29 MNC Result LIVE: महाराष्ट्रातील 29 महापालिकांच्या मतमोजणीला सुरुवात, पाहा LIVE अपडेट

29 MNC Result LIVE : महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी काल म्हणजेच 15 जानेवारी रोजी मतदान पार पडलं असून आज मतमोजणीला सुरूवात होणार आहे. या निवडणूकीचा निकाल आणि लाइव्ह अपडेट्स हे आपल्याला मुंबई Tak वर पाहता येईल.

maharashtra 29 municipal corporation election results live who will be in power in maharashtra 29 municipal corporations see live updates shiv sena bjp shiv sena ubt mns congress

Maharashtra 29 MNC Result LIVE Update

मुंबई तक

16 Jan 2026 (अपडेटेड: 16 Jan 2026, 12:38 PM)

follow google news

29 MNC Result LIVE : महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी काल (15 जानेवारी) मतदान पार पडले असून, राज्य निवडणूक आयोगाने सरासरी ४६-५०% मतदान झाल्याचा अंदाज वर्तवला आहे. मतमोजणी आज (16 जानेवारी) सकाळी 10 वाजता सुरू होणार असून, निकाल हळूहळू जाहीर होतील. आम्ही आपल्याला राज्यातील 29 महापालिकांच्या निकालाचे LIVE UPDATE हे देणार आहोत.

हे वाचलं का?

महाराष्ट्रातील 29 महापालिकांच्या निकालाचे LIVE अपडेट

नाशिक
भाजपच्या सुधाकर बडगुजर यांना मोठा धक्का. स्वतःच्या घरात भाजपचे ४ तिकीट घेणाऱ्या बडगुजर यांना मोठा धक्का.
प्रभाग २५ चा निकाल समोर, ४ पैकी २ जागेवर भाजप तर एका जागेवर शिंदेंची शिवसेना आणि एका जागेवर ठाकरेंच्या शिवसेनेचा उमेदवार विजयी.
प्रभाग क्रमांक २५ मध्ये भाजपचे सुधाकर बडगुजर आणि भाजपच्या साधना मटाले विजयी, तर इतर २ जागांवर शिंदेंच्या सेनेच्या कविता नाईक विजयी आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे मुरलीधर भांबरे विजयी.
भाजपने पुरस्कृत केलेले भाग्यश्री ढोमसे आणि प्रकाश अमृतकर पराभूत, तर प्रभाग 29 मधून बडगुजर  यांचे सुपुत्र दीपक बडगुजर मागे, अपक्ष मुकेश शहाणे आघाडीवर.

नांदेड महानगरपालिका निकाल 
आघाडीवर 
भाजप - 15
काँग्रेस - 2
राष्ट्रवादी (AP)- 1
राष्ट्रवादी (SP)- 
शिवसेना - 4
शिवसेना (UBT)- 
वंचित - 
MIM-2
इतर -1

धुळे ब्रेकिंग..

प्रभाग क्रमांक 3 भारतीय जनता पार्टीचे चारही उमेदवार विजयी.

 देवेंद्र सोनार
 मीनल परदेशी 
 सनी चौधरी 
 शोभा बिल 

चारही उमेदवार विजयी

प्रभाग क्रमांक 5 मध्ये भाजपचे 4 ही उमेदवार विजयी

नागसेन बोरसे भाजपा
प्रतिभा चौधरी
संध्या कदम
कृपेश नांद्रे

हे चारही उमेदवार विजयी.

प्रभाग 8 मधून शिंदे सेनेच्या छाया आहिरे विजयी*

प्रभाग 17 मधून शिंदेसेनेचे धीरज कलंत्री व गीता तुषार नवले विजयी*

प्रभाग 14 मधून एमआयएमचे* 

मनसुरी मुख्तार कासिम

हसीना बानो साजिद अली 

शेख शहाजन बिस्मिल्ला 

मिर्झा शोएब नवाब बेग  

सर्व विजयी

प्रभाग क्रमांक 1 मधून चारही भाजपचे उमेदवार विजयी.

सुभाष जगताप
ललित माळी
योगिता कुटे 
उज्वला भोसले 

चारही भाजपचे उमेदवार विजयी

प्रभाग 5 भाजप विजयी

१)समाधान आवळे अ(अनुसूचित जाती)
2)अल्का भवर ब (ओबीसी महिला)
3)मंदाकिनी तोडकरी-क(सर्वसाधारण महिला)
4)बिज्जू प्रधाने ड(सर्वसाधारण)

जळगाव महानगरपालिका 
भाजपा - 22
शिवसेना शिंदे गट - 15
राष्ट्रवादी - 01
अपक्ष - O1

विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडेंचे पुत्र सिद्धार्थ बनसोडे आघाडीवर. केवळ 52 मतांची आघाडी. भाजपचे उमेदवार कमलेश वाळके यांच्यासोबत अटीतटीची लढत.

सोलापूर महानगरपालिका


प्रभाग 19 भाजप विजयी
1)कविता जंगम अ(ओबीसी महिला)
2)व्यंकटेश कोंडी ब(ओबीसी)
3)कलावती गडगे क(सर्वसाधारण महिला)
4)बसवराज केंगनाळकर ड(सर्वसाधारण)


प्रभाग 23...भाजप विजयी
१)सत्यजित वाघमोडे अ(अनुसूचित जाती)
२)आरती वाकसे ब(ओबीसी महिला)
३)ज्ञानेश्वरी देवकर-क-(सर्वसाधारण महिला)
४)राजशेखर पाटील -ड(सर्वसाधारण)

प्रभाग 5....भाजप विजयी

१)समाधान आवळे अ(अनुसूचित जाती)
2)अल्का भवर ब (ओबीसी महिला)
3)मंदाकिनी तोडकरी-क(सर्वसाधारण महिला)
4)बिज्जू प्रधाने ड(सर्वसाधारण)

पिंपरी चिंचवड महापालिका

एकूण जागा - 128

भाजप - 70

शिवसेना - 06

राष्ट्रवादी - 40

काँग्रेस - 00

शिवसेना (उद्धव ठाकरे) - 00

राष्ट्रवादी (शरद पवार) - 01

महाराष्ट्र नवनिर्माण सेना - 01

इतर (वंचित, सप, एमआयएम, आप, बसपा) - 01

चंद्रपूर मनपा निकाल 
प्रभाग क्रमांक 10 एकोरी
विजयी उमेदवार
अ गट
1) राहुल घोटेकर काँग्रेस
ब गट
2) संजीवनी वासेकर काँग्रेस
क गट
3) साफिया तवंगर काँग्रेस
ड गट
4) अझररद्दीन शेख एमआयएम

जालना 
65 पैकी 17 जागांचे निकाल हाती.

