Ajit Pawar son Parth Pawar land deal koregaon park : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांची कोरेगाव पार्कमधील जमीन खरेदी वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. पार्थ पवारांच्या जमीन खरेदीवरुन सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी सनसनाटी आरोप केले आहेत. "1800 कोटींची जमीनीची 300 कोटी रुपयांमध्ये खरेदी केली आहे. यासाठी स्टॅम्प ड्युटी अवघे 500 रुपये", असा आरोप दानवे यांनी केलाय. शिवाय या प्रकरणी अंजली दमानिया यांनी या संदर्भात तक्रार करण्यासाठी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची वेळ देखील मागितली आहे.
ADVERTISEMENT
अंबादास दानवे यांचे सनसनाटी आरोप
अंबादास दानवे म्हणाले, मेवाभाऊंच्या राज्यात.... 1800 कोटींची जमीन 300 कोटींत खरेदी, स्टॅम्प ड्युटी अवघे 500 रुपये! .....उपमुख्यमंत्री महोदयांचे सुपुत्र पार्थ पवार यांची अमेडिया ही कंपनी जिचे भांडवल अवघे 1 लाख रुपये आहे, या कंपनीला सुमारे 1800 कोटी बाजारमूल्य असलेल्या जमिनीची 300 कोटींना खरेदी करता आली. हा झोल आता अजित पवारांनी किंवा पार्थ पवारांनी महाराष्ट्राला सांगावं. गंमत तर पुढे आहे..एवढ्यावर हा प्रवास थांबला नाही तर या कंपनीने रियल इस्टेटचे भाव गगनाला असलेल्या कोरेगाव पार्क (पुणे) येथे चक्क आयटी पार्क आणि डेटा सेंटर उभारण्याची तयारीही चालवली. एक लाखाचे भांडवल असलेल्या कंपनीला हे कसे काय शक्य होते, (ते ही महार वतानाची जमीन असताना) हे आता पार्थ पवारांनी समोर येऊन सांगावे, जेणेकरून इतर तरुणांनाही त्यांच्या या यशाचे गमक कळून येईल!
अंजली दमानिया काय म्हणाल्या?
दुसरी बाब, सरकारी यंत्रणाही काय तत्पर झाली पहा.. कमाल झाली! 22 एप्रिल 2025 रोजी अमेडिया कंपनीने आयटी पार्क उभारण्याचा ठराव केला. आश्चर्य म्हणजे अवघ्या ४८ तासात उद्योग संचालनालयाने या प्रकल्पावरील स्टॅम्प ड्युटीही माफ करून टाकली. उद्योग संचालनालयाने कोणत्याही अनुभवाशिवाय असा प्रस्ताव देणाऱ्या कंपनीचे प्रपोजल स्वीकारून कोणत्या नियमात स्टॅम्प ड्युटी माफ केली? यावर कळस म्हणजे 27 दिवसात हा सर्व व्यवहार जिकडे-तिकडे झाला आणि या ४० एकर जमिनीच्या व्यवहारासाठी लागलेली स्टॅम्प ड्युटी आहे फक्त रुपये 500! फुले शाहू आंबेडकर यांचे नाव घ्यायचे आणि महार वतनाच्या जमिनी खिशात घालायच्या.. हा आहे अजित दादांचा पुरोगामी महाराष्ट्र!
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया म्हणाल्या, पार्थ पवारांच्या कंपनीने कोरेगाव पार्कमध्ये विकत घेतलेल्या जमिनीची कायदेशीर तक्रार द्यायला मी महसूल मंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे यांची वेळ मागितली आहे. मी सोमवारी पहाटे मुंबईला परत येणार आहे. म्हणून मी मंगळवारी लेखी तक्रार घेऊन महसूल मंत्र्यांना भेटणार आहे. शेतकऱ्यांना “सारखं फुकट, सारखं माफ लागतं” म्हणणारे अजित पवार —पण पोराच्या 1804 कोटींचे डील. त्यावर 126 कोटींची स्टँप ड्यूटी होते , हे डील 300 कोटीचे दाखवून, त्यावरचे 21 कोटी देखील माफ !ही माफी फुकट नव्हती का? असा सवालही दमानिया यांनी केलाय.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











