उद्धव ठाकरे जेव्हा फुलं देऊन राज्यपालांचं स्वागत करतात….

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे अधिवेशनातल्या अभिभाषणासाठी विधानसभेत आले तेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि इतर मंत्र्यांनी त्यांचं फुलं देऊन स्वागत केलं. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि उद्धव ठाकरे यांच्यातला वाद महाराष्ट्राने मागचं वर्षभर पाहिला आहे. विविध मुद्द्यांवरून ठाकरे सरकार आणि राज्यपाल असा सामना रंगला आहे मात्र आज राज्यपाल जेव्हा अभिभाषणासाठी आले त्याआधी त्यांचं फुलं देऊन स्वागत करण्यात […]

mumbaitak

mumbaitak

मुंबई तक

• 09:15 AM • 01 Mar 2021

follow google news

हे वाचलं का?

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे अधिवेशनातल्या अभिभाषणासाठी विधानसभेत आले तेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि इतर मंत्र्यांनी त्यांचं फुलं देऊन स्वागत केलं.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि उद्धव ठाकरे यांच्यातला वाद महाराष्ट्राने मागचं वर्षभर पाहिला आहे. विविध मुद्द्यांवरून ठाकरे सरकार आणि राज्यपाल असा सामना रंगला आहे मात्र आज राज्यपाल जेव्हा अभिभाषणासाठी आले त्याआधी त्यांचं फुलं देऊन स्वागत करण्यात आलं.

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज मराठीतून भाषण केलं. त्यांचं मराठीतलं अभिभाषण हा चर्चेचा विषय ठरला

राज्यपाल सभागृहात आल्यावर सभागृहानेही त्यांचं स्वागत केलं

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना ठाकरे सरकारने मध्यंतरी सरकारी विमानाने प्रवास नाकारला होता. त्यानंतर अनेक दिवसांनी ही भेट झाली. या भेटीत राज्यपालांचं मुख्यमंत्र्यांनी केलेलं स्वागत हा चर्चेचा विषय ठरला.

    follow whatsapp