जाणून घ्या पाचही राज्याच्या विधानसभा निवडणुकीचे एक्झिट पोल कधी होणार जाहीर?

मुंबई तक

• 09:59 AM • 07 Mar 2022

मुंबई: पाच राज्यापैकी चार राज्याच्या निवडणुका या पार पडल्या आहेत. पण उत्तर प्रदेशमधीसल विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्याचं मतदान आज (7 मार्च) संपणार आहे. या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी 10 फेब्रुवारी रोजी मतदान झाले होतं. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या 7 टप्प्यातील शेवटच्या टप्प्यासाठी आज मतदान पार पडत आहे. या निवडणुकीची मतमोजणी 10 मार्च रोजी होणार आहे. अशा […]

Mumbaitak
follow google news

मुंबई: पाच राज्यापैकी चार राज्याच्या निवडणुका या पार पडल्या आहेत. पण उत्तर प्रदेशमधीसल विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्याचं मतदान आज (7 मार्च) संपणार आहे. या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी 10 फेब्रुवारी रोजी मतदान झाले होतं. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या 7 टप्प्यातील शेवटच्या टप्प्यासाठी आज मतदान पार पडत आहे. या निवडणुकीची मतमोजणी 10 मार्च रोजी होणार आहे. अशा स्थितीत आता मतदानादरम्यान सर्वच राज्याचा नेमता एक्झिट पोल काय असणार याकडेच आता अवघ्या देशाचं लक्ष लागून राहिलं आहे.

हे वाचलं का?

निवडणुकीचा निकाल हा 10 मार्च जाहीर होणार आहे. पण त्याआधी आता सर्व एक्झिट पोलची आकडेवारी आज संध्याकाळी साडे सहा वाजेनंतर समोर येईल. ज्यावरून या पाचही राज्यातील जनतेने निवडणुकीत नेमका कौल कोणाला दिला आहे याचा एक सरासरी अंदाज समोर येईल अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला एक्झिट पोलशी संबंधित काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे देणार आहोत.

एक्झिट पोल म्हणजे काय?

मतदान केल्यानंतर मतदान केंद्राबाहेर आलेल्या मतदाराशी बोलून एक्झिट पोल तयार केला जातो. मतदाराला विचारले जाते की त्याने कोणाला मतदान केले. प्रत्येक मोठ्या निवडणुकीत, अनेक एजन्सी आणि मीडिया हाऊस त्यांच्या स्वत:चा एक्झिट पोल डेटा जारी करतात.

एक्झिट पोल कोण घेतात?

अनेकदा तुम्ही न्यूज चॅनेल्सवर एक्झिट पोल पाहतात. अशा स्थितीत एक्झिट पोल नेमकं कोण घेतात, हा स्वाभाविक प्रश्न तुमच्या मनात नक्कीच आला असेल. खरं तर हे एक्झिट पोल वृत्तवाहिन्या किंवा सर्वेक्षण संस्थांद्वारे घेतले जातात. मतदारांच्या मताच्या आधारे तयार केले जातात. याच आधारे निवडणुकीचा निकाल काय असेल याचा सरासरी अंदाज व्यक्त केला जातो.

जाणून घ्या एक्झिट पोल आणि ओपिनियन पोल

अनेकदा लोक एक्झिट पोल आणि ओपिनियन पोलबाबत गोंधळलेले असतात. या दोन्ही गोष्टी तुमच्या आधीही पाहिल्या असतील. पण एक्झिट पोल आणि ओपिनियन पोल यातील नेमका फरक काय आहे हेच आम्ही आपल्याला सांगणार आहोत.

खरे तर निवडणुकीत मतदान करण्यापूर्वी जनमत चाचणी घेतली जाते. यामध्ये मतदारांचा मूड जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातो. या मताच्या आधारे, जनमत सर्वेक्षण करणारी एजन्सी आगामी निवडणुकीचे भाकीत प्रसिद्ध करते. याउलट मतदानानंतर जे एक्झिट पोल प्रसिद्ध केले जातात. यामध्ये मतदारांना थेट विचारले जाते की त्यांनी कोणाला मतदान केले आहे.

एक्झिट पोलवर काही निर्बंध आहेत का?

होय. सन 2010 मध्ये, लोकप्रतिनिधी कायदा, 1951 मध्ये कलम 126 (A) जोडून, ​​एक्झिट पोलबाबत काही निर्बंध लागू करण्याची तरतूद लागू करण्यात आली होती. या अंतर्गत, निवडणूक आयोगाने निश्चित केलेली मुदत संपेपर्यंत कोणत्याही निवडणुकीदरम्यान एक्झिट पोल जारी करता येणार नाहीत. मतदारांच्या मतावर परिणाम होऊ नये म्हणून यासाठी अशा प्रकारची बंदी घालण्यात आली आहे.

Goa Conclave: गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना तिकिट कारण ‘ते’ लोकांमधून निवडून येतात: CM प्रमोद सावंत

उदाहरणार्थ, यावेळी निवडणूक आयोगाने 10 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 ते 7 मार्च रोजी संध्याकाळी 6.30 वाजेपर्यंत एक्झिट पोलवर बंदी घातली आहे. त्यामुळे आज संधाकाळी साडे सहानंतर सर्व एक्झिट पोल हे जाहीर केले जातील.

    follow whatsapp