12 भाजपा
3 काँग्रेस
1 शिंदे शिवसेना 
1 इतर

नागपूर

नागपूरमधील ज्या मतदारसंघात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय आहे, त्या मतदारसंघात भाजपचे चारही उमेदवार आघाडीवर आहेत.

नाशिक निवडणूक मतमोजणी ब्रेकिंग
नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग १६ चा निकाल
शिवसेना (शिंदेचे) चारही उमेदवार विजयी.
राहुल अशोक दिवे 
चेतन गणेश धराडे  
पूजा प्रवीण नवले
ज्योती अनिल जोंधळे

 

कोल्हापूर ब्रेकिंग 

शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांचे पुत्र ऋतुराज क्षिरसागर विजयी

मनपा निवडणुकीच्या आधी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातुन काँग्रेसमधे दाखल झालेले प्रशांत जगताप प्रभाग क्रमांक १८ मधून विजयी झालेत. मात्र त्याच प्रभागातील दुसऱ्या गटातुन लढणाऱ्या त्यांच्या आई रत्नप्रभा जगताप यांचा मात्र पराभव झालाय.

चंद्रपूर ब्रेकिंग 

चंद्रपुरात एमआयएम ने उघडला खातं. 

एम आय एम चे उमेदवारअझहर शेख विजय

कोल्हापूर

प्रभाग क्रमांक चार मध्ये काँग्रेसचे चारही उमेदवार विजयी

स्वाती कांबळे, विशाल चव्हाण,दिपाली घाडगे, राजेश लाटकर

अहिल्यानगर महानगरपालिका निवडणूक 

एकूण जागा - 68  

बिनविरोध - 5, भाजपा 3 राष्ट्रवादी 2

भाजपा 15
राष्ट्रवादी - 20

युती  - 36

शिवसेना - 6

बसपा  - 1

महाविकास आघाडी - 1

उबाठा - 1

 

जालना

जालन्यात भाजप उमेदवारांच्या जल्लोषाला सुरुवात झालीय. गुलालाची उधळण करत भाजपचे विजयी उमदेवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केलाय. जालन्यात आतापर्यंत 65 पैकी 12 जागांवर भाजपा विजयी झालीय. जालना महानगरपालिकेची निवडणूक भारतीय जनता पार्टीने स्वबळावर लढवत सर्व 65 जागांवर उमेदवार दिले होते. त्यापैकी आतापर्यंत बारा जागांवर भाजपा मोठ्या मताधिक्याने निवडून आली आहे.

नाशिक 
प्रभाग 15
फेरी 4

उबाठाचे महानगर प्रमुख प्रथमेश गीते 1857 मतांनी पिछाडीवर, मिलिंद भालेराव भाजपचे आघाडीवर.

माजी आमदार वसंत गीते यांचे पुत्र आणि ठाकरे सेनेचे महानगरप्रमुख सलग तिसऱ्या फेरीत पिछाडीवर .

प्रभाग 15 मध्ये भाजपचे तीनही उमेदवार आघाडीवर.

 

जालन्यात भाजप उमेदवारांच्या जल्लोषाला सुरुवात...

गुलालाची उधळण करत भाजप उमदेवार आणि त्यांच्या कार्यकर्ते करताय जल्लोष.

जालन्यात 65 पैकी 12 जागांवर भाजपा विजयी

अमरावती
प्रभाग क्रमांक ४ मध्ये एमआयएमचे पॅनेल विजयी

पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजपची बहुमताकडे वाटचाल, आघाडीत मॅजिक फिगर ओलांडली.

पुणे 
भाजप-५०
राष्ट्रवादी- ५
कांग्रेस- ५

पिंपरी चिंचवड महापालिका

एकूण जागा - 128

भाजप - 65

शिवसेना - 04

राष्ट्रवादी - 28

काँग्रेस - 00

शिवसेना (उद्धव ठाकरे) - 00

राष्ट्रवादी (शरद पवार) - 00

महाराष्ट्र नवनिर्माण सेना - 00

इतर (वंचित, सप, एमआयएम, आप, बसपा) - 01

कल्याण डोंबिवली मनपा मतगणना...

पॅनेल क्र . 7 

मनसे का दूसरा उम्मीदवार विजयी 

गणेश लांडगे - मनसे - विजयी

नागपूर महानगरपालिका-

एकुण जागा- 151

आघाडी -

भाजप- 75
शिवसेना- 03
राष्ट्रवादी- 00
ठाकरे- 00
काँग्रेस- 26
मनसे-00
शरद पवार गट- 00
इतर- 00

सांगली महापालिका 

एकूण जागा  - 78

प्रभाग 1 मध्ये भाजपाचे पूर्ण पॅनल विजयी. 4 जागा जिंकल्या
तर प्रभाग 15 मध्ये काँग्रेस चे पूर्ण पॅनल विजयी. 4 जागा जिंकल्या

अकोला ब्रेकिंग
अकोल्यात राज्याचे कामगारमंत्री आणि पालकमंत्री आकाश फुंडकर यांचे सख्खे मावसभाऊ भाजप उमेदवार सागर शेगोकार पराभूत. वंचितचे शहराध्यक्ष निलेश देव यांनी केला 1600 मतांनी पराभव. प्रभाग क्रमांक 3 हा भाजप आणि संघाचा बालेकिल्ला. संघाच्या बालेकिल्ल्यात वंचितचा मोठा विजय.

