भारतात कोरोनाची तिसरी लाट उच्चांक कधी गाठणार? कधी संपणार कहर? IIS च्या संशोधकांनी दिलं उत्तर

मुंबई तक

• 10:40 AM • 07 Jan 2022

भारतात कोरोना वेगाने पुन्हा एकदा हात पाय पसरतो आहे. देशात मागच्या चोवीस तासात 1 लाख 17 हजार 100 नवे रूग्ण आढळले आहेत. ओमिक्रॉनचे देशात एकूण 3007 रूग्ण आहेत. यापैकी 1199 लोक बरे झाले आहेत आणि त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. मात्र आता तिसरी लाट कधी येणार याबाबत IIS च्या संशोधकांनी उत्तर दिलं आहे. भारतीय विज्ञान […]

Mumbaitak
follow google news

भारतात कोरोना वेगाने पुन्हा एकदा हात पाय पसरतो आहे. देशात मागच्या चोवीस तासात 1 लाख 17 हजार 100 नवे रूग्ण आढळले आहेत. ओमिक्रॉनचे देशात एकूण 3007 रूग्ण आहेत. यापैकी 1199 लोक बरे झाले आहेत आणि त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. मात्र आता तिसरी लाट कधी येणार याबाबत IIS च्या संशोधकांनी उत्तर दिलं आहे. भारतीय विज्ञान संस्था आणि भारतीय सांख्यिक संस्था बंगळुरू यांनी एक स्टडी रिपोर्ट समोर आणला आहे.

हे वाचलं का?

कधी असणार तिसऱ्या लाटेचा उच्चांक?

या संशोधकांनी असं म्हटलं आहे की कोरोनाची तिसरी लाट जानेवारीच्या तिसऱ्या आणि चौथ्या आठवड्याच्या मध्यात येऊ शकते. या अभ्यासात असंही म्हटलं आहे की कोरनाची लाट ही मार्चच्या अंतापर्यंत हळूहळू कमी होत जाईल. ओमिक्रॉन व्हेरिएंट आणि कोरोना रूग्ण वाढत असल्याने कोरोनाची तिसरी लाट आणि त्याचा उच्चांक जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात येईल आणि मार्च महिन्याच्या शेवटापासून हळूहळू कोरोना उच्चांक कमी होऊ लागेल असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. एवढंच नाही तर लसीकरण झालं असलं तरीही पुन्हा संक्रमित होणाऱ्या रूग्णांमध्ये वाढ होऊ शकते असंही या अभ्यास अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

या अभ्यासानुसार वृद्ध व्यक्ती, सहव्याधी असलेल्या व्यक्ती, प्रतिकार शक्ती कमी झालेले लोक यांना पटकन कोरोनाची बाधा होऊ शकते. कोरोनाचा उच्चांक म्हणजे रोज 3 ते 6 लाखांच्या घरात रूग्णसंख्या वाढू शकते असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे.

मुंबईकरांनो काळजी घ्या ! Corona ची तिसरी लाट शहरात दाखल – टास्क फोर्समधील सदस्याची माहिती

महाराष्ट्र आणि दिल्लीत कोरोनाचा कहर

महाराष्ट्र आणि दिल्लीत कोरोनाचा कहर पाहण्यास मिळतो आहे. जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात या दोन राज्यांमध्येही कोरोना रूग्णसंख्येचा उच्चांक गाठला जाण्याची शक्यता आहे. सर्वात आधी महाराष्ट्रात कोरोना रूग्णसंख्येचा उच्चांक येऊ शकतो असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यानंतर कोरोनाची दुसरी लाट आली होती. आता जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यापासून ते मार्च महिन्याच्या शेवटापर्यंत ही लाट आणि त्याचा कहर पाहण्यास मिळू शकतो.

Omicron : ओमिक्रॉन व्हेरिएंटला हलक्यात घेऊ नका, WHO च्या प्रमुखांनी दिला इशारा

कोरोनाचा ओमिक्रॉन व्हेरिएंट हा सगळ्या जगासाठीच काळजी वाढवणारा ठरतो आहे. डेल्टाच्या तुलनेत तो कमी धोकादायक आहे असं सांगितलं जातं आहे. मात्र WHO म्हणजेच जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख ट्रेडोस घेब्रेयसस यांनी ओमिक्रॉनला हलक्यात घेऊ नका असं म्हटलं आहे. ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे जगभरात मृत्यू होत आहेत ही बाबही त्यांनी अधोरेखित केली.

कोरोनाचा नवा व्हेरियंट वेगाने संसर्ग होत असून मोठ्या प्रमाणात लोकांना लागण होत असल्याचं सांगितलं आहे. अनेक देशांमध्ये ओमिक्रॉनने डेल्टालाही मागे टाकलं असून याचा अर्थ रुग्णालयांमध्ये गर्दी होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.

ओमिक्रॉन डेल्टाच्या तुलनेत आणि खासकरुन लसीकरण झालेल्यांमध्ये कमी गंभीर असल्याचं दिसून येत आहे, पण याचा अर्थ त्याला सौम्य म्हणून दुर्लक्षित करावं असा होत नाही असंही ट्रेड्रोस यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं. ‘मागील अनेक व्हेरिअंटप्रमाणे ओमिक्रॉनदेखील लोकांना रुग्णालयात दाखल होण्यास भाग पाडत असून मृत्यूसाठी जबाबदार ठरत आहे.’ असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

    follow whatsapp