गद्दारांची वर्षपूर्ती अन् 9 वर्षांच आत्मपरीक्षण, अजित पवारांची केंद्रासह राज्य सरकार टीका

योगेश पांडे

03 Jun 2023 (अपडेटेड: 04 Jun 2023, 02:45 AM)

1 वर्षात झालेल्या निवडणूकांमध्ये भाजप- शिंदे गटाचा पराभव झाला होता. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक घ्यायला राज्य सरकार घाबरत असल्याची टीका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. तसेच ओडिशा ट्रेन दुर्घटनेवर बोलताना अजित पवारांनी (Ajit Pawar) केंद्र सरकारवर देखील टीका केली.

ajit pawar criticize eknath shinde devendra fadnavis obc sell meeting

ajit pawar criticize eknath shinde devendra fadnavis obc sell meeting

follow google news

Maharashtra Politics latest news : येत्या 20-25 जूनला राज्यातील गद्दारांना गद्दारी करून 1 वर्ष पूर्ण होईल. या 1 वर्षात झालेल्या निवडणूकांमध्ये भाजप- शिंदे गटाचा पराभव झाला होता. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक घ्यायला राज्य सरकार घाबरत असल्याची टीका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. तसेच ओडिशा ट्रेन दुर्घटनेवर बोलताना अजित पवारांनी (Ajit Pawar) केंद्र सरकारवर देखील टीका केली. अशा घटना घडता कामा नयेत, केंद्रात भाजपा सरकारला 9 वर्ष झाली आहेत. या दरम्यान खुप घोषणा केल्या, परंतु कृतीत काय? याच आत्मपरीक्षण केलं पाहिजे,असा सल्ला त्यांनी यावेळी दिला. अजित पवार नागपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ओबीसी सेलचे राज्यस्तरीय कार्यकर्ता शिबीरात बोलत होते. (ajit pawar criticize eknath shinde devendra fadnavis obc sell meeting)

हे वाचलं का?

ओबीसी आरक्षणासाठी मगरीचे अश्रू ढाळतायत

ओबीसींना आरक्षण देण्याच्या प्रक्रियेत ज्या त्रुटी राहिल्या होत्या,त्या दुर करण्या करता, जे कराव लागलं ते महाविकास आघाडी सरकारच्या काळात आम्ही केले. भाजपाने मात्र मंडल आयोगाच्या वेळेस ओबीसी आरक्षणाला विरोध केला आणि तेच आज ओबीसी आरक्षणासाठी मगरीचे अश्रू ढाळतायत,अशी टीका अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाजपवर केली. भाजपला कोणतच आरक्षण नकोय, त्यांना आरक्षणच मोडीत काढायचे आहे, अशी टीका देखील अजित पवार यांनी केली आहे.

हे ही वाचा : ‘4 वर्षात 2 डझन आमदार झाले, पण मी पात्र नाही…’, पंकजा मुंडे आता खेळणार मोठा डाव

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यानाही सुनावलं

मुख्यमंत्री फक्त त्या 40 लोकांना सांभाळून बसले आहेत.त्यानाही स्थिर सरकार देता आले नाही,अशी टीका अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांच्यावर केली. तसेच येत्या 20-25 जूनला गद्दारांना गद्दारी करून 1 वर्ष पूर्ण होईल. गेल्या 1 वर्षात झालेल्या निवडणूकमध्ये भाजप- शिंदे गट हरले आहेत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक घ्यायला राज्यातील सरकार घाबरत आहे. ज्याप्रमाणे कर्नाटकमध्ये निवडणुकीपूर्वी पक्षांतर झाल आणि ते निवडणूकीत पराभूत झाले त्याप्रमाणे राज्यातील 50 खोके बहाद्दर गद्दार सुद्धा निवडणुकीत जिंकणार नाहीत, असे देखील अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले आहेत.

दरम्यान नागपूरमध्ये अनेक महिला, मुली बेपत्ता झाल्या आहेत, सरकार काय झोपलंय? गृहविभाग काय करतोय? असा सवाल त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना विचारला आहे. तसेच सरकारच्या नाकार्तेपणामुळे मोठे मोठे उद्योग बाहेर गेले, सरकारने काय झोपा काढल्या काय? अशा कठोर शब्दात देखील अजित पवार यांनी सुनावले.

    follow whatsapp