धुळे ब्रेकिंग..

प्रभाग क्रमांक 3 भारतीय जनता पार्टीचे चारही उमेदवार विजयी..

 देवेंद्र सोनार
 मीनल परदेशी 
 सनी चौधरी 
 शोभा बिल 

चारही उमेदवार विजयी

प्रभाग क्रमांक 5 मध्ये भाजपचे 4 ही उमेदवार विजयी...

नागसेन बोरसे भाजपा
प्रतिभा चौधरी
संध्या कदम
कृपेश नांद्रे

हे चारही उमेदवार विजयी.

प्रभाग 8 मधून शिंदे सेनेच्या छाया आहिरे विजयी

प्रभाग 17 मधून शिंदेसेनेचे धीरज कलंत्री व गीता तुषार नवले विजयी

प्रभाग 14 मधून एमआयएमचे 

मनसुरी मुख्तार कासिम

हसीना बानो साजिद अली 

शेख शहाजन बिस्मिल्ला 

मिर्झा शोएब नवाब बेग  

विजयी

नागपुर 
प्रभाग तीनमध्ये एमआयएमचे चारही उमेदवार आघाडीवर

प्रभाग तीन उमेदवारांची नावे 

एमआयएमचे उमेदवार : प्राप्त मते 
१) रेश्मा नंदागवळी - १३२२
२) पवन कोये - १२६६
३) सोफिया शेख - १२८३
४) अलिशा खान - १३५२

अमरावतीच्या प्रभाग क्रमांक 19 मध्ये युवा स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार सचिन भेंडे यांनी भाजपचे उमेदवार आणि आमदार श्रीकांत भारतीय यांचे बंधू तुषार भारतीय यांचा पराभव केला.

प्रशांत जगताप 1534 मतांनी विजयी

जालना 

जालन्यात भाजपा नेते रावसाहेब दानवे यांचे बंधू भास्कर दानवे विजयी.

जालन्याचा महापौर भाजपचाच होणार; भास्कर दानवे यांनी व्यक्त केला विश्वास.

जालना महापालिकेत आमच्या 35 ते 40 जागा निवडून येणार: दानवे

जालन्यात 65 पैकी 12 जागांवर भाजपा विजयी

नागपूर

प्रभाग 10

दुसऱ्या राउंड मध्ये काँग्रेसचे चारही उमेदवार आघाडीवर

माजी मंत्री गुलाबराव देवकर यांचा मुलगा प्रफुल देवकर विजयी - NCP

पिंपरी चिंचवड महापालिका

एकूण जागा - 128

भाजप - 50

शिवसेना - 07

राष्ट्रवादी - 26

काँग्रेस - 00

शिवसेना (उद्धव ठाकरे) - 00

राष्ट्रवादी (शरद पवार) - 00

महाराष्ट्र नवनिर्माण सेना - 00

इतर (वंचित, सप, एमआयएम, आप, बसपा) - 02

मालेगाव महापालिका 

इस्लाम पार्टीने खाते उघडले.
प्रभाग क्रमांक १७ मधील चारही उमेदवार इस्लाम पार्टीचे उमेदवार विजयी
अ) अन्सारी मोहम्मद असलम खलील अहमद - इस्लाम पक्ष - विजयी
ब ) शाहीन बानो मन्नान बेग - इस्लाम पक्ष - विजयी
क ) परवीन बानो रियाज अहमद - इस्लाम पक्ष - विजय
ड )  मोहम्मद खालिद अब्दुल रशीद - इस्लाम पक्ष - विजयी

पुणे 

काँग्रेसने खात खोललं 

साहिल केदारी विजयी , प्रभाग १८ मधून विजयी 

अमरावती

फडणवीस यांचे मामेभाऊ विवेक कलोती यांचा पराभव. काँग्रेसच्या डॉ. संजय शिरभाते यांचा प्रभाग क्रमांक १४ मधून विजय.

नाशिक 
भाजपाचे सुधाकर बडगुजर आघाडीवर

सोलापूर महानगरपालिका

भाजप विजयाचा उंबरठ्यावर

आघाडीवर असलेले उमेदवार पुढीलप्रमाणे :

प्रभाग 1
१)गौतम कसबे अ अनुसुचित जाती
2)राजश्री कणके ब ओबीसी महिला
3)पूजा काशीद- क-सर्वसाधारण महिला
4)अविनाश पाटील-ड सर्वसाधारण

प्रभाग 4-
१)वंदना गायकवाड -अ (अनुसूचित जाती)
2)विनायक वितकर-ब(ओबीसी)
3)ऐश्वर्या साखरे--क(सर्वसाधारण महिला)
4)अनंत जाधव-ड-(सर्वसाधारण)

प्रभाग-8
1)गीता गवई-ब(सर्वसाधारण महिला)
2)बबिता धुमा-क(सर्वसाधारण महिला)
3)गौरीशंकर दर्गोपाटील-ड (सर्वसाधारण)
4)अमर पुदाले अ (सर्वसाधारण)

प्रभाग 10
१)उज्वला दासरी अ (ओबीसी महिला)
2)दीपिका यलदांडी ब(सर्वसाधारण महिला)
3)सतीश शीरसरला क(सर्वसाधारण)
4)प्रथमेश कोठे ड(सर्वसाधारण)

प्रभाग क्रमांक 22

भाजप उमेदवार आघाडीवर
1)दत्तात्रय नडगिरी -अ(अनुसूचित जाती)
2)अंबिका गायकवाड -ब(ओबीसी महिला)
3)चैताली जाधव -क(सर्वसाधारण महिला)
4)किसन जाधव-ड(सर्वसाधारण)

