सुप्रिया सुळेंची राजकीय प्रगल्भताच काढली, अंबादास दानवेंची फेसबुक पोस्ट चर्चेत

Ambadas Danve : खासदार सुप्रिया सुळे यांनी पार्थ पवार यांची कसलीही चूक नसल्याची भूमिका मांडली होती. त्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत सुप्रिया ताईंनी पार्थ पवारांबाबत केलेली कमेंट कुठेतरी राजकीयदृष्ट्या प्रगल्भ नसल्याचं म्हणत त्यांनी फटकारलं आहे. 

ambadas danve

ambadas danve

मुंबई तक

• 10:19 PM • 09 Nov 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

सुप्रिया सुळेंनी पार्थ पवारांची पाठराखण केल्यानंतर अंबादास दानवे काय म्हणाले? 

point

नेमकं काय म्हणाल्या होत्या सुप्रिया सुळे? 

Ambadas Danve : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांचं पुण्यातील कोरेगाव पार्क येथील 42 एकर महार वतनाच्या जमीन घोटाळ्यात नाव आलं आहे. या घटनेनं राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. गेल्या काही दिवसांपासून हे प्रकरण माध्यमांनी उचलून धरलं होतं. अशातच, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पार्थ पवार यांची कसलीही चूक नसल्याची भूमिका मांडली होती. त्यांच्या या भूमिकेमुळे शरद पवार गटात नाराजीचा सूर होता. त्यानंतर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी सोशल मीडियावर याबाबत एक पोस्ट करत सुप्रिया ताईंनी पार्थ पवारांबाबत केलेली कमेंट कुठेतरी राजकीयदृष्ट्या प्रगल्भ नसल्याचं म्हणत त्यांनी फटकारलं आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : 'तुमच्या वडिलांनी काढलेल्या इंजिनिअरिंग कॉलेजची फी..' शेतकऱ्यांविरोधात गरळ ओकणाऱ्या विखेंना राजू शेट्टींनी सुनावलं

नेमकं काय म्हणालेत अंबादास दानवे? 

मराठवाड्यातील नुकसानग्रस्त दौऱ्यात असताना मला खासदार सुप्रिया सुळे यांची पुणे जमीन घोटाळा प्रकरणातील पार्थ पवार याची कमेंट वाचण्यात आली, पार्थचं काही चुकलं नाही, आणि मी त्या विषयी त्याला बोलले आहे तो मला म्हणलाय की, आत्या मी काही चुकीचं केलं नाही. मुळात एका रात्रीत 1800 कोटींची जमीन गिळंकृत करून हा काही तुमचा कौटुंबिक विषय नसून, सार्वजनिक विषय आहे आणि सुप्रिया ताईंची ही कॉमेंट राजकीय दृष्ट्या प्रगल्भ नव्हती, अशी अंबादास दानवे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सुप्रिया सुळेंना डिवचलं आहे. 

नेमकं काय म्हणाल्या होत्या सुप्रिया सुळे? 


हे प्रकरण समोर आल्यानंतर, सुप्रिया सुळे म्हणाल्या की, माझा पार्थवर पूर्णपणे विश्वास असून तो असं काहीही एक करणार नाही. मी त्याच्याशी बोलेल, त्याचं म्हणणं आहे की, आत्या, मी काहीही एक चुकीचं केलेलं नाही. याच प्रकरणात आता शरद पवार गटातील काही नेते आक्रमक झाल्याचं दिसून आलं होतं. नेते एकनाथ खडसेंनी अजित पवारांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली. तर दुसरीकडे शरद पवारांनी नुकतीच पत्रकार परिषद घेऊन आपल्या काही भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला आहे. 

हे ही वाचा : नंदुरबारमध्ये मोठी दुर्घटना, विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळली, दृश्य पाहून अंगावर काटा

काय म्हणाले होते शरद पवार? 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी या प्रकरणावर ठामपणे काही भूमिका घेतल्या आहेत. ते म्हणाले की, पार्थ पवार जमीन प्रकरण हे गंभीर प्रकरण असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. मुख्यमंत्री एखादा विषय गंभीर आहे असं म्हणत असतील, तर त्यांनी चौकशी करून हे वास्तव सर्वांसमोर आणावं, ते काम त्यांनी करावं, अशी अपेक्षा ठेवत त्यांनी आपली भूमिका मांडली. त्यानंतर त्यांनी सुप्रिया सुळेंनी केलेल्या वक्तव्यावर भाष्य केलं. ते म्हणाले की, सुप्रियाचे मत वैयक्तिक असू शकतो. कुटुंब आणि राजकारण वेगळं आहे, असं ते म्हणाले. 

    follow whatsapp