ममतादीदीही प्रभू रामचंद्रांच्या भक्त-संजय राऊत

मुंबई तक

• 02:14 PM • 12 Mar 2021

ममतादीदींना यांनी एका सभेत चंडीपाठ अत्यंत अस्खलितपणे म्हणून दाखवलं, त्यावरून त्यांच्या मनातलं हिंदुत्व आम्हाला दिसलं. त्यांच्या मनातही प्रभू रामचंद्र आहेत आणि त्या प्रभू रामचंद्रांच्या भक्त आहेत याची मला खात्री आहे असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या पायाला झालेली दुखापत हा घातपात असल्याचं मी ऐकलं आहे. ही अत्यंत […]

Mumbaitak
follow google news

ममतादीदींना यांनी एका सभेत चंडीपाठ अत्यंत अस्खलितपणे म्हणून दाखवलं, त्यावरून त्यांच्या मनातलं हिंदुत्व आम्हाला दिसलं. त्यांच्या मनातही प्रभू रामचंद्र आहेत आणि त्या प्रभू रामचंद्रांच्या भक्त आहेत याची मला खात्री आहे असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

हे वाचलं का?

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या पायाला झालेली दुखापत हा घातपात असल्याचं मी ऐकलं आहे. ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे याची किंमत भाजपला मोजावी लागेल. तसंच पश्चिम बंगालमध्ये काँटे की टक्कर असली तरीही हा जो अपघात झाला आणि ममतादीदींच्या पायाला जी दुखापत झाली ती लोकांना मुळीच आवडलेली नाही. ही दुखापत नक्कीच चमत्कार घडवेल असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींचं सरकार येणार, शिवसेना २८ जिल्ह्यांमध्ये ममता बॅनर्जींचा प्रचार करत असल्याचंही संजय राऊत यांनी सांगितलं.

आणखी काय म्हणाले संजय राऊत?

ममता बॅनर्जी हे एक असं नेतृत्व आहे की संपूर्ण देशाचं लक्ष त्यांच्याकडे लागलं आहे. पाच राज्यांच्या निवडणुका आहेत पण सर्वाधिक चर्चा होते आहे ती पश्चिम बंगालची. काँटे की टक्कर नक्की आहे. पण तरीही ममता बॅनर्जी आणि त्यांचा पक्ष पुरेसं बहुमत मिळवून सत्तेवर येईल अशी स्पष्ट चिन्हं दिसत आहेत. ममता बॅनर्जींना दुखापत झाली, त्यांचा पाय प्लास्टरमध्ये आहे. लोकांना हा घातपात, हल्ला मुळीच पटलेला नाही. जय श्रीरामचा नारा पश्चिम बंगालमध्ये अनेकांनी दिला आहे.

पश्चिम बंगालमधूनच हिंदुत्वाची मशाल देशात पोहचली. शामाप्रसाद मुखर्जी, राजाराम मोहनरॉय अशी किती तरी हिंदुत्ववादी नेते होऊन गेले. पश्चिम बंगालमध्ये कुणीही जय श्रीराम म्हटलं तरीही त्याला देशद्रोही ठरवलं जात नाही.

ती कोव्हिड व्हॅक्सिन नव्हे, मोदी व्हॅक्सिन! ममता बॅनर्जींचा टोला

    follow whatsapp