कोल्हापूर ब्रेकिंग 

प्रभाग 9 

प्रभाग क्रमांक 9 मध्ये महायुती सर्व जागांवर विजयी 

शिवसेनेचे शारंगधर देशमुख विजयी तर काँग्रेस चे राहुल माने यांचा पराभव

भाजपचे विजयसिंह देसाई विजयी तर काँग्रेस नंदकुमार पिसे यांचा पराभव

भाजपच्या माधवी पाटील यांचा विजय तर काँग्रेसच्या पल्लवी यांचा पराभव

शिवसेनेच्या संगीता सावंत यांचा विजय तर काँग्रेसच्या विद्या देसाई यांचा पराभव 

 

चंद्रपूर महापालिका, पहिल्या फेरीअखेरचे निकाल

एकूण जागा - 66

भाजप - 06

शिवसेना - 0

राष्ट्रवादी - 01

काँग्रेस - 12

शिवसेना (उद्धव ठाकरे) - 07

राष्ट्रवादी (शरद पवार) - 0

महाराष्ट्र नवनिर्माण सेना - 00

इतर (वंचित, सप, एमआयएम, आप, बसपा) - 2

कोल्हापूर

प्रभाग क्रमांक 10

आमदार विनय कोरे यांच्या जनस्वराज्य पक्षाचं कोल्हापुरात महापालिकेत खात उघडलं. अक्षय जरग विजयी उमेदवार

जालना

प्रभाग 13 मधून अपक्ष उमेदवार श्रीकांत पांगारकर विजयी. श्रीकांत पांगारकर हे गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपी आहेत. अपक्ष म्हणून त्यांनी ही निवडणूक लढवली.

कल्याण डोंबिवली मनपा मतगणना- 2026

प्रल्हाद म्हात्रे - मनसे (विजयी)

कोल्हापूर ब्रेकिंग

प्रभाग क्रमांक दहा मधून महायुतीच्या तीन तर जनसुराज्य शक्ती पक्षाचा उमेदवार विजयी 

विजयी उमेदवार असे
पूर्वा राणे काॅग्रेस,, अर्चना कोराणे काॅग्रेस, अजय इंगवले काॅग्रेस,  अक्षय जरग , जनस्वराज्य पक्ष.

पुणे 

वसंत मोरे यांना केवळ ६६६ मत, वसंत मोरे (ठाकरे गट) पिछाडीवर

पुणे ब्रेकिंग

प्रभाग २५ मध्ये दुसऱ्या फेरी अंती भाजपची मोठी आघाडी

स्वरदा बापट १३ हजार ९०० मतांनी आघाडीवर

बापू मानकर १४ हजार ५०५ मतांनी आघाडीवर

५३७४ मतांनी स्वप्नाली पंडित आघाडीवर

कोल्हापूर ब्रेकिंग

कोल्हापूर महापालिकेत प्रभाग 6 मधून महायुतीचे तीन तर काँग्रेसचे एक उमेदवार विजयी.

शिवसेना शिंदे पक्षाच्या शीला सोनुले विजयी

काँग्रेसचे प्रताप जाधव विजयी

भाजपच्या दीपा काटकर, तर राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या माधवी गवंडी विजयी

नागपूर-

प्रभाग 16
भाजप - चारही भाजपचे आघाडीवर

प्रभाग 36 - 
चारही उमेदवार आघाडीवर 
शिवानी दाणी 1052 मतांनी 

प्रभाग 37
भाजप चारही उमेदवार आघाडीवर 

प्रभाग 38
भाजपचे तीन आघाडीवर 
कुमुदिनी गुडधे 691 ने पिछाडीवर

अकोला महापालिकेच्या निकालाची मोठी अपडेट

प्रभाग क्रमांक 5 ड मधून भाजपचे माजी महापौर विजय अग्रवाल 859 मतांनी आघाडीवर. तर याच प्रभागात भाजपचे महानगराध्यक्ष जयंत मसने 1636 मतांनी आघाडीवर. ठाकरे शिवसेनेचे उमेदवार पिछाडीवर.

नागपूर 

नागपूरात सलग चौथ्यांदा भाजप सत्ता स्थापण करणार ? 

भाजप बहुमताच्या जवळ, आता पर्यन्त भाजप 65 जागांवर आघाडीवर

नागपूर मनपाचा मॅजिक फिगर 76

सांगली महापालिका 

एकूण जागा  - 78

भाजपा  - 19
काँग्रेस   -7
राष्ट्रवादी काँग्रेस श. प.- 
राष्ट्रवादी काँग्रेस - 3
शिवसेना - 1
शिवसेना UBT - 0
इतर (जनसुराज्य पक्ष)  -  1

सांगलीत भाजपा आघाडीवर.

पाहा पुणे महापालिकेत कोण आघाडीवर (एकूण जागा - 169)

भाजप - 39 आघाडीवर
शिवसेना - 4 आघाडीवर
राष्ट्रवादी काँग्रेस - 16 आघाडीवर
शिवसेना UBT - 1 आघाडीवर
मनसे - 0 आघाडीवर
राष्ट्रवादी काँग्रेस (SP) - 0 आघाडीवर 
काँग्रेस - 1 आघाडीवर
इतर - 0 आघाडीवर

पाहा नाशिक महापालिकेत कोण आघाडीवर (एकूण जागा - 122)

भाजप - 8 आघाडीवर
शिवसेना - 5 आघाडीवर
राष्ट्रवादी काँग्रेस - 2 आघाडीवर
शिवसेना UBT - 3 आघाडीवर
मनसे - 1 आघाडीवर
राष्ट्रवादी काँग्रेस (SP) - 1 आघाडीवर 
काँग्रेस - 0 आघाडीवर
इतर - 2 आघाडीवर

