बहिणीच्या साखरपुड्याला चाललेल्या महिलेचा रेल्वेतच अंत; प्रशासन जबाबदार? मृत्यूचे कारण…

मनीष जोग – जळगांव जळगाव: राजस्थान (कोटा) येथून पुण्याला आपल्या बहिणीच्या साखरपुड्याला निघालेल्या एका २५ वर्षीय महिलेचा प्रवासातंच मृत्यू झाला आहे. संबंधित महिला AC डब्यातून प्रवास करत होती. अचानक प्रकृती बिघडल्याने महिलेचा मृत्यू झाला आहे. तरुणीच्या मृत्यूला रेल्वे प्रशासनाचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. वेळीच भुसावळ येथे उपचारासाठी दाखल करून घेतलं असत तर या […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 12:49 PM • 21 Jul 2022

follow google news

मनीष जोग – जळगांव

हे वाचलं का?

जळगाव: राजस्थान (कोटा) येथून पुण्याला आपल्या बहिणीच्या साखरपुड्याला निघालेल्या एका २५ वर्षीय महिलेचा प्रवासातंच मृत्यू झाला आहे. संबंधित महिला AC डब्यातून प्रवास करत होती. अचानक प्रकृती बिघडल्याने महिलेचा मृत्यू झाला आहे. तरुणीच्या मृत्यूला रेल्वे प्रशासनाचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. वेळीच भुसावळ येथे उपचारासाठी दाखल करून घेतलं असत तर या तरुणीचा जीव वाचला असता या तरुणीच्या मृत्यप्रकरणी लोहमार्ग पोलिस दुरक्षेत्र, पाचोरा येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

कोटा (राजस्थान) येथील रहिवाशी वाघिषा संजय फोतेदार (वय – २५) या दि. २० जुलै रोजी सकाळी ८ वाजुन ३० मिनिटांनी हजरत निजामुद्दीन (दिल्ली) रेल्वे स्थानकावरुन कर्नाटका संपर्क क्रांती एक्स्प्रेस ने (क्रमांक – १२६३०) डब्बा नंबर बी- ५ सिट क्रंमाक- १ वरुन पुणे येथे चुलत बहिणीच्या साखरपुड्यात निघाली होती. दरम्यान रेल्वे ही भुसावळ स्थानकावर आल्यानंतर वाघिषा हिची प्रकृती अचानक बिघडली. वाघिषा हिला अस्वस्थ वाटु लागल्याने तिने तिच्या जवळ असलेली मेडिसिन घेतली. आणि परिवाराशी संपर्क केला असता मेडिकल सुविधा मिळावी म्हणून तिने एसी कोचच्या अटेंडन्टकडे मागितली असता भुसावळ स्थानकात डॉक्टरांनी तपासणी करुन औषधी दिली. त्यानंतर वाघिषाचा पुढचा प्रवास सुरू झाला.

रेल्वे एक्स्प्रेसमध्ये भुसावळ ते जळगाव दरम्यान कुठे तरी तिची प्राणज्योत मालवली. भुसावळ रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाचोरा येथे संपर्क करुन वाघिषाला खाली उतरविण्याच्या सुचना दिल्या. मात्र पाचोरा स्थानकावर गाडी आली खरी मात्र तिला बोगितुन खाली उतरविण्याच्या आधीच तिची प्राणज्योत मालवली होती. वाघिषाचा दि. २१ जुलै रोजी पहाटे ३ वाजुन ३० वाजता मृत्यू झाला असल्याची माहिती आहे. घटनेची माहिती पाचोरा काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांना कळताच सचिन सोमवंशी हे तात्काळ रेल्वे स्थानकावर दाखल झाले.

वाघिषा हिला लोहमार्ग पोलिस दुरक्षेत्र, पाचोराचे हेड कॉन्स्टेबल मधुसूदन भावसार, आर. पी. एफ. पाटील, रुग्णवाहिका चालक अमोल पाटील यांच्या मदतीने येथील विघ्नहर्ता मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलला नेण्यात आले. मात्र तोपर्यंत वाघिषाचा मृत्यू झालेला होता. सचिन सोमवंशी यांनी तात्काळ वाघिषाच्या परिवारास घटनेची माहिती कळविल्यानंतर वाघिषा हिचे वडिल, आई हे पुण्याहुन पाचोरा येथे दाखल झाले असता त्यांनी हंबरडा फोडला. घटनेप्रकरणी लोहमार्ग पोलीस दुरक्षेत्र, पाचोरा येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास चाळीसगाव चे ए. पी. आय. किसन राख यांच्या मार्गदर्शनाखाली ए. एस. आय. ईश्वर बोरुडे हे करीत आहे.

दरम्यान जर रेल्वे विभागाच्या कमर्शियल विभागाने गांभीर्याने वाघिषाला भुसावळ येथे उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केले असते तर कदाचित तिचा जीव वाचला असता. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच तिचा मृत्यू झाल्याचा आरोप तिचे नातेवाईक करीत होते. या घटनेत जर वातानुकूलित डब्यातील व्हीआयपी प्रवाशांची ही परिस्थिती तर सामान्य प्रवाशाचे काय असा प्रश्न उपस्थितीत होतो. वाघिषाच्या मृत्यूस जबाबदार अधिकारी यांची चौकशी करून तात्काळ कारवाई करा अशी मागणी होत आहे.

    follow whatsapp