Pranit More Solapur : प्रणित मोरेला मारहाण का झाली? सोलापुरातील घटनेवर अभिनेता वीर पहारिया काय म्हणाला?

सोलापूरमधील हॉटेल 24 के मध्ये 2 फेब्रुवारी रोजी स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोर यांने एक शो सादर केला. या कार्यक्रमाच्या शेवटी, 10-12 जणांचा जमाव त्याच्याकडे आला आणि त्याला मारहाण केली.

Mumbai Tak

मुंबई तक

05 Feb 2025 (अपडेटेड: 05 Feb 2025, 12:57 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

स्टँड-अप कॉमेडियन प्रणित मोरेला सोलापुरात मारहाण

point

अभिनेता वीर पहारियावर जोक केल्यामुळे मारहाण?

point

मारहाणीच्या घटनेनंतर काय म्हणाला अभिनेता वीर पहारिया?

Solapur : सोलापुरात स्टँड-अप कॉमेडियन प्रणित मोरे याला मारहाण करण्यात आली आहे. सोलापूर 24 के हॉटेलमध्ये प्रणित मोरेचा स्टँड अप कॉमेडीचा शो होता. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे नातू वीर पहारिया यांच्यावर केलेल्या विनोदामुळे वीर पहारियाच्या समर्थकांना राग आला आणि त्यांनी थेट प्रणित मोरेला मारहाण केली. प्रणित मोरेने त्याच्या इंस्टाग्राम पेजवरुनही ही माहिती दिली आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा >>Rahul Solapurkar : "दिलगिरी सुद्धा नशा करुन मागितली, गुन्हा दाखल झाला पाहिजे", अंधारे, मिटकरी आक्रमक

2 फेब्रुवारी रोजी सोलापूरमधील हॉटेल 24 के मध्ये स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरे यांने एक शो सादर केला.या कार्यक्रमाच्या शेवटी, 10-12 जणांचा जमाव त्याच्याकडे आला आणि त्याला मारहाण केली. तन्वीर शेख हा या गटाचा प्रमुख होता. फोटो काढण्याच्या बहाण्याने प्रणितकडे जाऊन त्यांनी प्रणितला मारहाण कली. प्रणित मोरे याने वीर पहारिया यांच्याबद्दल केलेल्या विनोदावरून त्यांना मारहाण केल्याचा आरोप केला आहे.

प्रणित मोरे या घटनेची तक्रार करण्यासाठी पोलिसांकडे गेले तेव्हा पोलिसांनी त्याकडे लक्ष दिलं नाही. त्यानंतर ही सर्व माहिती प्रणितने त्याच्या सोशल मीडिया इन्स्टा पेजवर टाकली. 

हे ही वाचा >>Kangana Ranaut च्या अडचणी वाढणार? अजामीनपात्र वॉरंट जारी करण्याची जावेद अख्तर यांची कोर्टाकडे मागणी

दरम्यान, प्रणितला मारहाण झाल्याचं कळल्यानंतर वीर पहारिया म्हणाला, "प्रणितसोबत काय झालं याबद्दल मला काहीच माहिती नाही. मी याबद्दल त्याच्या चाहत्यांची माफी मागतो. या घटनेत जो कोणी दोषी असेल त्याच्यावर निश्चितच कारवाई केली जाईल." असे म्हणत वीर पहारियाने प्रणितसोबत झालेल्या घटनेबद्दल माफी मागितली आहे.

माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू वीर पहारिया अलीकडेच अक्षय कुमारसोबत 'स्काय फोर्स' नावाच्या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसला.

    follow whatsapp