पिंपरी चिंचवड महापालिका

एकूण जागा - 128

भाजप - 38

शिवसेना - 01

राष्ट्रवादी - 11

काँग्रेस - 00

शिवसेना (उद्धव ठाकरे) - 00

राष्ट्रवादी (शरद पवार) - 00

महाराष्ट्र नवनिर्माण सेना - 00

इतर (वंचित, सप, एमआयएम, आप, बसपा) - 00

पुणे:  

प्रभाग क्रमांक २० शंकर महाराज मठ बिबेवाडी प्रभागातून भाजपचे तीन उमेदवार विजयी. राजेंद्र शिळीमकरस, तन्वी दिवेकर आणि मानसी देशपांडे विजयी. राष्ट्रवादी काँग्रेसचे गौरव घुले विजय झालेले आहेत. गौरव घुले यांनी भाजपचे महेंद्र शिंदे यांचा पराभव केला आहे. 

जालना 

प्रभाग क्रमांक एक मधून भाजपचे पाचही उमेदवार विजयाच्या उंबरठ्यावर...

तर प्रभाग क्रमांक 13 मधून भाजपचे 3 उमेदवार आघाडीवर

अकोला 

अकोल्यातील प्रभाग क्रमांक 13 ड मधून भाजपाचे माजी राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांचा पुतण्या आणि अपक्ष उमेदवार आशिष पवित्रकार 519 मतांनी आघाडीवर. भाजपचे विद्यमान नगरसेवक अनिल मुरूमकार पिछाडीवर. तर भाग क्रमांक 13 मधून स्थायी समिती सभापती विशाल इंगळे 530 मतांनी आघाडीवर.

सांगली महापालिका 

एकूण जागा  - 78

भाजपा  - 8
काँग्रेस   -7
राष्ट्रवादी काँग्रेस श. प.- 
राष्ट्रवादी काँग्रेस - 6
शिवसेना - 1
शिवसेना UBT - 0
इतर (जनसुराज्य पक्ष)  -  1

कोल्हापूर

भाजप २२
शिवसेना ९
राष्ट्रवादी अ.प. ३
काँग्रेस २६
शिवसेना उबाठा २
राष्ट्रवादी श.प. ०

नागपूर 

भाजपची निर्णायक आघाडी, लकडगंज झोन मधील 4 ही प्रभागात भाजपचे 16 ही उमेदवार आघाडीवर

प्रभाग 4, प्रभाग 23, प्रभाग 24, प्रभाग 25 मध्ये भाजप ची आघाडी

पूर्व नागपूरात भाजपचा करिश्मा, गड कायम राखण्यात भाजप यशस्वी ठरत असल्याचे चित्र

पिंपरी चिंचवड

प्रभाग 7

अजित पवारांचे माजी आमदार विलास लांडे यांचे पुतणे विराज लांडगे 269 मतांनी पिछाडीवर

प्रभाग 18

भाजपचे बंडखोर राजेंद्र गावडे 49 मतांनी आघाडीवर. भाजपचे अधिकृत सुरेश भोईर पिछाडीवर

नागपूर : लकडगंज झोन

प्रभाग 4,23,24 आणि 25 मध्ये चारही प्रभागात भाजपचे 16 (सर्व उमेदवार) आघाडीवर

अमरावती ब्रेकिंग

अमरावती महानगरपालिका प्रभाग क्रमांक 19 साईनगर मध्ये भाजपचे  तुषार भारतीय आघाडीवर. युवा स्वाभिमानचे सचिन भेंडे पिछाडीवर

नागपूर महानगरपालिका-

एकुण  जागा- 151


भाजप- 60
शिवसेना- 
राष्ट्रवादी- 00
ठाकरे- 01
काँग्रेस- 18
मनसे-00
शरद पवार गट- 00
इतर- 00

दुसऱ्या फेरीअखेर प्रशांत जगताप ५५१ मतांनी आघाडीवर

पिंपरी चिंचवड महापालिका

एकूण जागा - 128

भाजप - 31

शिवसेना - 01

राष्ट्रवादी - 07

काँग्रेस - 00

शिवसेना (उद्धव ठाकरे) - 1

राष्ट्रवादी (शरद पवार) - 00

महाराष्ट्र नवनिर्माण सेना - 00

इतर (वंचित, सप, एमआयएम, आप, बसपा) - 02

नागपूर महानगरपालिका-

एकुण  जागा- 151

आघाडी…

भाजप- 54
शिवसेना- 03
राष्ट्रवादी- 00
ठाकरे- 00
काँग्रेस- 22
मनसे-00
शरद पवार गट- 00
इतर- 00

सांगली महापालिका 

एकूण जागा  - 78
प्रभाग 1,, 5, 12, 15, ची मतमोजणी आकडेवारी. 
भाजपा  - 6
काँग्रेस   -6
राष्ट्रवादी काँग्रेस श. प.- 
राष्ट्रवादी काँग्रेस - 4
शिवसेना - 1
शिवसेना UBT - 0
इतर (जनसुराज्य पक्ष)  -  1

नागपूरमध्ये भाजप 54 जागांवर आघाडीवर

 

इचलकरंजी महानगरपालिका विजयी उमेदवार

वॉर्ड 7

शिव शाहू आघाडीचे अमृता चौगुले, नंदकुमार पाटील, मदन कारंडे, क्रांती आवळे

 

पुणे ब्रेकिंग

प्रभाग क्रमांक २५ मध्ये दुसऱ्या फेरीत ही भाजपा उमेदवारांची आघाडी कायम

स्वरदा बापट, कुणाल टिळक, बापू मानकर आणि स्वप्नाली पंडित या चार ही जणांची आघाडी कायम

मूळ पुणेकरांचा प्रभाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रभाग २५ मध्ये भाजप वर्चस्व राखण्याच्या तयारीत

