Manoj Jarange Patil, जालना : परभणीत रविवारी (दि.30) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शेतकरी आणि युवा संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. परभणीचे खासदार संजय जाधव यांच्या वतीने हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. संजय जाधवांच्या शिंदेसेनेतील प्रवेशानंतर ठाकरे सेनेतील काही पदाधिकारी आणि नेतेही शिंदेसेनेत प्रवेश करणार असल्याचं सांगण्यात येत होतं. मात्र, या कार्यक्रमावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आक्षेप घेतला आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटीत उपोषण सुरू असताना परभणीत आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमावर जरांगेंनी नाराजी व्यक्त केली.
ADVERTISEMENT
हेही वाचा : लग्नानंतर सतत आजारी पडू लागला नवरदेव, महिन्याभरात बायकोवर संशय आला अन् घडलं भयंकर
"तर मी तिकडं येत असतो, तिथं मग लय धिंगाणा होईल"
संजय जाधव यांच्याशी फोनवर संवाद साधताना, “आपल्यासाठी समाज महत्त्वाचा आहे. हा कार्यक्रम तात्काळ रद्द करा, अन्यथा मी तिथं येईल,” असं म्हणत मनोज जरांगेंनी संजय जाधवांना दम दिला. कार्यक्रम झाल्यास आपण तिथे जाणार असल्याचेही जरांगे यांनी म्हटले. “कार्यक्रम केला तर मी तिकडं येत असतो. तिथं मग लय धिंगाणा होईल,” असा निर्वाणीचा इशाराही त्यांनी दिला. मैदानात उतरल्यावर विचार करायचा नसतो आणि जोपर्यंत जीवात जीव आहे, तोपर्यंत समाजासाठी मैदानात लढत राहणार असल्याचे जरांगे यांनी सांगितले.
हेही वाचा : दीराचे वहिनीसोबत अनैतिक संबंध, शेवटी पलंगाखाली आढळला मृतदेह; काय घडलं?
जरांगेंची भेटायला येणाऱ्या मंत्र्यांवरही टीका
उदय सामंत आणि राधाकृष्ण विखे यांच्याकडून चर्चा केली जाते, मात्र त्यांच्यावरच आपण टीका करता. मग “चर्चा कोण करणार?” असा सवाल जरांगेंना करण्यात आला होता. त्यावर कोणाकडूनही अपेक्षा ठेवायची नाही, असं जरांगे म्हणाले. सरकारला मराठा समाजाला द्यायचे नाही, तर मराठ्यांचे वाटोळे करायचे आहे, असा आरोपही त्यांनी केला. मराठा समाज मैदानात उतरला असून आता आरपारची लढाई होणार असल्याचेही जरांगेंनी म्हटले. सरकारकडून चर्चा करण्यासाठी येणाऱ्या मंत्र्यांबाबत जरांगे यांनी नाराजी व्यक्त केली
एकनाथ शिंदे रविवारी परभणीच्या दौऱ्यावर होते. मराठवाड्यात शिवसेनेच्या पक्षाचा मेळावा घेत असल्याचा उल्लेखही जरांगे यांनी केला. मराठा आरक्षणाच्या मागणीसंदर्भात सरकारच्या भूमिकेवर त्यांनी प्रश्न उपस्थित केले. मराठा समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याची नाराजी व्यक्त करत त्यांनी सरकारवर टीका केली. मुंबईतील आंदोलनाच्या परवानगीबाबत बोलताना 12 तारखेला मराठा समाजाचे आंदोलन होणार असल्याचे सांगत, त्यासाठी अर्ज आधीच दिल्याचे जरांगे यांनी स्पष्ट केले.
ADVERTISEMENT












