छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाजूला पंतप्रधानांचा फोटो, अमित ठाकरेंनी काय केलं?

मुंबई तक

• 07:14 PM • 31 Aug 2026

Amit Thackeray : विद्यालयाच्या एका कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या फोटोच्या बाजूलाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो आढळून आला. हा फोटो पाहताच अमित ठाकरे संतापले. यावेळी त्यांनी काढा रे तो फोटो... असं म्हणत आदेश दिले.

Amit Thackeray

Amit Thackeray

Google CTA

बातम्या हायलाइट

point

छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाजूला पंतप्रधानांचा फोटो

point

व्हिडिओ होतोय व्हायरल

Amit Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना अध्यक्ष अमित ठाकरे हे सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी अमित ठाकरे यांनी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाची पाहणी केली. या पाहणीदरम्यान धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. विद्यालयाच्या एका कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या फोटोच्या बाजूलाच अमित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो आढळून आला. हा फोटो पाहताच अमित ठाकरे संतापले. यावेळी त्यांनी काढा रे तो फोटो... असं म्हणत आदेश दिले. या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : पुण्यात गणेशोत्सवात DJ वाजणार की नाही? CM यांनी स्पष्टच सांगितलं

छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाजूला पंतप्रधानांचा फोटो

पुण्यातील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात 31 ऑगस्ट रोजी अमित ठाकरे यांनी महाविद्यालयात मनसे विद्यार्थी सेनेच्या शाखेचे उद्घाटन केले होते. तेव्हा अमित ठाकरे यांनी तंत्रनिकेतन महाविद्यालयातील कँटीनची पाहणी केली होती. पुढे त्यांनी वसतिगृह अधिक्षकांच्या कार्यालयात गेले असता, त्यांनी विचित्र प्रकार आढळून आला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाजूलाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो दिसल्याने अमित ठाकरे यांनी संताप व्यक्त करत फोटो काढा.. असा आदेश दिला. यावरून मोठा गोंधळ निर्माण झाला होता. 

व्हिडिओ होतोय व्हायरल

दरम्यान, शासकीय कार्यालयांमध्ये महापुरूषांचे फोटो लावण्याबाबात महाराष्ट्र शासनाचे आणि केंद्र शासनाचे काही नियम आहेत. मग छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाजूला पंतप्रधानांचा फोटो कसा काय? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. याच कृत्याला अमित ठाकरे यांनी विरोध करत आक्षेप नोंदवला आहे. 

हे ही वाचा : 'टीका करा, पण मी दोन वेळा तिथं गेलो..' जरागेंना शिंदेंचं उत्तर

दरम्यान, अमित ठाकरे यांच्यासोबत काही मनसेचे कार्यकर्ते देखील उपस्थित होते. त्यातील एका कार्यकर्त्याला अमित ठाकरे यांनी काढ रे तो फोटो असं म्हणत आदेश दिला. कार्यकर्त्याने देखील मोदींचा फोटो काढून खाली उतरवला. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.