नागपूर 

काँग्रेसचे अभिजीत झा प्रभाग १४ मधून ९४५ मतांनी आघाडीवर

पुणे महापालिका निवडणूक 

प्रभाग क्र. 25
कुणाल टिळक स्वरदा बापट स्वप्नाली पंडित राघवेंद्र मानकर भाजपचे सर्व उमेदवार पहिल्या फेरीत आघाडीवर, तर रुपाली पाटील ठोंबरे पिछाडीवर

सांगली महापालिका 

एकूण जागा  - 78
प्रभाग 1, 5,12, 15, ची मतमोजणी सुरु झाली आहे. 
भाजपा  - 03
काँग्रेस   -01
राष्ट्रवादी काँग्रेस श. प.- 
राष्ट्रवादी काँग्रेस - 2 
शिवसेना - 1
शिवसेना UBT - 0
इतर (जनसुराज्य पक्ष)  -  1

नागपूर 

ठाकरे गटाचे नागपूर जिल्हा अध्यक्ष प्रमोद मानमोडे यांची मुलगी अपक्ष उमेदवार पुजा मानमोडे प्रभाग ३१ मधून पिछाडीवर

नागपूर

प्रभाग 36 भाजप शिवानी दाणी आघाडीवर

प्रभाग 37 भाजप दिलीप दिवे आघाडीवर

प्रभाग 16 भाजपचे चारही उमेदवार आघाडीवर

प्रभाग 35 भाजप 2 जागेवर आघाडीवर

प्रभाग 38 भाजपचे तीन उमेदवार आघाडीवर

छत्रपती संभाजी नगर  निकाल

एकूण 115

भाजप  : 12

शिवसेना : 6

शिवसेना UBT :  5

एमआयएम :  5

काँग्रेस : 3

राष्ट्रवादी  : 1

राष्ट्रवादी SP :  1

इतर

 

कोल्हापूर ब्रेकिंग... आमदार सतेज पाटील यांनी कसबा बावडा बालेकिल्ला राखला...

प्रभाग क्रमांक 1 मध्ये काँग्रेसचे चारही उमेदवार विजयी

सुभाष बुचडे,पुष्पा नरुटे, पोवार रुपाली, चौगले सचीन

संभाजी नगर 

संजय शिरसाठ यांची मुलगी हर्षदा प्रभाग क्रमांक 18  मधून आघाडीवर

तर मुलगा सिद्धांत शिरसाठही प्रभाग 29 मधून  आघाडीवर

चंद्रपूर महानगरपालिका 

टपाल व पहिल्या राऊंड ची मतमोजणी पूर्ण, अजून निकाल जाहीर व्हायचा आहे.

 

अकोल्यात पोस्टल मतात भाजपचे माजी उपमहापौर विनोद मापारी 360 मतांनी आघाडीवर. 

प्रभाग क्रमांक 7 मध्ये भाजपने पाठिंबा दिलेल्या अकोला विकास समितीचे 4 उमेदवार आघाडीवर. 

अकोला महापालिका एकूण जागा : 80 

भाजप : 33
काँग्रेस : 15
उबाठा : 6
शिंदे सेना : 4
अजित राष्ट्रवादी : 4
शरद राष्ट्रवादी : 01
वंचित : 04
एमआयएम : 02
मनसे : 00
अकोला विकास समिती : 4
अपक्ष : 00

परभणी
परभणी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक पाच मध्ये शिवसेना उबाठाचे तीन उमेदवार पुढे

पिंपरी चिंचवड महापालिका

एकूण जागा - 128

भाजप - 15

शिवसेना - 02

राष्ट्रवादी - 14

काँग्रेस - 00

शिवसेना (उद्धव ठाकरे) - 00

राष्ट्रवादी (शरद पवार) - 01

महाराष्ट्र नवनिर्माण सेना - 00

इतर (वंचित, सप, एमआयएम, आप, बसपा) - 00

 

जालना 

प्रभाग क्रमांक 13 मधून भाजपा आघाडी

नागपूर 

प्रभाग 27- चारही जागांवर भाजपला आघाडी

पुणे

भाजप- 48
राष्ट्रवादी- 14
कांग्रेस- 0
उबाठा- 0
शिवसेना- 0


नागपूर 

प्रभाग 19 चारही  जागा भाजपा आघाडीवर

प्रभाग 21 मध्ये शिवसेनेचे अजय दलाल  आघाडीवर

प्रभाग ३ मधून भाजपाचे चारही उमेदवार आघाडीवर

कोल्हापूर महानगरपालिका

प्रभाग क्रमांक तीन मध्ये भाजपचे चारही उमेदवार विजयी. प्रमोद देसाई, राजनंदा महाडिक, वंदना मोहिते, विजेंद्र माने विजयी

इचलकरंजीमध्ये भाजपचे 4 उमेदवार विजयी

नागपूर

प्रभाग 31 मधून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार गणेश चारलेवार आघाडीवर.

नाशिक 
प्रभाग 13 भाजपचे 3 ही उमेदवार आघाडीवर

नागपूर

प्रभाग 12 आणि 13 मधील सर्व जागांवर भाजप आघाडीवर

प्रभाग 16 मधून भाजपच्या उमेदवार तारा यादव आघाडीवर आहेत.

प्रभाग 33 चे काँग्रेस उमेदवार मनोज गावंडे पहिल्या फेरीत 895 मताने आघाडीवर.

अकोला महापालिका एकूण जागा : 80 

भाजप : 22
काँग्रेस : 14
उबाठा : 4
शिंदे सेना : 2 
अजित राष्ट्रवादी : 1 
शरद राष्ट्रवादी : 01
वंचित : 02
एमआयएम : 02
मनसे : 00
अकोला विकास समिती : 1
अपक्ष : 00

नागपूर

प्रभाग क्रमांक 18 मध्ये बंडू राऊत यांच्यासह भाजपचे चारही उमेदवार पहिल्या राऊंडमध्ये पुढे

जालना 

जालन्यातून भास्कर दानवे आघाडीवर. प्रभाग क्रमांक एक मधून रावसाहेब दानवे यांचे बंधू भास्कर दानवे निवडणुकीच्या रिंगणात.

