आज केंद्रीय अर्थसंकल्प; करदाते, शेतकरी वर्गाला सवलती मिळणार?

मुंबई तक

• 01:52 AM • 01 Feb 2021

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मंदावलेलं आर्थिक चक्र, यानंतर अनलॉकच्या माध्यमातून अर्थव्यस्थेला पुन्हा रुळावर आणण्यासाठी केलेले प्रयत्न आणि सर्वसामान्य करदाते, शेतकऱ्यांच्या अपेक्षा अशा भल्यामोठ्या आव्हांनाचा सामना करत केंद्रीय अर्थमंत्री निर्माला सितारामान आज अर्थसंकल्प सादर करतील. कोरोना विषाणूमुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाउन काळात देशाच्या अर्थव्यवस्थेळा खिळ बसला असला तरीही यामधून सावरत नवीन आर्थिक वर्षात गाडी रुळावर आणण्याचं मोठं […]

Mumbaitak
follow google news

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मंदावलेलं आर्थिक चक्र, यानंतर अनलॉकच्या माध्यमातून अर्थव्यस्थेला पुन्हा रुळावर आणण्यासाठी केलेले प्रयत्न आणि सर्वसामान्य करदाते, शेतकऱ्यांच्या अपेक्षा अशा भल्यामोठ्या आव्हांनाचा सामना करत केंद्रीय अर्थमंत्री निर्माला सितारामान आज अर्थसंकल्प सादर करतील. कोरोना विषाणूमुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाउन काळात देशाच्या अर्थव्यवस्थेळा खिळ बसला असला तरीही यामधून सावरत नवीन आर्थिक वर्षात गाडी रुळावर आणण्याचं मोठं आव्हान नरेंद्र मोदी सरकारसमोर आहे.

हे वाचलं का?

कोरोना प्रादुर्भाव आणि लॉकडाउन काळात देशातील आरोग्य व्यवस्थेवर आलेला ताण पाहता या अर्थसंकल्पात आरोग्य, पायाभूत सुविधा यांच्यासाठी भरीव तरतूद असेल अशी सर्वांची अपेक्षा आहे. लॉकडाउनच्या काळात सरकारी तिजोरीप्रमाणे सर्वसामान्य करदात्यांच्या खिशालाही कात्री लागली आहे. त्यामुळे करदात्यांसाठी सरकार काय विशेष सवलती देतं याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. सकाळी ११ वाजता संसदेच्या सभागृहात निर्मला सितारामन अर्थसंकल्प सादर करतील.

कोरोना महामारीसोबतच सध्या केंद्र सरकारसमोर कृषी विधेयकावरुन होणाऱ्या शेतकरी आंदोलनाचंही मोठं आव्हान असणार आहे. अशातच कृषीप्रधान अर्थव्यवस्था असलेल्या देशात निर्मला सितारामन शेतकरी वर्गासाठी काय विशेष योजना आखतात याकडेही सर्वांचं लक्ष असणार आहे. अर्थसंकल्पाआधी आलेल्या आर्थिक सर्वेक्षणात (Economic Survey) २०२१ पर्यंत भारताच्या अर्थव्यवस्थेत ११ टक्क्यांनी वाढ अपेक्षित आहे.

काय असू शकतं आजच्या अर्थसंकल्पात??

१) कोरोना महामारी आणि शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य आणि कृषी क्षेत्रासाठी भरीव तरतूद

२) आरोग्यसेवेसाठी खर्च वाढवण्याकरता सामान करदात्यांवर अधिभार लादला जाऊ शकतो.

३) महामारीच्या काळात नोकरी गमावलेल्या नोकरदार वर्गाला करसवलत मिळण्याची अपेक्षा

४) भारत-चीन सीमेवरील संघर्ष पाहता संरक्षण क्षेत्रातही भरीव तरतूदीची अपेक्षा

    follow whatsapp