नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांमध्ये हवाई हल्ले आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांची तीव्र देवाणघेवाण सुरू आहे. यामुळे देशभरातील 26 विमानतळांवर नागरी विमान वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. या परिस्थितीमुळे अनेक विमान कंपन्यांनी आपल्या प्रवाशांसाठी नवीन प्रवास सल्ला (ट्रॅव्हल अॅडव्हायझरी) जारी केला आहे. 10 मे पर्यंत हा निर्णय लागू असणार आहे.
ADVERTISEMENT
एअर इंडियाची सूचना: 75 मिनिटांपूर्वी चेक-इन बंद
एअर इंडियाने प्रवाशांना विमानतळावर उड्डाणाच्या वेळेच्या किमान तीन तास आधी पोहोचण्याचे आवाहन केले आहे. नागरी उड्डयन सुरक्षा ब्युरो (BCAS) च्या वाढीव सुरक्षा उपाययोजनांमुळे चेक-इन प्रक्रिया उड्डाणाच्या 75 मिनिटांपूर्वी बंद होईल. एअर इंडियाने आपल्या निवेदनात म्हटले आहे, "सुरक्षित आणि सुचारू चेक-इन आणि बोर्डिंगसाठी प्रवाशांनी वेळेचे पालन करावे."
हे ही वाचा >> आकाश, MRSAM ते शिल्का... पाकिस्तानच्या प्रत्येक हल्ल्याला उत्तर, भारताची ढाल ठरलेत हे 5 एअर डिफेन्स शस्त्र
अकासा एअरची अॅडव्हायझरी
अकासा एअरने देखील प्रवाशांना तीन तास आधी विमानतळावर पोहोचण्याची विनंती केली आहे. याशिवाय, प्रवाशांनी सरकारमान्य फोटो ओळखपत्र सोबत ठेवावे आणि 7 किलोपेक्षा जास्त वजनाचा हँडबॅग बाळगू नये, असेही सांगण्यात आले आहे. सर्व प्रवाशांना बोर्डिंगपूर्वी दुय्यम सुरक्षा तपासणीला सामोरे जावे लागेल.
इंडिगो आणि स्पाईसजेटच्या उड्डाणांवर परिणाम
इंडिगोने 10 मे सकाळपर्यंत 165 हून अधिक देशांतर्गत उड्डाणे रद्द केली आहेत. स्पाईसजेटने धर्मशाला, लेह, जम्मू, श्रीनगर आणि अमृतसर यासह उत्तर भारतातील काही विमानतळांवरील उड्डाणे पुढील आदेशापर्यंत रद्द केली आहेत. प्रवाशांना उड्डाणाची सद्यस्थिती तपासण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
दिल्ली विमानतळावर 90 उड्डाणे रद्द
गुरुवारी दिल्ली विमानतळावर 90 उड्डाणे रद्द करण्यात आली, यामध्ये 5 आंतरराष्ट्रीय उड्डाणांचाही समावेश आहे. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय सशस्त्र दलांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून बुधवारी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हल्ले केले. या हल्ल्यात 26 हून अधिक लोक मारले गेले होते, त्यानंतर विमानतळ बंदी आणि उड्डाण रद्दीकरणाची मालिका सुरू झाली.
पाकिस्तानचे हल्ले नाकाम
हे ही वाचा >> मोठी बातमी... भारतीय Navy ने केलं कराची बंदर उद्ध्वस्त, पाकिस्तानवर समुद्री हल्ला
पाकिस्तानने गुरुवारी रात्री भारताच्या उत्तर आणि पश्चिम भागातील सैन्य तळांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांचा प्रयत्न केला. मात्र, भारताच्या S-400 एअर डिफेन्स सिस्टमने हे हल्ले यशस्वीपणे हाणून पाडले.
बंद झालेली विमानतळे
खालील 26 विमानतळांवर सध्या नागरी उड्डाण सेवा बंद आहे:
1. चंदीगड
2. श्रीनगर
3. अमृतसर
4. लुधियाना
5. भुंतर
6. किशनगड
7. पाटियाला
8. शिमला
9. कांगडा-गग्गल
10. बठिंडा
11. जैसलमेर
12. जोधपूर
13. बीकानेर
14. हलवारा
15. पठानकोट
16. जम्मू
17. लेह
18. मुंद्रा
19. जामनगर
20. हीरासर
21. पोरबंदर
22. केशोद
23. कांडला
24. भुज
25. हिंडन
26. शिमला
नागरी उड्डयन मंत्रालयाचे निर्देश
नागरी उड्डयन मंत्रालयाने सर्व विमानतळ आणि विमान कंपन्यांना सुरक्षा उपाय कडक करण्याचे निर्देश दिले आहेत. यामध्ये सर्व प्रवाशांची दुय्यम तपासणी (SLPC) अनिवार्य करण्यात आली आहे. विमानतळांच्या टर्मिनलमध्ये आगंतुकांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली असून, एअर मार्शल्सची तैनाती करण्यात येत आहे.
ADVERTISEMENT