 

नागपूर महानगरपालिका-

एकुण  जागा- 151

आघाडी…

भाजप- 38
शिवसेना- 02
राष्ट्रवादी- 00
ठाकरे- 00
काँग्रेस- 12
मनसे-00
शरद पवार गट- 00
इतर- 00

 

अकोला महापालिका एकूण जागा : 80 

भाजप : 15
काँग्रेस : 10
उबाठा : 2
अजित राष्ट्रवादी : 1 
शरद राष्ट्रवादी : 00
वंचित : 01
एमआयएम : 00
मनसे : 00
अकोला विकास समिती : 1
अपक्ष : 00

 

नाशिक महानगरपालिका -
पोस्टल मत मोजणी कल

एकुण  जागा- १२२

भाजप - ०६
शिंदेंची शिवसेना - ०४
राष्ट्रवादी अजित पवार  - ०२
ठाकरेंची शिवसेना - ०१
काँग्रेस - 
मनसे-०१
राष्ट्रवादी शरद पवार गट - ०१
आरपीआय - ०१
इतर - ०१

छत्रपती संभाजी नगर 

एकूण 115 

भाजप  : 9

शिवसेना : 5

शिवसेना UBT :  4

एमआयएम :  4

काँग्रेस : 2

राष्ट्रवादी  : 1

राष्ट्रवादी SP :  1

इतर

कोल्हापूर 

प्रभाग 1

पहिल्या फेरी अखेर 
काँग्रेस- सुभाष बुचडे 5391

शिवसेना- अमर साठे 3946

प्रभाग क्रमांक एक मध्ये काँग्रेसचे सुभाष बुचडे आघाडीवर

अमरावती महानगरपालिका-

एकुण  जागा- 87


भाजप-07
शिवसेना- 0
राष्ट्रवादी- 05
ठाकरे- 00
काँग्रेस- 3
मनसे-00
शरद पवार गट-00
युवा स्वाभिमान-02
इतर-००

प्रभाग क्रमांक १८ मधून काँग्रेसचे प्रशांत जगताप पिछाडीवर. जगताप यांनी एनसीपीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर काँग्रेसमध्ये प्रवेश करून निवडणूक लढवली.

नागपूर

भाजपचे प्रभाग 26 चे उमेदवार तथा अनुसूचित जाती जमाती आयोग उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम आघाडीवर

जालना 

मनपा निवडणुकीसाठी शिवसेनेकडून आमदार अर्जुन खोतकर यांची लेक दर्शना झोल खोतकर या प्रभाग क्रमांक 16 मधून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे खोतकर यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे.

 

महापालिका नाव - कोल्हापूर

BJP                      - 15
SHIVSENA          - 7
NCP                     - 3
CONGRES           - 17
SHIVSENA UBT  -2
NCP SP                -0
MNS                     - 0
OTHERS               -0

 

अकोला महापालिका एकूण जागा : 80 

आघाडी कोण?. 

भाजप : 12
काँग्रेस : 7
उबाठा : 1
अजित राष्ट्रवादी :
शरद राष्ट्रवादी :
वंचित : 
एमआयएम : 
मनसे :
अकोला विकास समिती : 
अपक्ष :

जालना मनपा निवडणुकीत भाजपा नेते रावसाहेब दानवे, आमदार अर्जुन खोतकर, माजी आमदार कैलास गोरंट्याल यांची प्रतिष्ठा पणाला.

अकोल्यात पोस्टल मतमोजणीत भाजप 10 जागांवर आघाडीवर तर 3 जागांवर काँग्रेस आघाडीवर. तर शिवसेना उबाठा एका ठिकाणी आघाडीवर.

 

जालना

1, 4, 7, 10 आणि 13 या प्रभागाची मतमोजणी सुरू होणार

पुणे महानगरपालिकेत भाजप 42 जागांवर आघाडीवर, 
तर अजित पवारांची राष्ट्रवादी 14 जागांवर आघाडीवर 

पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी 9 जागांवर आघाडीवर 
तर भाजपची 29 जागांवर मोठी आघाडी

इचलकरंजी महानगरपालिका

भाजपची आठ जागांवर आघाडी, तर शिव शाहू आघाडी तीन जागांवर आघाडीवर.

अमरावती मनपा

भाजप 4
शिवसेना 0
राष्ट्रवादी अ.प. 3
काँग्रेस 3
राष्ट्रवादी श.प. 0 

 

नाशिक पोस्टल 

भाजप - 1
शिवसेना - 
राष्ट्रवादी काँग्रेस- 
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष - 
मनसे- 
काँग्रेस- 
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष- 
वंचित बहुजन आघाडी- 
रिपाइं (आठवले गट)- 
रिपब्लिकन सेना -
एमआयएम-
अपक्ष -1

कोल्हापूर मनपा

भाजप 10

शिवसेना 6

राष्ट्रवादी अजित पवार 3

काँग्रेस 12

 

 

 

नांदेड वाघाळा महापालिका पालिका 

भाजपा पाच तर शिंदेसेना दोन जागेवर पुढे

 

पिंपरी चिंचवड महापालिका

एकूण जागा - 128

भाजप - 08

शिवसेना - 01

राष्ट्रवादी - 06

काँग्रेस - 

शिवसेना (उद्धव ठाकरे) -

राष्ट्रवादी (शरद पवार) - 02

महाराष्ट्र नवनिर्माण सेना - 

इतर (वंचित, सप, एमआयएम, आप, बसपा)

नागपूर महानगरपालिका-

एकुण  जागा - 151

भाजप - 13
शिवसेना - ०
राष्ट्रवादी - ००
ठाकरे - ००
काँग्रेस - 03
मनसे -००
शरद पवार गट -००
इतर-००

