नवी दिल्ली: नवीन वर्षात राज्यात कोरोनाच्या लसीकरणाला सुरुवात झाली. सुरुवातीच्या टप्प्यांत हे लसीकरण फक्त सरकारी हॉस्पिटलमध्ये होत होतं. आता खासगी हॉस्पिटलमध्येही लसीकरणाला सरकारने परवानगी दिली असून या लसीकरणासाठी २५० रुपये एवढा दर निश्चीत करण्यात आला आहे. २५० रुपयांमध्ये १०० रुपये सर्विस चार्ज तर १५० रुपये लसीच्या डोसची किंमत असणार आहे. सरकारी रुग्णालयात होणारं लसीकरण मात्र मोफत होणार आहे.
ADVERTISEMENT
प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये होणाऱ्या लसीकरणाबद्दल केंद्र सरकार लवकरच अधिकृत घोषणा करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार कोरोनाच्या लसीची एक किंमत ठरवली जाणार आहे, मात्र या किमतीवर कोणतेही निर्बंध नसणार आहेत. येत्या एक-दोन दिवसांमध्ये केंद्र सरकार खासगी हॉस्पिटलमध्ये कोरोना लसीकरणाबद्दल निर्णय घेण्याची शक्यता आहे.
ु
एक मार्चपासून देशात कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरु होतो आहे. या टप्प्यात ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना लस दिली जाणार आहे. याचसोबत ४५ ते ६० या वयोगटातील लोकांनाही लस दिली जाणार आहे. मात्र या वयोगटातील ज्या व्यक्तीची तब्येत खराब असेल त्यालाच लसीकरणासाठी प्राधान्य दिलं जाणार आहे. पहिल्या टप्प्यात लॉकडाउन काळात सातत्याने रस्त्यावर असलेले आरोग्य विभागाचे कर्मचारी आणि स्वच्छता कर्मचारी यांना कोरोनाची लस देण्यात आली होती.
ADVERTISEMENT
