Devendra Fadanvis On Pune Ganesh Festival : भाजपची कार्यकारीणीची बैठक सध्या पुण्यात पार पडली आहे. याच बैठकीत देवेंद्र फडणवीसांसह सर्व खासदार, आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी आपली उपस्थिती दर्शविली होती. या बैठकीत फडणवीसांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले होते. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांना संबोधित करत पुण्यातील डीजेवरून स्पष्टच सांगितलं. 'पुणेकरांनी सांस्कृतिकपणे उत्सव साजरा केला पाहिजे हे महाराष्ट्राला दाखवून द्यावे', असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. डीजेचा आग्रह धरणाऱ्या भाजपच्या पदाधिकाऱ्याxसाठी या कोपरखळ्या होत्या असं बोललं जातंय.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : गाडी शिकवण्याच्या बहाण्याने 17 वर्षीय मुलीचा विनयभंग, लोकांनी आरोपीचा टक्कल करत फिरवलं
डीजेववरून CM नेमकं काय म्हणाले?
पुण्यात भाजपच्या कार्यकारिणी बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रमुख उपस्थिती दर्शविली होती. भाषणाच्या अगदीच सुरूवातीला मुख्यमंत्र्यांनी पुण्यातील गणेशोत्सवात डीजे आणि पारंपारिक वाद्यावरून सुरू असलेल्या स्थानिक पातळीवरील वादावर भाष्य केले. फडणवीस म्हणाले की, 'मार्ग काढून सांस्कृतिक पद्धतीने पुण्यातील गणेशोत्सव साजरा व्हावा, हे पुणेकरच करू शकतील,' असं फडणवीस म्हणाले होते.
पुण्यात गणेशोत्सवात डीजे की पारंपारिक वाद्य?
पुण्यात गणेशोत्सवात डीजे की पारंपारिक वाद्य? असा प्रश्न उपस्थित होत आहे. यावर देवेंद्र फडणवीस यांनी थेट सांगितलं की, "पुण्यात गणेशोत्सव सणात डीजे वाजायला हवा की नाही? अशी जोराची चर्चा सुरू आहे. मला देखील मीडियातील लोक हा प्रश्न विचारणार, मात्र मी सांगेन की, पुण्यात सांस्कृतिक पद्धतीनेच गणेशोत्सव साजरा व्हावा. सांस्कृतिक पद्धतीने गणेशोत्सव कसा साजरा केला जाईल, हे पुणेकरांनी महाराष्ट्राला दाखवून द्यावे," असे फडणवीस म्हणाले.
हे ही वाचा : शौचासाठी गेलेल्या विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार, पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल
पुणेकरांनी डीजेला विरोध केला होता, ध्वनी प्रदूषणसारखे प्रकार घडू लागल्याने आता नागरिकांनी देखील संताप व्यक्त केला होता. अशातच भाजपच्या काही नेत्यांनी डीजेचा चांगलाच आग्रह धरला होता. आमच्याच सणांवर बंधन का घातलं जातं? असा प्रश्न केला होता. त्यावर आता राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पारंपारीक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करावा असे सांगितले.
ADVERTISEMENT