पुणे मनपा

पुण्यात टपाल मोजणीला सुरवात, 20 मिनिटात मोजणीचा निकाल येणार. त्यानंतर EVM मतमोजणी होणार
 

जालना मनपाच्या टपाली मतमोजणीत भाजप आघाडीवर
 

छत्रपती संभाजी नगर  निकाल

एकूण : 115 

भाजप 4 

शिवसेना 3

शिवसेना UBT 3

एमआयएम 5

काँग्रेस 1

राष्ट्रवादी 00

राष्ट्रवादी SP 00

 

नागपूर महानगरपालिकेच्या टपाली मतमोजणीला सुरुवात

नागपूर मनपाच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून टपाली मतमोजणीत भाजपने आघाडी घेतल्याचे पहायला मिळत आहे. यामध्ये भाजप 6, तर काँग्रेस 2 जागांवर आघाडावर आहे.

जालना मनपा

जालना महानगरपालिकेच्या टपाली मतमोजणीला सुरुवात

जालन्यात मतमोजणी केंद्राबाहेर मोठा पोलिस बंदोबस्त

जालन्यात मतमोजणी केंद्राबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या मतमोजणीचा निकाल ऐकण्यासाठी मतमोजणी केंद्राबाहेर उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींसोबतच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केलीय. थोड्याच वेळात जालना मनपा निवडणुकीच्या मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात होईल. या निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. दरम्यान, जालना महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी एकूण 454 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. या निवडणुकीतून आज 65 उमेदवारांची निवड होणार आहे. जालना मनपाच्या 16 प्रभागांसाठी ही निवडणूक प्रक्रिया पार पडली.

कार्यकर्ता मारहाण प्रकरणी हर्षदा शिरसाट यांचा इशारा

पालकमंत्री संजय शिरसाट यांची कन्या हर्षदा शिरसाट या मतदान मोजणी केंद्रावरती दाखल झाल्या आहेत. ज्या पोलिसांनी आमच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली त्यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही मतमोजणीला सुरुवात होऊ देणार नाही, तसेच कोणत्याही प्रतिनिधीला आत जाऊन देणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. उद्या शहर बंद का होईना मात्र संबंधित पोलिसांवर कारवाई झाल्याशिवाय गप्प बसणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.

छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय इंजीनियरिंग कॉलेजमध्ये एका उमेदवाराच्या प्रतिनिधीला आतमध्ये घेण्यावरून पोलिस आणि कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. यावेळी पोलिसांनी या प्रतिनिधीवर  लाठीचार्ज केला. विकास जैन असं या शिवसेनेच्या या कार्यकर्त्याचं नाव असून पोलिसांनी त्यांना मारहाण केली आहे.

नांदेड महानगरपालिका

नांदेड महानगरपालिका निवडणुकीच्या  मतमोजणीला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. दहा वाजल्यापासून मतमोजणी सुरू होईल. नांदेड महानगरपालिकेच्या 20 प्रभागातील एकूण 81 जागेसाठी 491 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. नांदेड महानगरपालिका निवडणुकीसाठी जवळपास 61 टक्के मतदान झाले आहे. माजी मुख्यमंत्री, खासदार अशोक चव्हाण, राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर, शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार आनंद बोंढारकर यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मतमोजणी केंद्राबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीचा निकाल लागण्यापूर्वीच भारतीय जनता पक्षाच्या उत्साही कार्यकर्त्यांनी पिंपरी-चिंचवड शहरात विजयाचे होर्डिंग्स लावलेत. शहरातील वेगवेगळ्या भागात कार्यकर्त्यांकडून हे होर्डिंग्स लावण्यात आले आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात भारतीय जनता पार्टी विरुद्ध अजित पवारांची राष्ट्रवादी असा थेट सामना रंगतोय.

विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचे सुपुत्र सिद्धार्थ बनसोडे यांचा विजय झाल्याचे व्हाट्सअॅप स्टेटस काही अति उत्साही कार्यकर्त्यांनी ठेवले आहेत. निकालाआधीच पोस्ट व्हायरल होत आहे. सिद्धार्थ बनसोडे हे विजयी झाल्याबद्दल त्यांना शुभेच्छा अशा आशयाचे स्टेटस ठेवले आहेत. निकाल लागायला काही अवधी आहे. त्याआधीच पिंपरी-चिंचवड शहरात भाजप आणि राष्ट्रवादीच्या अति उत्साही कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. 

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका 

 निवडणुकीचा निकाल आता समोर येण्यासाठी काही तास शिल्लक असताना छत्रपती संभाजीनगर मध्ये मतदानाआधी आणि                     मतदानाच्या वेळी देखील वाद निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं, मात्र हाच वाद मतमोजणी वेळी होऊ नये यासाठी पोलीस                   प्रशासनाने मतमोजणी केंद्रापासून 200 ते 300 मीटर अंतरावर बॅरिकेट्स लावून रस्ते बंद केले. मतमोजणीच्या चार तास आधीच               बॅरिगेट लावल्याने जाण्यासाठी टूरचा रस्ता असल्याने नागरिकांनी संतापही व्यक्त केला.

  • महाराष्ट्रातील 29 महापालिकांसाठी मतमोजणी सकाळी 10 वाजेपासून सुरू होईल

निकाल कधी आणि कसे पाहता येतील?

मतमोजणी आज सकाळी 10 वाजता सुरू होईल. त्याचे लाइव्ह अपडेट्स आणि प्रत्येक घडामोड ही आपल्याला मुंबई Tak वर पाहता येईल. याशिवाय मुंबई Tak च्या यूट्यूब चॅनलवर आपल्याला याबाबत राजकीय तज्ज्ञांचे विश्लेषणही पाहता येईल.

    follow whatsapp