यनच्या चौकशीला दुजोरा दिला आहे. त्यांनी सांगितले की. ज्या लोकांची चौकशी केली जात आहे त्यात शाहरुखचा मुलगा आर्यनचाही समावेश आहे. आर्यनला आतापर्यंत अटक करण्यात आलेली नाही. असेही वानखेडे यांनी सांगितले.

आर्यन खानने आतापर्यंत आपल्या जबाबात काय म्हटलंय?

एनसीबीच्या चौकशीत आर्यनने असा दावा केला आहे की, त्या पार्टीमध्ये त्याच्या नावे लोकांना आमंत्रित करण्यात आलं होतं. सूत्रांनी असेही सांगितले की क्रूझच्या आत सुरु असलेल्या पार्टीचा एक व्हिडिओ एनसीबीला सापडला आहे. ज्यामध्ये आर्यन खानही दिसत आहे. पार्टी दरम्यान आर्यनने पांढरा टी-शर्ट, निळा जीन्स, लाल ओपन शर्ट आणि टोपी घातली होती. एनसीबीशी संबंधित सूत्रांकडून असेही समजले आहे की, ज्यांना पकडण्यात आले आहे त्यांच्याकडे रोलिंग पेपर देखील आढळले आहेत.

मोबाइल फोन जप्त, NCB कडून चॅटिंगची तपासणी

एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी शाहरुखचा मुलगा आर्यनचा मोबाइलही जप्त केला आहे. त्याच्या मोबाइलवरून मिळालेल्या चॅट्सची सध्या छाननी केली जात आहे. असे सांगितले जात आहे की, ज्यांना ताब्यात घेण्यात आले आहे त्या लोकांचे देखील मोबाइल फोन जप्त करण्यात आले आहेत आणि त्यांची चौकशी केली जात आहे.

या प्रकरणी दिल्लीहून आलेल्या तीन मुलींनाही ताब्यात घेण्यात आलं आहे. या तिघीही बड्या उद्योगपतींच्या मुली असल्याचं सांगितलं जात आहेत.

एनसीबीच्या दिल्ली मुख्यालयातून संपूर्ण प्रकरणावर लक्ष ठेवले जात आहे. एनसीबीच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, हा तपास फक्त आणि कायद्याच्या कक्षेतच केला जात आहे. जे-जे यामध्ये गुंतले आहेत त्यांच्यावर कारवाई केली जाईल.

दोन महिलांसह 8 जणांना अटक

NCB ने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, 2 ऑक्टोबर रोजी Cordelia क्रूझ जहाजावर छापा टाकण्यात आला आणि तेथे उपस्थित असलेल्या सर्वांची तपासणी करण्यात आली. या दरम्यान, NCB ने MDMA, कोकेन, MD आणि चरस जप्त केलं आहे.

या प्रकरणात आतापर्यंत 8 जणांना अटक करण्यात आली आहे. ज्यात दोन महिलांचा समावेश आहे. एनसीबीने या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Rave Party : आर्यन खानसह रेव्ह पार्टीतील आठ जणांची नावं आली समोर; NCB ने दिली माहिती

एनसीबीने नेमका कसा टाकला छापा?

झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी ही कारवाई केली आहे. ते आपल्या टीमसह मुंबईत या क्रूझवर प्रवासी म्हणून आले होते. जेव्हा क्रूझ खोल समुद्रात पोहचली तेव्हा तिथे ड्रग पार्टी आयोजित करण्यात आली. त्या पार्टीमध्ये ड्रग्जचे मोठ्या प्रमाणात सेवन सुरु असल्याचे दिसून आले

दिल्लीस्थित Namascray Experience या कंपनीने या पार्टीचे आयोजन केल्याचे वृत्त आहे. यावेळी एका प्रवाशाच्या तिकिटाची किंमत तब्बल 80 हजार रुपये एवढी होती. ज्या जहाजावर ही कारवाई करण्यात आली आहे ते मुंबईतील Cordelia Cruise आहे. भर समुद्रात चालणाऱ्या ड्रग्स पार्टीवर छापा टाकून एनसीबीने प्रचंड मोठी खळबळ उडवून दिली आहे. एनसीबीचे समुद्रातील आतापर्यंतचे हे पहिलेच आणि मोठे ऑपरेशन आहे.

    follow whatsapp