उद्धव ठाकरे हे तर मातोश्रीचे मुख्यमंत्री-नारायण राणे

मुंबई तक

• 12:06 PM • 16 Feb 2021

महाराष्ट्राला मुख्यमंत्रीच नाहीत, उद्धव ठाकरे हे तर मातोश्रीचे मुख्यमंत्री आहेत अशी खोचक टीका भाजपचे खासदार नारायण राणे यांनी केली आहे. ठाण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. एवढंच नाही तर महाराष्ट्रातले मंत्री खोटेपणा करतात असाही आरोप त्यांनी केला. बोलायचं एक आणि करायचं काहीही नाही अशी या सगळ्या मंत्र्यांची पद्धत आहे असंही नारायण राणेंनी म्हटलं आहे. […]

Mumbaitak
follow google news

महाराष्ट्राला मुख्यमंत्रीच नाहीत, उद्धव ठाकरे हे तर मातोश्रीचे मुख्यमंत्री आहेत अशी खोचक टीका भाजपचे खासदार नारायण राणे यांनी केली आहे. ठाण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. एवढंच नाही तर महाराष्ट्रातले मंत्री खोटेपणा करतात असाही आरोप त्यांनी केला. बोलायचं एक आणि करायचं काहीही नाही अशी या सगळ्या मंत्र्यांची पद्धत आहे असंही नारायण राणेंनी म्हटलं आहे.

हे वाचलं का?

आणखी काय म्हणाले नारायण राणे?

शिवसेनेच्या ज्या ज्या मंत्र्यावर आरोप झाले आहेत त्यांना पाठिशी घालण्याचं काम ठाकरे सरकार करतं आहे. सुशांत आणि दिशा सालियनच्या केसमध्ये काय घडलं? हत्या होती ती आत्महत्या ठरवण्यात आली आणि अभय देण्यात आलं. आता संजय राठोड यांच्या प्रकरणातही तेच घडतं आहे. या सरकारच्या कार्यकाळात महिला सुरक्षित नाहीत असाही आरोप नारायण राणे यांनी केला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पिंजऱ्यातून बाहेर पडत नाहीत अशी टीका आजही नारायण राणे यांनी केली. शिवजयंती साधेपणाने साजरी करायची म्हणजे काय करायचं? आदित्य ठाकरेंच्या समर्थनासाठी मोर्चाला परवानगी मिळते. संजय राठोड यांच्या समर्थनासाठी यवतमाळमध्ये मोर्चाला परवानगी मिळते आणि शिवजयंती साधेपणाने साजरी करायची का? या लोकांना अत्याचार करण्याचं लायसन मिळालं आहे का? या राज्यातली जनता खवळून उठेल तेव्हा यांना पळता भुई थोडी होईल असंही नारायण राणे यांनी म्हटलं आहे.

ठाणे महानगरपालिका यावेळी भाजप स्वबळावर जिंकणार असा दावाही नारायण राणे यांनी केला आहे. ठाण्यात भ्रष्टाचार आणि अनधिकृत बांधकाम हे दोन विषय ठाण्यात नागरिकांमध्ये चर्चेत आहेत असंही नारायण राणे यांनीही म्हटलं आहे.

    follow whatsapp