Uddhav Thackeray : मोदी आले तरी ‘बाळासाहेबांशिवाय’ मतं मिळू शकत नाहीत!

मुंबई तक

23 Jan 2023 (अपडेटेड: 02 Mar 2023, 09:12 AM)

Uddhav Thackeray on the occasion of balasaheb Thackeray birth anniversary : मुंबई : महाराष्ट्रात कोणी, कितीही आले अगदी मोदी आले तरी त्यांनाही कळून चुकलं आहे की, महाराष्ट्रात बाळासाहेबांच्या नावाशिवाय मत मिळू शकतं नाहीत. हिंमत असेल तर तुम्ही मोदींचा फोटो लावून या आम्ही आमच्या वडिलांचा फोटो घेऊन येतो. बघा कोण जिंकतं? असं म्हणतं उद्धव ठाकरे यांनी भाजप […]

Mumbaitak
follow google news

Uddhav Thackeray on the occasion of balasaheb Thackeray birth anniversary :

हे वाचलं का?

मुंबई : महाराष्ट्रात कोणी, कितीही आले अगदी मोदी आले तरी त्यांनाही कळून चुकलं आहे की, महाराष्ट्रात बाळासाहेबांच्या नावाशिवाय मत मिळू शकतं नाहीत. हिंमत असेल तर तुम्ही मोदींचा फोटो लावून या आम्ही आमच्या वडिलांचा फोटो घेऊन येतो. बघा कोण जिंकतं? असं म्हणतं उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला थेट आव्हान दिलं. ते आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ९७व्या जयंतीनिमित्त षण्मुखानंद सभागृहात आयोजित शिवसैनिकांच्या मेळाव्यात बोलत होते. (Uddhav Thackeray on the occasion of balasaheb Thackeray birth anniversary)

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षही भाजपमध्ये गेले तर आश्चर्य वाटायला नको :

यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, आज मला अमेरिकेचे अध्यक्ष भेटले, काळजीत होते. मला म्हणाले मी मुद्दाम आलो आहे, कारण उद्या मी भाजपात चाललो आहे. राष्ट्राध्यक्षांच्या घरावर एफबीआयने रेड टाकली, तेव्हा काही खोकेवाले त्यांना बोलले, तू असा कसा? भाजपमध्ये किंवा मिंधे गटात ये, त्यानंतर नीट झोप लागेल. त्यामुळे उद्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मिंधे गट किंवा भाजपमध्ये गेले तर आश्चर्य वाटायला नको, असाही टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.

भारताची वाटचाल हुकुमशाहीकडे :

भारताची वाटचाल हुकुमशाहीकडे सुरु असल्याचा आरोप यावेळी ठाकरे यांनी केला. ते म्हणाले, काही वर्षांपूर्वी मी चीनला गेलो होतो. एक दुभाषी आमच्यासोबत होता. काही दिवसांमध्ये तिथं ऑलिम्पिक होणार होतं. त्यामुळे मी त्याला तु बिजिंगमध्ये जा, तुला आणखी चांगले पैसे मिळतील.

यावर मला तो म्हणाला मला जगायचं आहे, त्यामुळे मी बिजिंगमध्ये जाणार नाही. मी विचारलं असं का? तर त्याने कारण सांगितलं, तिथं कोणीही सरकारच्या विरोधात दोन शब्द बोललं तरी तो माणूस दोन दिवसांत गायब होतो. भारताची वाटचाल सध्या याच दिशेने होत असून भारतातलं सरकार हुकूमशाही आणू पाहात आहे.

मुंबई आम्ही तुमच्या हातात पडू देणार नाही :

बँकेत पैसा ठेवून विकास होत नाही, तो पैसा विकासासाठी वापरला पाहिजे असं पंतप्रधान मोदी म्हणाले. त्याचं हे विधान भयंकर आहे. कारण तेव्हाचे लोकप्रतिनिधी आणि आयुक्तांनी मेहनत केली त्यामुळे या ठेवी झाल्या आहेत. पण जनतेच्या पैशांवर डल्ला मारायचा हाच यांचा डाव आहे. यातील पैशांवरुन कर्मचाऱ्यांची पेन्शन, पीएफ, ग्रॅच्युटी आणि इतर गोष्टी दिल्या जातात.

आपण जो कोस्टल रोड करत आहोत तो टोलमुक्त असणार आहे. त्यावर नागरिकांना टोल द्यावा लागणार नाही. उलटं सरकार जे करणार आहे त्यावर टोल लागणार आहे. यांना मुंबईला भिकेला लावायचं, कंगाल करायचं आहे. यांची वाईट नजर मुंबईवर पडली आहे पण ही मुंबई मराठी माणसाने रक्त सांडून मिळवली आहे ती आम्ही तुमच्या हातात पडू देणार नाही, असं आव्हान यावेळी ठाकरेंनी दिलं.

उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे :

  • गद्दार विकले जाऊ शकतात. विकत घेता येऊ शकतं. पण लोकांचं प्रेम विकलं जाऊ शकतं नाही.

  • मला अमेरिकेचे अध्यक्ष भेटले, म्हणाले मी मुद्दाम आलो कारण उद्या मी भाजपमध्ये जात आहे.

  • अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष उद्या मिंधे गट किंवा भाजपमध्ये गेले तर आश्चर्य वाटायला नको.

  • आज वारसा आणि विचारांचे नातू एकत्र आले.

  • देश हुकुमशाहीच्या दिशेने चालला आहे. हिंदुत्व हे थोतांड आहे.

  • काही वर्षांपूर्वी मी चीनला गेलो होतो. जर तिकडे चीनविरोधात बोललं तर माणसं दोन दिवसांत गायब होतात. महाराष्ट्रातही हेच चालू आहे.

  • ज्या कलाकारांनी चितारलं आहे, त्यांना व्यवस्थित वेळ दिला आहे का? काही तरी चितारताय असं व्हायला नको.

  • तैलचित्र लावता हे चांगलं. पण तैलचित्रामागील हेतू वाईट.

  • चोरता चोरता स्वतःचे वडिल विसरु नका.

  • काल म्हणाले, शरद पवारांचं मार्गदर्शन घेतो… मग मी काय करत होतो?

  • कोणीही कितीही मोदी असले तरीही बाळासाहेबांच्या नावाशिवाय महाराष्ट्रात मत मिळू शकत नाही.

  • आमने-सामने या. तुम्ही मोदींचा फोटो लावून या. मी माझ्या वडिलांचा लावतो.

  • जो पर्यंत तुम्ही आहात, लाखो करोडो शिवसैनिक सोबत आहेत, तोपर्यंत मीच पक्षप्रमुख

  • आपण केलेल्या कामाचे यांनी भूमिपूजन अन् उद्घाटन केलं.

  • एसटीपीवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. तर त्या भ्रष्टााचाराला मोदींनी राजमान्यता दिली का?

  • बँकेत पैसा ठेवून विकास होत नाही, तो पैसा विकासासाठी वापरला पाहिजे असं मोदी म्हणाले ते भयंकर आहे.

  • आपण जो कोस्टल रोड करत आहोत तो टोलमुक्त असणार आहे. नागरिकांना टोल लागणार नाही.

  • सरकार जे करणार आहे त्यावर टोल लागणार आहे.

  • ही मुंबई मराठी माणसाने रक्त सांडून मिळवली, ती आम्ही तुमच्या हातात पडू देणार नाही.

    follow whatsapp