TET परीक्षेत कोट्यवधींचा भ्रष्टाचार! तुकाराम सुपेंनी लाटले 1.70 कोटी, देशमुखला मिळाले 1.25 कोटी

मुंबई तक

• 09:07 AM • 17 Dec 2021

राज्यात आरोग्य विभागातील भरती परीक्षा आणि म्हाडा परीक्षा पेपरफुटीची चर्चा सुरू असतानाच शिक्षक पात्रता परीक्षेतील मोठा घोटाळा समोर आला आहे. राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी परीक्षा घेणाऱ्या जी.ए सॉफ्टवेअर कंपनीचा संचालक प्रीतिश देशमुख याला हाताशी धरून टीईटी परीक्षेत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे. पुणे पोलिसांनी या घोटाळ्याचा पर्दाफाश केला असून, आयुक्त तुकाराम सुपे […]

Mumbaitak
follow google news

राज्यात आरोग्य विभागातील भरती परीक्षा आणि म्हाडा परीक्षा पेपरफुटीची चर्चा सुरू असतानाच शिक्षक पात्रता परीक्षेतील मोठा घोटाळा समोर आला आहे. राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी परीक्षा घेणाऱ्या जी.ए सॉफ्टवेअर कंपनीचा संचालक प्रीतिश देशमुख याला हाताशी धरून टीईटी परीक्षेत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे. पुणे पोलिसांनी या घोटाळ्याचा पर्दाफाश केला असून, आयुक्त तुकाराम सुपे यांना अटक केली आहे.

हे वाचलं का?

आरोग्य विभागातील भरती परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणाचा तपास करत असताना पुणे पोलिसांच्या हाताला पेपरफुटी प्रकरणातील मोठे मासे गळाला लागले आहेत. पेपरफुटीचा तपास करत असतानाच म्हाडाच्या परीक्षेतील पेपर फोडला जाणार असल्याची माहिती पुणे पोलिसांच्या सायबरसेलला मिळाली होती. म्हाडाच्या परीक्षेचा पेपर फोडण्याच्या तयारीत असलेल्या आरोपींना अटक केल्यानंतर आता टीईटी परीक्षेत घोटाळा केल्याचं समोर आलं आहे.

MHADA Exam : म्हाडाची परीक्षा घेणाऱ्या संस्थेचा मालकच ‘पेपरफुटीच्या रॅकेट’मध्ये; वाचा कसं फुटलं बिंग?

पोलिसांनी काय सांगितलं?

म्हाडा पेपरफुटी प्रकरणात पोलिसांनी जी.ए. सॉफ्टवेअर कंपनीचा संचालक प्रितीश देशमुख याच्यासह एजंट संतोष हरकळ आणि अंकुश हरकळ यांना पुणे पोलिसांनी अटक केली होती. त्यांची चौकशी करत असताना त्यांनी 2019-2020 मध्ये घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता (TET) परीक्षेत विद्यार्थ्यांकडून पैसे घेऊन निकाल बदलल्याचं सांगितलं. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तथा अध्यक्ष तुकाराम सुपे आणि शिक्षण विभागातील सल्लागार अभिषेक सावरीकर यांच्या मदतीने हे केल्याचं त्यांनी सांगितलं.

त्यानंतर पोलिलांनी 16 डिसेंबर रोजी तुकाराम सुपे आणि अभिषेक सावरीकर यांना चौकशीसाठी बोलावलं होतं. त्यांची सायबर सेल पोलीस ठाण्यात चौकशी करण्यात आली. त्यांनी घोटाळ्याची कबुली दिली. परीक्षा घेण्याची जबाबदारी असलेल्या जी.ए. सॉफ्टवेअर्स कंपनीचा संचालक प्रितीश देशमुख याला हाताशी धरून त्याच्यासोबत असलेल्या संतोष हरकळ व अंकुश हरकळ (रा. सिंदखेडराजा, जि. बुलढाणा) या एजंटच्या मदतीने परीक्षा देणाऱ्या उमेदवारांची माहिती मिळवली.

TET Exam : राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना अटक; पोलिसांची मोठी कारवाई

परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना परीक्षेत पास करण्याचं आश्वासन देऊन त्यांच्याकडून प्रत्येकी 50 ते 1 लाख अशा रकमा घेतल्या. यामाध्यमातून जवळपास 4 कोटी 20 लाख रुपये जमा झाले होते. हे पैसे आरोपींनी आपआपसात वाटून घेतले. यात तुकाराम सुपे यांनी 1.70 कोटी, प्रितीश देशमुख 1.25 कोटी, अभिषेक सावरीकर 1.25 कोटी घेतले. पोलिसांनी केलेल्या चौकशी दरम्यान तुकाराम सुपे आणि अभिषेक सावरीकर यांनी गुन्ह्याची कबुली देताना हे सांगितलं.

    follow whatsapp