अशोक खरातचा सीडीआर कोणाकडून मिळाला? विरोधकांच्या आरोपांनंतर अंजली दमानियांचा खुलासा, डोळे पाणावले!

Anjali Damania on Ashok Kharat CDR : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना भोंदूबाबा अशोक खरात याचा सीडीआर कसा मिळाला? याबाबत विरोधकांनी अनेक सवाल उपस्थित केले आहेत. यावर आज त्यांनी प्रत्युत्तर दिलंय.

Anjali Damania on Ashok Kharat CDR

Anjali Damania on Ashok Kharat CDR

मुंबई तक

06 Apr 2026 (अपडेटेड: 06 Apr 2026, 12:58 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

अशोक खरातचा सीडीआर कोणाकडून मिळाला?

point

विरोधकांच्या आरोपांनंतर अंजली दमानियांचा खुलासा, डोळे पाणावले!

Anjali Damania on Ashok Kharat CDR : नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याचा पर्दाफाश झाल्यानंतर या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. दरम्यान, राज्यभरात अशोक खरातचं प्रकरण चर्चेचा विषय बनलेला असताना सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी त्याचा CDR सार्वजनिक केला. मात्र, अंजली दमानिया यांना CDR कसा मिळाला? असे सवाल उपस्थित केले जाऊ लागले. CDR वरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी अंजली दमानिया यांच्यावर गंभीर आरोप केले. यावर आता अंजली दमानिया यांनी प्रत्युत्तर दिलंय. यावेळी दमानिया यांचे डोळे पाणावलेले पाहायला मिळाले. 

हे वाचलं का?

Anjanli Damania LIVE: अशोक खरातचा सीडीआर कुठून मिळाला? दमानियांची प्रेस|Sushma Andhare | Sanjay Raut

CDR कसा मिळाला? अंजली दमानिया यांचा खुलासा 

अंजली दमानिया म्हणाल्या, गेले 4-5 दिवस वेगवेगळ्या लोकांकडून प्रतिक्रिया येत आहेत... काही लोकांनी माझ्या विरोधात भाष्य केलं आहे. दुर्दैवाने 31 तारखेपासून काल रात्री पर्यंत मी मुंबईत नव्हते... त्यांच्या इतक्या पत्रकार परिषद मी घेऊ शकले नाही. चंदीगडला असल्यामुळे मी प्रतिक्रिया देऊ शकली नाही. संजय राऊत बोलतात की रॉ ची एजेंट आहे का? अंधारे बोलतात की मी भाजपची माणूस आहे का? क्लोड नावाचं ऍप आहे...31 मार्चला मी सकाळी निघाले दुपारी 12 च्या दरम्यान मला एक मेसेज आला आणि अशोक खरातची माहिती द्यायची आहे करून कॉल मी त्यांचा घेतला. ते मला बोलले की मी नेहमी तुमचे बातम्या बघतो...मी कोण आहे विचारलं ते बोलले की प्रायव्हेट डिटेक्टिव्ह आहे... दुसऱ्या नंबर वरून मला एक एक्सेल शीट आलं. रात्री मला वेळ मिळाला तेव्हा मी ते सगळं चेक केलं... त्याने सांगितलेल्या कंपनीचे नाव चेक केलं. त्यावरून कळलं की हा माणूस खोटा नाही.. ते एक्सेल शीट मी क्लोडवर टाकलं... ते एक AI सॉफ्टवेअर आहे. त्यावरून मला माहिती मिळाली..

पुढे बोलताना दमानिया म्हणाल्या, जेव्हा मला कळलं की हे खरं आहे.. दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता मी दाते सरांकडे पाठवलं... मी त्यांना हे ही बोले की जाणूनबुजून मला पाठवलं असेल. ही साधी माहिती आल्यावर त्याची सतत्या कशी ओळखायची ते ही दाखवते. मी जन्मात अवैध गोष्टी मागत नाही.. अवैध धंदे करत नाही माझ्याकडे आलेली माहिती दाते सरांना आणि फडणवीस यांना पाठवली. जेवढे फोटो होते तेवढे नंबर मी सर्च केले... देवेंद्र फडणवीस, उदय सामंत, धनंजय मुंडे, पंकजा मुंडे, विखे पाटील , सुषमा अंधारे, संजय राऊत, मोहित कंबोज, गिरीश महाजन यांचे कॉल लागले नाहीत.  आम्ही विषयांवर लढतो फालतूचं राजकारण करत नाही, असंही दमानिया म्हणाल्या.

रुपाली चाकणकर, सुनील तटकरे, एकनाथ शिंदे यांचे फोन आहेत... संजय शिरसाठ, मिलिंद नार्वेकर यांचे देखील डिटेल्स आहेत. काल मी एअरपोर्टला बसले होते.. प्रभाकर काळे यांचे काही 6 नंबर आहेत त्यांचे 2 नंबर मी तपासले... त्यात त्याचा समावेश होते. 12 कॉल प्रभाकर काळे यांनी केले.. फक्त 2 कॉल खरात यांनी समोरून केले. हे सगळे राजकारणी भोंदू बाबांना पाठीशी घालतात. अंधारे बाई बोलतात की अँटी cm लॉबी विरोधात केलं... त्यांना मी सीडीआर पाठवते आणि त्यांनी ही शोधून दाखवावं, असं आव्हानही दमानिया यांनी अंधारे यांना दिलं. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

पुण्यात दुर्दैवी अपघात: बास्केटबॉलचा हुप विद्यार्थ्याच्या डोक्यात कोसळल्याने तरुणाचा करुण अंत, कॅम्पसमध्ये संतापाची लाट